चालू घडामोडी - ०८ ऑक्टोबर २०१७

Date : 8 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अर्थशास्त्रातलं ‘नोबेल’ रघुराम राजन यांना मिळू शकते :
  • सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश आहे.

  • ‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स’ने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली असून रघुराम राजन यांनाही या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

  • क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था असून ते आपल्या संशोधनावरून नोबेल पुरस्कारांच्या संभावित विजेत्यांची यादी तयार करतात.

  • वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार राजन हे त्या सहा अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत ज्यांना क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्सने यावर्षी आपल्या यादीत समाविष्ट केले आहे, कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वात कमी वयाचे (४०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रमुख झालेले राजन हे २००५ मध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले.

  • राजन यांनी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण केलं होतं. त्याचवेळी राजन यांनी आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं.

पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच जन्मगावी - वडनगर :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी जाणार असून पंतप्रधान झाल्यानंतर वडनगरला जाण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे.

  • मोदींच्या स्वागतासाठी वडनगरला उत्सवनगरीचं स्वरुप आलं असून प्रवेशद्वारावरच थ्री-डीच्या माध्यमातून मोदींच्या बालपणापासूनच्या फोटोंचं सादरीकरण सुरु आहे.

  • मोदींच्या हस्ते ६०० कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे, याशिवाय मोदी वनडनगर रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन करतील.

  • वडनगर रेल्वे स्टेशनवरील ज्या स्टॉलमध्ये मोदींनी चहा विकला होता, तो स्टॉलही सजवण्यात आला आहे. पर्यटन आणि रेल्वे मंत्रालयाकडून हा स्टॉल पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जात असून त्यानंतर मोदींच्या हस्ते इंटेसिफाय इंद्रधनुष्याचं लाँचिंग केलं जाणार आहे.

  • मोदींच्या आठवणी असलेल्या वनडनगरमधील इतर स्थळांचाही विकास केला जात आहे.

सौरव गांगुलीच्या त्यागामुळे एमएस धोनी झाला मोठा :
  • महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली…भारतीय क्रिकेटचे सर्वात दोन यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असून सौरव गांगुलीनं घेतलेल्या त्या एका निर्णयामुळे आज धोनी एवढा यशस्वी असल्याचे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे.  

  • सेहवागनं एक वृत्तवाहिनीशी बोलताना हा हे वक्तव्य केलं असून माजी कर्णधार गांगुलीने धोनीला एक मोठा खेळाडू बनवताना स्वतः कसा त्याग केला हे सांगितले.

  • धोनीने वरच्या क्रमांकावर खेळायला यावे म्हणून गांगुलीने स्वतःची जागा धोनीला दिल्याचे सेहवागने यावेळी म्हटलं आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात भारत विजयी :
  • पावसाने व्यत्यय आणल्यानंतर झालेल्या ६ षटकांच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून मात केली, या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

  • नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नसून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर अंकुश ठेवत, भारताने १८.४ षटकात ऑस्ट्रेलियाला ११८ धावांपर्यंत मजल मारू दिली.

  • मात्र यानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भारतीय संघाला ६ षटकांमध्ये ४८ धावांचं आव्हान देण्यात आले असून पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळपट्टी नेमकी कोणाला साथ देणार याची जराही कल्पना नसल्याने हा सामना कोण जिंकेल याची खात्री देता येत नव्हती.

  • ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारताला चांगली टक्कर देत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहली आणि शिखर धवनच्या फटकेबाजीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.

डोकलाममध्ये सैन्य वाढवलं चीनने :
  • डोकलामप्रकरण शांत होत असतानाच, पुन्हा एकदा चीनने डोकं वर काढलं असून डोकलाम आमचाच भाग आहे, अशी री पुन्हा एकदा चीनने ओढली आहे.

  • आमच्या भागात आमच्या सैन्याची उपस्थिती हा वादाचा मुद्दा असू शकत नसून आमच्या भूमीचं आम्ही रक्षण करत आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

  • चीनने वादग्रस्त डोकलाम भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केल्याचं सांगण्यात येत असून यापूर्वी भारत आणि चीनी सैन्यादरम्यान ७३ दिवस इथेच धुसफूस सुरू होती.

  • भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’ मात्र २८ ऑगस्टला दोन्ही देशांनी आपलं सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला होता, हा निर्णय म्हणजे भारताच्या व्यूहरचनेचा विजय असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं.

  • भारताच्या व्यूहरचनेचा विजय, डोकलामप्रश्नी मोठं यश मात्र आता पुन्हा एकदा चीन डोकलामध्ये हळूहळू आपलं सैन्य वाढवत आहे, पण डोकलाममध्ये अशी कोणतीही हालचाल होत असल्याचं वृत्त भारताने फेटाळलं आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • भारतीय वायुसेना दिन 

जन्म /वाढदिवस

  • उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म : ०८ ऑक्टोबर १८९१

  • संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म : ०८ ऑक्टोबर १९२२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन : ०८ ऑक्टोबर १९७९

  • केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन : ०८ ऑक्टोबर २०१२

  • पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन : ०८ ऑक्टोबर २०१२

ठळक घटना

  • इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली : ०८ ऑक्टोबर १९३२

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली : ०८ ऑक्टोबर १९५९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.