चालू घडामोडी - ०९ डिसेंबर २०१७

Date : 9 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रोनोल्डोची मेस्सीशी बरोबरी, पाचव्यांदा ठरला प्रतिष्ठित पुरस्काराचा मानकरी :
  • सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या शर्यतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोने या वेळी नेमारला मागे टाकत फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी ऑर’ हा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकवला. पोर्तुगाल स्ट्रायकर रोनाल्डोला गुरुवारी पॅरिसमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने पाचव्यांदा हा पुरस्कार पटकवला असून लिओनल मेस्सीनंतर पाचवेळा हा पुरस्कार पटकवण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला.

  • जगभरातील फुटबॉल तज्ज्ञ असलेल्या १७३ पत्रकारांनी केलेल्या मतदानावरून हा पुरस्कार निवडला जातो. रोनाल्डोसोबत या पुरस्काराच्या शर्यतीत नेमार आणि मेस्सी यांचादेखील समावेश होता. त्यांना मागे टाकत तो पाचव्यांदा पुरस्काराचा मानकरी ठरला.

  • रोनाल्डोने तीन वर्षांत दोनदा आपल्या रिअल मद्रिद या क्‍लबला दोन वेळा चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले. मैदानातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर २००८ मध्ये मॅंन्चेस्टर युनायटेड क्‍लबमधून इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना रोनाल्डोने पहिल्यांदा हा पुरस्कार पटकवला होता. त्या वेळी मॅंन्चेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग आणि चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळवले होते.

भूतानच्या जेत्सुन जगातील सर्वात लहान आणि तरुण महाराणी :
  • भुतान : काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी एका राजकुमाराला भेटले होते. भुतानचे राजे भारत दौऱ्यावर आले असताना या छोट्या राजकुमाराला भेटण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास वेळ काढला होता.

  • हे इथं आ‌ठवण करून द्यायचं कारण असं की, या राजकुमाराची आई म्हणजेच जेत्सुन पेमा वांगचूक या जगातील सगळ्यात लहान आणि तरुण महाराणी असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. 

  • आरव्हीजेसी या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जेत्सुन पेमा वांगचूक या वयाच्या २१ व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. २०११ साली त्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी विवाह केला होता. त्या आता २७ वर्षांच्या आहेत.

  • त्या भारतात येऊन गेल्यानंतर अनेक नेटिझन्सने त्यांना सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या इन्स्टाग्रामवर सक्रीय असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर जेत्सुन पेमा यांचा भारताशीही संबंध आहे. शिक्षणासाठी त्या वर्षभर पश्चिम बंगालमध्येही राहिल्या होत्या. म्हणूनच भारत दौऱ्यावर आले असताना त्यांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं होतं.

ब्रेक्झिटची पूर्णत: अखेर, अटी झाल्या निश्चित; ईयू-ब्रिटन यांच्यात करार :
  • ब्रुसेल्स : युरोपीयन युनियन (ईयू) आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटनने युरोपियन युनियनमधून कोणत्या अटींवर बाहेर पडायचे यावर शुक्रवारी ऐतिहासिक करार झाला. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या सकाळी लवकरच चर्चेसाठी येथे दाखल झाल्यावर हा करार झाला.

  • युरोपियन कमीशनने म्हटले की ब्रिटनने आयरीशची सीमा, घटस्फोट विधेयक आणि नागरिकांचे हक्क यांच्यासह वेगळे होण्याच्या मुद्यांवर पुरेशी प्रगती केलेली आहे. १४ व १५ डिसेंबर रोजी युरोपियन युनियनच्या नेत्यांची शिखर परिषद होत असून तीत ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या वाटाघाटींच्या दुसºया टप्प्यासाठी या कराराने मार्ग मोकळा केला आहे.

  • युरोपियन युनियनचा ब्रिटन जवळपास चार दशकांपासून सदस्य होता व त्यातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनला सार्वमताने जून २०१६ मध्ये परवानगी दिली. परंतु वाटाघाटींचा वेग हळू होता व त्या नेहमी कडवट ठरायच्या. ईयुमधून बाहेर पडणारा तो पहिला देश ठरला.

  • प्राधान्याच्या तिन्ही भागांमध्ये पुरेशी प्रगती साधली गेली असल्याबद्दल कमिशन समाधानी आहे, असे युरोपियन कमिशनने निवेदनात म्हटले.

लिओनार्दो दा विंचींचे चित्र खरेदी करणाऱ्या राजपूत्राचा अखेर शोध लागला :
  • सौदी : गेल्या महिन्यात लिओनार्दो दा विंचींच्या ५०० वर्षे जुने असलेल्या चित्राविषयी चर्चा रंगली होती. ५०० वर्षे जुनं चित्र तब्बल ३ हजार कोटी रुपयांना विकलं गेल्यामुळे हे चित्र चर्चेत आलं होतं. पण हे चित्र नक्की कोणी विकत घेतलं होतं, याविषयी गुप्तता पाळण्यात आली होती. पण आता हे चित्र कोणी विकत घेतलंय याची माहिती समोर आली आहे.

  • लिओनार्दो दा विंचींच्या या चित्राचं नाव आहे साल्वाडोर मुंडी. ते ख्रिस्तांचं चित्र होतं. हे चित्र खरेदी करणारा माणूस हा सौदीचा एक राजपुत्र असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिलं आहे. या राजपुत्राचं नाव बागेर बीन मोहम्द बीन फरहान अल सौद आहे.

  • नोव्हेंबर महिन्यात साल्वाडोर मुंडी या चित्राचा लिलाव पार पडला. लिलावात अनेकांनी मोठ मोठ्या किंमती सांगितल्या होत्या. १९ मिनिटं चाललेल्या या लिलावात शेवटी एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने सगळ्यात जास्त बोली लावून हे चित्र विकत घेतलं.

  • या चित्राची किंमत एखाद्या विमानाएवढी असल्याने प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे हे चित्र खरेदी करणारा नेमका कोण आहे? तो किती अब्जावधी आहे? की कोणत्या देशाचा राजा वैगरे आहे का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे हे चित्र नक्की कोणी विकत घेतलंय याविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न  सुरू केले होते. 

गुजरात विधानसभा निवडणूक: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात :
  • गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या परिक्षेत पंतप्रधान कोण पास होते, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. 

  • पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. 

राज्यात 16 नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होणार :
  • नवी दिल्ली : येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ही दिली आहे.

  • देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 केंद्र सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 20 पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • महाराष्ट्रातील 20 पासपोर्ट केंद्रांपैकी 4 पासपोर्ट केंद्र सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरु करण्यात आली आहेत. उरलेली 16 पासपोर्ट केंद्र लवकरच सुरु होतील अशी माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

  • नवीन 16 पासपोर्ट केंद्रं कुठे - महाराष्ट्रात नवीन 16 पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव याठिकाणी नवीन केंद्र सुरु होतील. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या 27 होणार आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

महत्वाच्या घटना

  • १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

  • १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली

  • १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.

  • १९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.

  • १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.

  • १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.

  • १९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.

  • १९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

  • १९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

  • १९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.

जन्म

  • १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.

  • १६०८: कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)

  • १८६८: नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)

  • १८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे१९५०)

  • १८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

  • १९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.

  • १९४५: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.

  • १९४६: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उर्फ अँटोनिया एडवीज अल्बिना मैनो यांचा जन्म.

  • १९४६: जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांचा जन्म.

  • १९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.

मृत्य

  • १९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१९१०)

  • १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.

  • १९९७: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)

  • २०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.