चालू घडामोडी - ०८ जून २०१७

Date : 8 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
Pranab Mukherjee : देशात पुरेशा प्रमाणात रोजगारसंधी निर्माण होत नाहीत; राष्ट्रपतींना चिंता
  • केंद्रातील मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय मंत्र्यांकडून आतापर्यंत विविध क्षेत्रांत संपादित केलेल्या यशाचा लेखाजोखा मांडला जात आहे. त्याचवेळी राष्ट्रपतिपदाचा एका महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे.

  • रोजगार क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी तरुण पाऊल ठेवत आहेत. पण त्यांच्यासाठी त्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत, असे ते म्हणाले.

  • देशात दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले होते. पण सरकारनेच राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१४ पासून डिसेंबर २०१५ या दोन वर्षांच्या काळात प्रत्यक्षात ५ टक्के रोजगारही उपलब्ध झाले नाही, असे दिसून येते.

  • एकीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असताना आता राष्ट्रपती मुखर्जी यांनीही बेरोजगारीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे.

  • देशातील युवकांना अधिकाधिक रोजगार देण्यावर भर दिला पाहिजे, त्यांच्यासाठी पुरेशा आणि नवीन रोजगार संधी निर्माण करायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

४ जी स्पीडमध्ये भारत आता पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षा मागे :
  • सध्याचं जगं हे इंटरनेटचं जग आहे. डिजीटल क्रांतीच्या या युगात सगळीकडेच इंटरनेटचा वापर केला जातो. तसंच विविध टेलिकॉम कंपन्यांकडून हाय स्पीड तसंत सुपर हाय स्पीड इंटरनेट सेवा दिल्या जातात. पण भारतामध्ये मात्र हाय स्पीड इंटरनेट द्यायचा टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ ठरतो आहे.

  • ४ जी इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत भारत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे राहिलं आहे. अनेक क्षेत्रात भारताच्या कित्येक पट मागे असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश ४ जी इंटरनेटे सेवेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे गेले आहेत.

  • भारतात ४ जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडची सरासरी ५.१ Mbps इतकी आहे. जगाच्या इंटरनेट सरासरीपेक्षा ही सरासरी एक-तृतीयांश पेक्षाही कमी आहे. जागतिक स्तरावर थ्रीजी इंटरनेटची सरासरी ४.४ mbps इतकी असून भारतातील '४ जी'चा स्पीड यापेक्षा फक्त ०.७ mbpsनं अधिक आहे. त्याचवेळी जगातील '४ जी' इंटरनेट स्पीडची सरासरी तब्बल १६.२ Mbps इतकी आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर :
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या 'जीवनगौरव' पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड झाली आहे.

  • १४ जून रोजी होणाऱ्या नाट्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

  • नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी पुरस्कार प्रदान केले जातात.

राष्ट्रपती निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी :
  • भारतीय प्रजासत्ताकाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी होईल व गरज पडल्यास २० जुलै रोजी मतमोजणी होईल.

  • विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे. त्याआधी एक आठवडा किंवा चार दिवस आधी मुखर्जी यांचा उत्तराधिकारी म्हणून देशाच्या या सर्वोच्चपदावर पुढील पाच वर्षे कोण बसेल हे स्पष्ट होईल. एकाहून जास्त उमेदवार रिंगणात नसतील, तर ०१ जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतीचे नाव समोर येईल.

  • आयोगाने या निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव अनूप मिश्रा यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  • तसेच महाराष्ट्रात राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. ए.एन. कळसे व उपसचिव आर.जे. कुडतरकर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.

कोकण आयुक्तपदी जगदीश पाटील यांची नियुक्ती :
  • कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ०७ जून रोजी त्यांनी हा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.

  • डॉ. पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास,सोलापूर जिल्हाधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळ, बेस्टचे महाव्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केले आहे.

  • १९९१ मध्ये केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादनाच्या क्षेत्रात विशेष काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.

'राष्ट्रीय स्वयंरोजगार' महाराष्ट्र व्दितीय :
  • राष्ट्रीय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रेसेटस्) च्या अभियानात बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनीयरित्या व प्रभावीपणे राबवल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराजमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नत्ती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  • तसेच यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रादेशिक संचालक सुनिल कस्तुरे, पोतदार व ग्रामीण उन्नत्ती अभियानाचे संचालक जॉर्ज बर्नाड शॉ उपस्थित होते.

रोहित शर्माच्या ‘या’ खेळीमुळे श्रीलंकेला आजही धडकी भरते! 
  • सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी केली आणि आपण किती तयारीत आलो आहोत, हेच दाखवून दिलं.

  • पाकिस्तानविरोधात आक्रमक फलंदाजी करत हिटमॅनने आपलं कमबॅक धडाक्यात असल्याचं सिद्ध केलं.

  • चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानाविरोधात रोहित शर्मा भले शतक पूर्ण करु शकला नसेल, मात्र ओव्हलमध्ये श्रीलंकेविरोधात ही कसर भरुन काढम्यासाठी आणि फोर-सिक्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • खरंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांविरोधात हिटमॅन अधिक आक्रमक होतो, असा पूर्व-इतिहास आहे. कोलकात्यात श्रीलंकेविरोधातच रोहित शर्माने २६४ धावांची खेळी केली होती. ही धडाकेबाज खेळी श्रीलंकन टीम कधीच विसरु शकत नाही.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक समुद्र दिन.

जन्म, वाढदिवस

  • दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्वचिंतक, समीक्षक : ०८ जून १९१०

  • गजानन वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार : ०८ जून १९१७

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मुहमंद पैगंबर, इस्लामी धर्माचे संस्थापक : ०८ जून ६३२

ठळक घटना

  • भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा सुरु : ०८ जून १९४८

  • लो. टिळक यांचे मंडालेच्या तुरुंगातून सुटका : ०८ जून १९१५

  • टिळकांनी मंडाले तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पुर्ण केला : ०८ जून १९१५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.