चालू घडामोडी - ०८ सप्टेंबर २०१७

Date : 8 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भाजपा अध्यक्ष अमित शहा 'देश में अच्छे दिन आ गए हैं' :
  • ''अच्छे दिन आले आहेत, अनेक जण त्याचा अनुभव घेत असून २०१४ पासून भाजपाला अनेक राज्यांमध्ये मोठा जनादेश मिळाला आणि विधानसभा निवडणुकांत विजय मिळवला.

  • ''२०१४ पासून अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला जनादेश दिला, या वरून देशाच्या झपाट्याने होणा-या विकासाची लोकांच्या मनावर छाप पडली असल्याचं दिसतं'' असं ते म्हणाले.

  • जनादेशापेक्षा मोठं प्रमाणपत्र कोणतंही नाही. उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,जम्मू-काश्मीर, गोवा, मणिपूर, आसाम, हरियाणा, झारखंडचे विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे लोक अच्छे दिनचा अनुभव घेत असल्याचं स्पष्ट होतं.'' असं अमित शहा म्हणाले.

  • ''वन रॅंक वन पेन्शन योजना,मुद्रा बॅंक, शौचालय, उज्ज्वला योजनेच्या फायद्यामुळे कोट्वधी लोक अच्छे दिनचा अनुभव घेत आहेत. सातव्या वेतन आयोगामुळेही अनेक जणांना फायदा झाला आहे.  

कोर्टाचा सवाल नेत्यांना पद मिळाल्यानंतर संपत्ती वाढते कशी :
  • खासदार आणि आमदार झाल्यानंतर नेत्यांच्या संपत्तीमध्ये अचानक होणाऱ्या भरमसाठ वाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी केली असून बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या अवाढव्य वाढीबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • नेत्यांच्या संपत्ती वाढीवर काय कारवाई केली, याची माहिती केंद्र सरकारला या अहवालातून द्यावी लागणार आहे. तसेच सध्या या संदर्भात केंद्र सरकार काय पावले उचलत आहे, याचेही स्पष्टीकरण कोर्टात सादर करावे लागणार आहे.

  • आमदार, खासदार झाल्यानंतर संपत्तीमध्ये अचानक वाढ होण्याच्या प्रकरणामध्ये २८९ नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे या २८९ जणांच्या यादीमध्ये जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्षाच्या एका तरी नेत्याचा समावेश आहे.

  • नेत्यांची वाढती संपत्ती अनेकदा चर्चेचा मुद्दा राहिला आहे, मात्र सध्याच्या बाजारभावाने संपत्तीचे मूल्यांकन तसेच व्यापारातील नफा यामुळे आमच्या संपत्तीमध्ये एवढी वाढ दिसून येते असे नेत्यांचे म्हणणे असते.

  • मात्र कोर्टाला या वाढीव संपत्तीची प्रत्येक माहिती हवी आहे. तसेच ही वाढ कायदेशीर आहे की नाही, याबद्दलही कोर्टाने शंका उपस्थित केली आहे.

आर्थिक विकासासाठी सहिष्णुता अत्यावश्यक :
  • ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली.

  • समाजातील वाढती असहिष्णुता संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी अपायकारक ठरू शकते, जर आर्थिक विकास साध्य करायचा असेल, तर सहिष्णुता अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी एका कार्यक्रमात मांडली.

  • हाच धागा पकडून त्यांनी आपण त्यावेळी मांडलेली भूमिका बरोबर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले जे लोक सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी देशाच्या भल्यासाठी चार शब्द बोलले पाहिजेत. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे विचार महत्त्वाचेच आहेत. मी त्यावेळी हाच महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, असे रघुराम राजन यांनी सांगितले.

  • २०१५ मध्ये एका कार्यक्रमात रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित केला असून त्यावेळी त्यांच्यावर काही जणांकडून तीव्र टीका करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन : अमित शहा लेखक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत असून त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजता पुण्यात होत आहे.

  • बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होईल. पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही आवृत्त्यांचे प्रकाशन शहा यांच्याच हस्ते होणार आहे.

  • रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने हे पुस्तक प्रकाशित केले असून, भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी, हे या पुस्तकाचे नाव असून त्यात भाजपाच्या धोरणाची चिकित्सा केली असून, कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना बरोबरच सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी पक्षाची ध्येयधोरणे समजावित या हेतूने शाह यांनी पुस्तकाचे लेखन केले असल्याची माहिती दिली.

  • प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी असतील. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख उपस्थित असतील.

डी. एस. कुलकर्णी यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा दिला राजीनामा :
  • डी. एस. कुलकर्णी अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीत कार्यरत राहणार आहेत, बँकिंग क्षेत्रात ४४ वर्षांचा अनुभव असलेल्या शशांक मुखर्जी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली.

  • डीएसके समूहातील  डीएसकेडीएल या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पुण्यात झाली असून या वेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला अधिकृतरित्या कळविण्यात आले. 

  • प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे.

  • त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून कंपनीच्या संचालकपदी शशांक बी. मुखर्जी यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

  • कंपनीच्या अध्यक्ष व मुख्य वित्त अधिकारी हेमंती कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र मुंबई स्टॉक एक्स्चेंजला पाठविण्यात आले आहे.

१९९३ खटल्याचा दुसरा टप्पा आणखी दोघांना फाशी अबू सालेमला जन्मठेप :
  • मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसर्‍या टप्प्याचा निकाल ७ सप्टेंबर रोजी तब्बल २४ वर्षांनी लागला.

  • आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेम व करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेची तर रियाज अहमद सिद्दिकीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

  • अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी टाडा तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत न्यायाधीश जी.ए. सानप यांनी शिक्षा ठोठावली.

  • रियाझ सिद्दिकीला टाडाअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली असून कय्युमवरील आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्याची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक : ०८ सप्टेंबर १९३३

  • भपेन हजारिका, प्रसिद्ध गायक, संगीतकार : ०८ सप्टेंबर १९२६

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • डॉ. श्रीमती कमला सोहोनी, भारतातील पहिल्या महिला जैवरसायन शास्त्रज्ञ व आहारतज्ञ : ०८ सप्टेंबर १९९७

  • निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरामपंत कांबळी, नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते : ०८ सप्टेंबर १९८१

  • फिरोज गांधी, राजनितीज्ञ : ०८ सप्टेंबर १९६०

ठळक घटना

  • मॅसिडोनियाला स्वातंत्र्य : ०८ सप्टेंबर १९९१

  • जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला : ०८ सप्टेंबर १९२६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.