चालू घडामोडी - ०८ जुलै २०१८

Date : 8 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शाळेतून आता छडीची शिक्षा हद्दपार होणार :
  • मुंबई : 'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' असं म्हंटलं जायचं. शिक्षकाच्या हातात छडी पाहिली तरीही विद्यार्थी घाबरतात. मात्र आता शाळेतून ही छडीची शिक्षा बंद होणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने याबाबत आदेश जारी केला आहे.

  • शिक्षण बाल हक्क कायद्यानुसार कोणत्याही मुलाला शारीरिक किंवा मानसिक छळाला सोमोरे जाऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता राष्ट्रीय बालहक्क आयोगाने शाळांमध्ये छडीची शिक्षा वगळण्याबाबत निर्णय घेतला.

  • याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना सर्व माध्यमांना, शाळांना, व्यवस्थापन संस्थांना देण्यात आल्या असून, याबाबत कार्यशाळा घेण्याचं देखील राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे मोबाईल जप्त करा - हायकोर्ट :
  • नैनीताल : रस्ते सुरक्षेविषयक जागरुकतेसाठी वाहतूक विभाग आणि सरकार विविध उपक्रम सातत्यानं राबवत असतात. मात्र वाहन चालकांकडून त्याकडे सातत्याने कानाडोळा केला जातो. गाडी चालवताना फोनवर बोलताना झालेल्या अपघातांचं प्रमाण मोठं आहे. हीच बाब लक्षात घेत गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल जप्त करण्याचे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत.

  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहन चालकांचा मोबाईल किमान 24 तासांसाठी जप्त करण्याचे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत. मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे वाहन चालक इतरांचा जीवही धोक्यात टाकत असतात. अशा वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर मोबाईल जप्तीची कारवाई करण्यास हायकोर्टाने सांगितले आहे.

  • दंडाची पावती फाडल्यानंतर मोबाईल जप्तीची कारवाई करण्याचे आदेश उत्तराखंड हायकोर्टाचे न्यायाधीश राजीव शर्मा यांनी राज्य परिवहन विभागाला दिले आहेत.

  • जून महिन्यातही उत्तराखंड हायकोर्टाने गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांकडून 5 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले होते. तसेच राज्य सरकारला राज्यातील सर्व रस्त्यांचे एका महिन्यात सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

  • उत्तराखंडमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल किमान एक दिवसासाठी तरी जप्त करा, असे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत. राज्यातील सर्व रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडीटही करावे, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. वाहतुकीच्या कायद्यांबाबत अंमलबजाणीसाठी पथक नेमण्यास हायकोर्टाने सागंतले आहे.

नोएडात सॅमसंगचा नवा प्रकल्प, ५ हजार कोटींची गुंतवणूक :
  • नवी दिल्ली : भारताते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती मून जेई  सॅमसंग कंपनीच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी नोएडा दौऱ्यावर आहे. दक्षिण कोरिया कंपनीची भारतातील 5 हजार कोटी रुपयांची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे.

  • नरेंद्र मोदी या प्रकल्पासाठी 9 जुलैला जाणार आहेत. दक्षिण कोरिया कंपनीची भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून या प्रकल्पात 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सॅमसंगने दरवर्षी 12 कोटी मोबाईल बनविण्याचे लक्ष ठेवले आहे. यूपी सरकारने जीएसटीत कंपनीला सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • नरेंन्द्र मोदी हे रस्ते मार्गाने हा प्रवास करणार आहेत. किलोमीटरच्या या प्रवसात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलीयं. या संदंर्भातील बैठक चीफ़ सेक्रेटरी अनूप चंद्र पांडे यांच्या अखत्यारित लखनौ येथे पार पाडली.

  • सॅमसंगच्या या प्रकल्पाची बोलणी अखिलेश यादव यांच्या सरकारशी झाली. पण काही कारणांमुळे उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार स्थापनेनंतर सॅमसंग कंपनीचे एक प्रतिनिधी लखनऊला आले. आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भारत-इंग्लंडमधील बरोबरीची कोंडी फुटणार, आजचा सामना निर्णायक :
  • लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा टी-20 सामना आज ब्रिस्टलमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.

  • मालिकेत भारतानं पहिला, तर इंग्लंडनं दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी आजचा सामना निर्णायक ठरेल. पहिल्या टी-20 सामन्यात विराटसेनेनं इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात कुलदीप यादवची फिरकी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती.

  • मात्र इंग्लंडनं दुसऱ्या सामन्यात कुलदीप आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीचा समर्थपणे सामना करून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे उभय संघांमधला तिसरा आणि अखेरचा सामना अतिशय चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे.

  • पहिल्या सामन्यात आपल्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या खेळाडूंना फसवणाऱ्या यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना दुसऱ्या सामन्यात आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात चहल आणि कुलदीप यांची रणनीती कशी हे देखील महत्वाचं आहे.

  • पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात राहुलकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.

रिलायन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा मुकेश अंबानी :
  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी मुकेश अंबानी यांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. अंबानी (वय ६१) हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर १९७७ पासून आहेत. त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर जुलै २००२ मध्ये कंपनीचे अध्यक्ष करण्यात आले होते.

  • कंपनीने ठरावात म्हटले आहे, की १९ एप्रिल २०१९ पासून पाच वर्षांसाठी  मुकेश अंबानी यांची पुन्हा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात येत आहे. मुंबई येथे ५ जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठरावाच्या बाजूने ९८.५  टक्के तर विरोधात १.४८ टक्के मते पडली. ठरावानुसार मुकेश अंबानी यांना वार्षिक ४.१७ कोटी वेतन व ५९ लाख रुपयांचे इतर भत्ते देण्यात येतील.

  • यात निवृत्तीच्या लाभांचा समावेश नाही. निव्वळ नफ्याच्या आधारे मुकेश हे बोनसला पात्र असतील. उद्योगाच्या कामासाठी ते जो प्रवास करतील, काही ठिकाणी मुक्काम करतील त्यात ते, त्यांची पत्नी व मदनीस यांच्या सर्व खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल. यात मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षा खर्चाचा समावेश नाही.

  • धीरूभाई अंबानी यांचे ६ जुलै २००२ रोजी निधन झाले होते. मुकेश यांची त्यानंतर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड  झाली. त्यांचे लहान बंधू अनिल अंबानी यांची उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली. नंतर २००५ मध्ये दोन भावंडे वेगळी झाली व उद्योगाचे विभाजन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत २० हजार कोटी अपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून उभे करण्यास मान्यता देण्यात आली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

  • १९३०: किंग जॉर्ज ५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

  • १९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

  • १९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

  • २००६: मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २०११: रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली.

जन्म 

  • १७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)

  • १८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)

  • १९१४: पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)

  • १९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)

  • १९४९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

  • १९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

  • १९९४: गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.

  • २००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.

  • २००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)

  • २००७: भारताचे ९वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)

  • २००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.