चालू घडामोडी - ०९ फेब्रुवारी २०१८

Date : 9 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘हे’ आहेत देशातील सर्वात गरिब मुख्यमंत्री :
  • मुख्यमंत्री म्हटल्यावर त्याच्या मालकीचे एक घर, गाडी आणि आणखी काही संपत्ती असेल असा आपला समज होतो. पण एका मुख्यमंत्र्यांच्या नावावर केवळ २.५ लाख रुपयांची संपत्ती आहे. हे मुख्यमंत्री देशातील सर्वात गरिब आणि चांगल्या प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत. आता ते कोणत्या राज्याचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे आहेत ते मुख्यमंत्री. निवडणूकीदरम्यान देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात ही गोष्ट लिहीली आहे.

  • माणिक सरकार यांच्या बँक अकाऊंटमध्ये आता केवळ ९,७२० रुपये असून त्यांच्याकडे १०८० रुपये रोख आहेत. याशिवाय त्यांच्या मालकीचे ४३२ स्क्वेअरमीटरचे एक लहान घर आहे, ज्याची किंमत २० लाख आहे. तर त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य यांच्या नावावर त्यांच्याहून जास्त संपत्ती आहे.

  • २४ लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट, २० ग्रॅम सोने आणि २२ हजार रुपये कॅश अशी संपत्ती आहे. त्या केंद्र सरकारमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होत्या. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांना ही संपत्ती मिावी आहे.

  • नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरेतील जनतेला भाजपा सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर हल्ला करताना त्यांनी राज्यातील जनतेने चुकीचा ‘माणिक’ परिधान केला असून यामुळे विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. राज्याला आता ‘माणिक’ ऐवजी ‘हिऱ्या’ची गरज आहे, असल्याचे म्हटले होते. हिऱ्याचा अर्थ एच म्हणजे हायवे, आय म्हणजे आयवे, आर म्हणजे रेल्वे आणि ए चा अर्थ एअरवे, असल्याचेही त्यांनी म्हटले.(source :loksatta)

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झियांना 5 वर्ष तुरुंगवास :
  • ढाका : बांगलादेशच्या विरोधीपक्ष नेत्या आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. अनाथाश्रमासाठी राखीव निधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ढाका कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे.

  • खलिदा झिया या बांगलादेशात विरोधीपक्षात असलेल्या नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या नेत्या आहेत. झिया सत्तेत असताना 2 लाख 52 हजार डॉलर (अंदाजे 1 कोटी 62 लाख 4 हजार 860 रुपये) रक्कम अनाथाश्रमासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र हा निधी चोरल्याप्रकरणी त्या दोषी आढळल्या.

  • राजकीय हेतूने आपल्यावर आरोप होत असल्याचा दावा झिया यांनी केला होता, मात्र त्या दोषी सिद्ध झाल्या. झियांची सामाजिक आणि शारीरिक स्थिती पाहून न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावला. झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना दहा वर्षांची तुरुंगवारी घडणार आहे.

  • राजधानी ढाकामध्ये विरोधीपक्षाचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये खडाजंगी झाली. झिया यांना सुनावणीसाठी ढाका कोर्टात नेण्यापूर्वी समर्थकांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांवर अश्रूधुराचा वापर करण्याची वेळ आली.(source :abpmajha)

अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती :
  • गुवाहाटी - अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे अगदी खरं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आज करोडो रुपये आहेत. आता हे नेमकं कसं झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे.

  • भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे. 

  • एका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे.

  • गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं. सीमेवरील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतानेही या ठिकाणी विकासाच्या योजना आणि कामे सुरु केली आहेत.(source :lokmat)

ज्येष्ठ साहित्यिक अनिल कुलकर्णी यांचे निधन :
  • वाई (जि. सातारा) : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सेवानिवृत्त संपादक, ज्येष्ठ साहित्यिक अनिल रघुनाथ कुलकर्णी ऊर्फ ‘अरह्ण सर (वय ८१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने येथे निधन झाले.

  • मुंबईत शिक्षण घेतलेल्या ‘अर’ सरांनी काही काळ रेल्वेमध्ये तसेच दादर येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. अभिनेते नाना पाटेकर हे ‘अर’ सरांचे विद्यार्थी आहेत. विसाव्या खंडापर्यंत संपादनाचीही जबाबदारी सांभाळली.(source :lokmat)

मालदीवमधल्या राजकीय संकटावर मोदी आणि ट्रम्पमध्ये 'फोन पे चर्चा' :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी फोनवरुन बोलणे झाले. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये मालदीव, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधल्या परिस्थितीवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी मालदीवमधल्या राजकीय संकटाबद्दल चिंता व्यक्त करतानाच कायद्याचे राज्य आणि लोकशाही मुल्यांचे महत्व अधोरेखित केले असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. 

  • ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये झालेली या वर्षातील ही पहिली चर्चा आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात सुरक्षा सहकार्य आणि समृद्धतेसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.

  • अफगाणिस्तानात सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. म्यानमार आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या विषयावरही दोघांमध्ये चर्चा झाली. 

  • सध्याच्या घडीला 6 लाख 80 हजार रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशमध्ये असून त्यांच्यामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या परतीसाठी नुकताच बांगलादेश आणि म्यानमारमध्ये एक करार झाला आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या म्यानमारमध्ये परतीची ही योग्य वेळ नाही असे अमेरिकेचे मत आहे. उत्तर कोरियाला अणवस्त्ररहित करण्यासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.(source :lokmat)

मंगळाच्या दिशेने सोडलेली मोटार अंतराळात भरकटली :
  • केप कॅनेव्हरल (कॅलिफोर्निया): इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीच्या स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही स्पोर्ट््स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे.

  • ही कार मंगळाची कक्षा ओलांडून सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या उल्का व अशनींच्या पट्ट्यात शिरली असून ती कुठवर पोहोचेल, कुठे जाऊन स्थिरावेल, बाह्य अवकाशाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किती काळ टिकेल, याविषयी अनिश्चितता आहे.

  • इलॉन मस्क यांनी ही माहिती देताना लिहिले की, मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट््स कार व आतील डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जायचे होते. पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी सुदूर अंतराळात जात आहे. ग्रहमालेला लागून असलेल्या उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्याच्या दिशेने ती जात आहे.

  • रॉकेटच्या इंजिनाचा अपेक्षेहून जास्त रेटा मिळाल्याने असे झाले असावे. कुठे जाणार हे अनिश्चित अंंतराळात सोडलेल्या या स्पोर्ट््स कारच्या नेमक्या भ्रमणमार्गाचा नकाशा स्पेसएक्स कंपनीने जाहीर केलेला नाही. त्यामुळे ती नेमकी कुठपर्यंत जाऊन पोहोचेल याचा अंदाज करणे कठीण आहे. ग्रहमालेतील परस्परांना छेद देणा-या गुरुत्वाकर्षण कक्षांच्या ओढाताणीने ती नेमकी कुठे स्थिरावेल हेही अनिश्चित आहे. परंतु असंख्य उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्यातून जाताना तिची त्यापैकी एकाशी टक्कर होणे किती काळ टळेल याची अटकळ करणेही अशक्य आहे.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

  • १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

  • १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

  • १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

  • २००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म

  • १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)

  • १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)

  • १९१७: गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८)

  • १९२२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)

  • १९२२: भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१४)

  • १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

  • १९७०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म.

मृत्यू

  • १८७१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)

  • १९६६: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.

  • १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)

  • १९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००)

  • १९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८)

  • २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.

  • २००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.