चालू घडामोडी - ०८ नोव्हेंबर २०१७

Date : 8 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रशांत महासागराच्या मधोमध शास्त्रज्ञांना सापडलं अज्ञात शहर :
  • आंतरराष्ट्रीय : पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासून रोज नवनव्या गोष्टी समोर येतात. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात लपलेली अनेक शहरं आजही अज्ञातवासात आहेत. शास्त्रज्ञ, अभ्यासक या शहरांचा शोध लावत आहेत. अशाच एका शहराचा शोध आर्कियोलॉजिस्टने लावला आहे.

  • समुद्राच्या अगदी मधोमध असलेलं शहर पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात निर्माण झालं असावं असा दावा त्यांनी केला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी समुद्राच्या आड लपलेल्या शहराचा शोध लावला आहे. 

  •  त्याचप्रमाणे या शहराला भुताने झपाटलेलं असल्याचीही चर्चा आहे.जॉर्ज कौरोनिस या आर्कियोलॉजिस्टने हे शहर शोधून काढलं आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे शहर इथे अस्तित्वात असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.(source :lokmat) 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर, सेऊलमध्ये दाखल
  • सेऊल- दोन आठवड्यांच्या आशिया पॅसिफिक दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला कसं उत्तर द्यायचं यावर 'तोडगा काढू' असे सूचक ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.

  • उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये अणूकार्यक्रमामुळे तणाव वाढत आहे. त्यातच किम जोंग उनने केलेल्या अणू चाचण्यांमुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये थेट वादग्रस्त विधानांची देवणघेवाण होऊन हे वातावरण अधिकच तापले आहे.

  • त्यामुळे दक्षिण कोरियाचे नागरिक नेहमीच युद्धाच्या तोंडावर उभे असतात.

स्केटिंगचा चिमुकला बादशहा ध्रुव कामडी जगात टॉप 100 मध्ये :
  • चंद्रपूर : अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयात अनेक कीर्तिमान आपल्या नावे करणाऱ्या चंद्रपुरातील शिशिर ऊर्फ ध्रुव सुभाष कामडी या स्केटिंंगच्या चिमुकल्या बादशहाने आणखी एक गगनभरारी घेतली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकने त्याची दखल घेतली असून, जागतिक पातळीवरील पहिल्या १०० रेकॉर्डमध्ये ध्रुवची नोंद झाली आहे.

  • ध्रुवचा हा गौरव सहा देशांच्या रेकॉर्ड बुकच्या मुख्य संपादकांच्या हस्ते येत्या १२ नोव्हेंबरला दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरियम येथे एका सोहळ्यात केला जाणार आहेत. याप्रसंगी जागतिक पातळीवरील शंभर रेकॉर्ड होल्डरला प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत.

  • मास्टर शिशिर ऊर्फ ध्रुवची वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकमध्ये नोंद झाली असून त्याचे नाव व रेकॉर्ड २०१८ च्या बुकमध्ये प्रकाशित होणार आहे. दरम्यान, त्याला मेडिकल ट्रेनिंगसुद्धा दिले जाणार आहे.

  • पुणे येथे स्टुडंट परफार्मस रोलर स्केटिंग इन कपल अंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे २० आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ध्रुवने सहभागी व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती.

  • मात्र तत्पूर्वी ८ आॅगस्ट रोजी ध्रुवची आई शिल्पा हिने अचानक जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्रुव सहभागी झाला होता. त्या दिवशी त्याच्या आईची तेरवी होती हे विशेष. (source :lokmat)

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई-गोवा फेरीबोट :
  • पणजी : रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई ते गोव्या दरम्यान फेरीबोट सेवा सुरु केली जाणार आहे. केंद्रीय जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली.

  • प्रवासी आणि कार्गो वाहतूकही बोटीमधून केली जाणार असून त्यामुळे वेळ तर वाचणार आहेच, शिवाय प्रदूषणही कमी होणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.

  • दाबोळी आणि मोपा विमानतळ जलमार्गाने जोडण्याच्या शक्यतेवर विचार सुरु असून गोव्यात जलमार्ग विकसित करताना पर्यावरणाचे भान राखले जाणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.

  • मोठ्या हॉटेल्सनी तरंगत्या जेटी करुन पर्यटकांना जलमार्गावरुन थेट हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा, असाही विचार आहे. गोव्यात ज्या प्रकल्पांना विरोध होईल ते प्रकल्प गोव्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेले जातील, असंही गडकरी म्हणाले.(source : abpmajha)

भारताचा न्यूझीलंडवर 6 धावांनी विजय, टी-20 मालिका खिशात :
  • थिरुवनंतरपुरम : टीम इंडियानं थिरुवनंतरपुरममधल्या आठ-आठ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

  • भारत आणि न्यूझीलंड संघांमधला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे आठ-आठ षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 68 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करुन न्यूझीलंडला आठ षटकांत सहा बाद 61 धावांत रोखलं.

  • भारताकडून जसप्रीत बुमरानं दोन षटकांत केवळ नऊ धावा मोजून किवींच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

  • त्याआधी टीम इंडियानं या सामन्यात आठ षटकांत पाच बाद 67 धावांची मजल मारली होती. भारताकडून मनीष पांडेनं सर्वाधिक 17 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्यानं नाबाद 14, तर विराट कोहलीनं 13 धावांची खेळी केली. (source : abpmajha)

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • जागतिक शहरीकरण दिन / आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

  • १९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

  • १९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  • १९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

  • १९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

  • २००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

  • २०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

जन्म दिवस

  • १८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)

  • १८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)

  • १८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१)

  • १९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)

  • १९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल२०००)

  • १९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)

  • १९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

  • १९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

  • १९७०: मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.

  • १९७६: ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.

मृत्यू

  • १२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)

  • १६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)

  • १९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

  • २०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी१९५७)

  • २०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)

  • २०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.