चालू घडामोडी - ०८ सप्टेंबर २०१८

Date : 8 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यातील ३७७ एमपीएससी पात्रताधारक अजून बेरोजगारच :
  • पुणे : राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून ३७७ उमेदवारांची विविध पदांवर निवड झाली. मात्र समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात साखल केलेल्या याचिकेमुळे त्यांना सेवेत रूजू करून घेऊन प्रशिक्षणाला पाठविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशिक्षणाचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

  • राज्यसेवा परीक्षा २०१७ ची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती. अंतिम निकाल मे २०१८ मध्ये जाहीर झाला. यात १७ उमेदवारांचा निकाल, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या अधीन राहून देण्यात आला आहे. आता अचानक सर्व ३७७ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविणे स्थगित केले आहे.

महाराष्ट्राची देविका घोरपडे सर्वोत्कृष्ट बॉक्सर :
  • सबज्युनिअर गटाच्या पहिल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. स्पर्धेत हरयाणा संघाने आठ सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व गाजविले.

  • हरयाणाच्या मुस्कान (३४ किलो), प्राची किन्हा (४० किलो),  प्राची कुमारी (४२ किलो), तमन्ना कुमार (४४ किलो), कुशी अवतार (५० किलो), आंचल सैनी (५२ किलो), प्रीति दहिया (५७ किलो), प्रांजल यादव (६३ किलो) यांना सुवर्णपदक मिळाले.

  • मात्र, तामिळनाडूच्या एम.लोशिनी मंगेश हिने ३६ किलो गटात हरयाणाच्या निशासिंग हिला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले. मणीपूर संघाने दोन सुवर्णपदके जिंकली, तर उत्तराखंड व आंध्रप्रदेश यांनी प्रत्येकी एका गटात विजेतेपद पटकाविले. आंचल सैनी हिने ५२ किलो गटात दिल्लीच्या यामिनी तन्वर हिच्यावर शानदार विजय मिळविताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचे पारितोषिक पटकाविले.

उत्साही देशांच्या यादीत भारताचा ११७ वा क्रमांक :
  • कोणता देश सर्वात जास्त उत्साही आणि कार्यक्षम आहे आणि कोणता देश सर्वात आळशी आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने १६८ देशांमध्ये पाहणी करून वर्गवारी केली आहे. सर्वात जास्त कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा देशाने पहिले स्थान पटकावले आहे तर यादीत तळाला म्हणजे सर्वात आळशी या स्थानावर कुवेत देश आहे. उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७ व्या स्थानावर आहे.

  • उत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका १४३ व्या स्थानावर, इंग्लंड १२३ व्या स्थानावर, सिंगापूर १२६ व्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया ९७ व्या स्थानावर आहे. कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया आणि इराकमधील निम्म्याहून जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. तर युगांडामधील केवळ ५.५ टक्के जनता पुरेशी कार्यप्रवण नाही आहे.

  • उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७ व्या स्थानावर असून फिलिपाइन्स १४१ व्या तर ब्राझील १६४ व्या स्थानावर आहे. दर आठवडय़ाला शरीराला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम घडत असेल तर तो शरीरासाठी पुरेसा व्यायाम आहे, असा संघटनेचा निकष आहे.  बहुतेक सगळ्या देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा कमी शारीरिक मेहनत करीत असल्याचे आढळले आहे. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.

फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, ही माझी घोडचूक; मार्क झुकरबर्ग यांची कबुली :
  • वॉशिंग्टन : खोटी माहिती व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी कबुली या समाजमाध्यमाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

  • युरोपियन युनियनच्या ब्रुसेल्स येथील मुख्यालयात त्यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की,  फेसबुकचा वापर दुसऱ्यांच्या निंदानालस्तीसाठी तसेच खोट्या बातम्या पेरण्यासाठी केला जाईल, असा विचार आम्ही केला नव्हता.

  • फेसबुकवरील वापरकर्त्यांची माहिती चोरून तिच्या आधारे विविध देशांतील निवडणुकांमध्ये मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जाईल, असेही कधी वाटले नव्हते. ही माझ्याकडून झालेली घोडचूक आहे. ती सुधारण्यासाठी आता उपाय योजले आहेत. याबाबत आम्ही सजग राहायला हवे होते, असेही झुकरबर्ग म्हणाले.

ड्रोनद्वारे रक्तपुरवठा, महाराष्ट्रात लवकरच आरोग्यक्रांती :
  • नागपूर : आरोग्यसेवेत एक क्रांती घडली आहे. ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करणारी टेक्नॉलॉजी आता आपल्या महाराष्ट्रात सुरु होणार आहे आणि त्याची सुरुवात केली आहे नागपुरातल्या तीन तरुणांनी.

  • या ड्रोनचं वजन 9 किलो आहे. त्यातून दीड किलो औषधं पोहचवली जाऊ शकतात किंवा दीड किलो वजनाच्या रक्ताच्या पिशव्याही नेता येतात.

  • एकदा इलेक्ट्रिक चार्जिंग केलं, की ड्रोन 105 किलोमीटर प्रवास करतो. विशेष म्हणजे पाऊस आणि वाऱ्याचा ड्रोनवर परिणाम होत नाही.

  • कठीण भूभाग, वाईट रस्ते, वाईट हवामान यांचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील गावांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर होत असतो. ड्रोनने रक्त पोहचवताना पैसा तर वाचेलच, शिवाय अडचणींवरही मात करता येईल.

  • या भन्नाट आयडियाची सुरुवात झाली डोंगराळ भागातल्या नेपाळमधून. अमेरिकेसह प्रगत राष्ट्रांमध्ये मेडिकल ड्रोनला परवानगी मिळाली आहे. भारतात तसं झालं, तर डोंगरदऱ्यात अडल्या-नडलेल्यांना आरोग्य सुविधा तातडीने मिळू शकतील. त्यामुळे ही ड्रोन सेवा आरोग्य क्षेत्रातली देवदूत ठरेल.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन / जागतिक शारीरिक उपचार दिन

महत्वाच्या घटना

  • १८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.

  • १८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

  • १९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.

  • १९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

  • १९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.

  • २०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

  • २००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.

जन्म

  • १८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

  • १८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६)

  • १८४८: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)

  • १८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९६३)

  • १९०१: दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.

  • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

  • १९२५: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)

  • १९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)

  • १९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

मृत्यू

  • १९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

  • १९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.

  • १९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.

  • १९९१: कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)

  • २०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म: १९ मे १९६४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.