चालू घडामोडी - ०९ जानेवारी २०१८

Date : 9 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत सक्तीला स्थगिती द्यावी :
  • चित्रपटगृहांत व सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याविषयीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला केली. सरकारने याबाबत एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात म्हटले आहे की, यासंबंधी नियम तयार करण्यास किमान सहा महिने लागतील.

  • तोपर्यंत या ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित करावी. या आदेशान्वये चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याविषयी व त्या वेळी उपस्थित लोकांनी उभे राहून आदर व्यक्त करण्याविषयी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

  • या मुद्दय़ावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून काही दिवस उलटल्यानंतर या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे व नियम ठरवण्यासाठी सरकारने आंतरमंत्री पातळीवरील समिती स्थापन केली आहे. या प्रकरणी मंगळवारी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे सुनावणी सुरू होणार आहे.

  • न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने या आदेशात सुधारणेचे सूतोवाच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केले होते. न्यायालयाने त्या वेळी असे म्हटले होते की, लोक चित्रपट करमणुकीसाठी पाहतात. समाजाला करमणुकीची गरज आहे, पण त्याचा अर्थ लोकांनी देशभक्तीचे जाहीर प्रदर्शन करणे खरोखर आवश्यक आहे काय, असा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.

  • ३० नोव्हेंबर २०१६ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर फि ल्म सोसायटीने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राष्ट्रगीत वाजवण्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह लावले होते.(source : abpmajha)

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला धक्का, इटलीतील कोर्टानं सर्व आरोपींना ठरवलं निर्दोष :
  • नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात भारताला मोठा झटका मिळाला आहे. इटलीतील मिलान कोर्टानं सोमवारी ऑगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी, बिचोलिए क्रिश्चियन मिशेल, ऑगस्टा वेस्टलँडचे माजी उच्चाधिकारी गियूसेपे ओरसी आणि ब्रुनो स्पेगनोलिनी यांच्यासहीत सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं आहे. 

  • यातील जुसपे ओरसी आणि ब्रूनो हे प्रमुख आरोपी असल्याचे बोलले जात आहे. पुराव्यांअभावी कोर्टाकडून आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे.

  • या व्यवहारात फिनमेकनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी यांच्यावर लाच दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. इटलीतील वृत्तसंस्था ANSAनं दिलेल्या माहितीनुसार, व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचंह  सिद्ध व्हावं यासाठी लागणारे ठोस असे पुरावे नाहीत, असे कोर्टानं सांगितलं. या व्यवहारामुळे भारताला नुकसान झाल्याचेही इटलीच्या कोर्टानं फेटाळलं आहे.

  • ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर करारामुळे नुकसान झाल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला होता. इटलीतील कोर्टाचा हा निर्णय भारताला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी भारतातही खटला सुरू  आहे. 

  • ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिलान कोर्टाच्या या निर्णयामुळे सीबीआयचा खटला कमकुवत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआयची माजी वायुसेना प्रमुख एसपी त्यागी यांच्यासहीत अनेक आरोपींविरोधात चौकशी सुरू आहे.(source :lokmat)

जुन्या ५००, १००० च्या नोटांपासून काय बनवलं जातंय :
  • चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या एका तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैदी नोटाबंदीनंतर चलनातून बाहेर झालेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटांचा चांगल्या पद्धतीने वापर करत असल्याचं दिसत आहे. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कटिंग झालेल्या या नोटांचं स्टेशनरीच्या सामानात रुपांतर होत आहे.

  • चेन्नईच्या पुजहल मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रामुख्याने 25-30 प्रशिक्षित कैद्यांची एक तुकडी या नोटांपासून फाईल पॅड बनवत आहेत.

  • राज्य सरकारच्या विविध विभाग आणि एजन्सीमध्ये या स्टेशनरी सामानाचा वापर होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

  • तामिळनाडू कारागृह विभागाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक ए मुरगेसन यांच्या माहितीनुसार, "भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 70 टन नोटांचे तुकडे देण्याची तयारी दर्शवली होती."

  • पुजहल जेलला आतापर्यंत यापैकी 9 टन नोटा मिळाल्या आहेत, ज्याचा योग्यपद्धतीने वापर केला जात आहे. फाईल पॅड बनवण्यासाठी 1.5 टन बंद झालेल्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.(source : abpmajha)

महाराष्ट्रातील जनतेशी १२ जानेवारीला साधणार संवाद , अरविंद केजरीवाल यांचं मराठीतून ट्विट :
  • नवी दिल्ली - नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (9 जानेवारी )मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली आहे. 12 जानेवारीला केजरीवाल महाराष्ट्राच्या दौ-यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठीतून ट्विट करत आपल्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली आहे.

  • 'नमस्कार,राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी  सिंदखेड राजा येथे येत आहे.', असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.(source : lokmat)

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे निधन :
  • बीजिंग - चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे आज निधन झाले. 2003 ते 2013 अशा दहा वर्षांच्या काळात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. जिंताओ हे 75 वर्षांचे होते. 

  • 21 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या जिंताओ यांनी  1998 ते 2003 या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 2002 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

  • पुढे 2003 साली मार्च महिन्यात जिंताओ यांनी जियांग जेमिन यांच्याकडून चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.(source : lokmat)

दिल्ली पोलिसांसाठी डिजिटल ‘स्टोअर रूम’ची व्यवस्था! महाराष्ट्राच्या सुपुत्राची कामगिरी :
  • मुंबई : पोलीस ठाण्यातील स्टोअर रूममध्ये (मालखाना) ठेवण्यात आलेली गुन्हे प्रकरणातील कागदपत्रे किंवा तत्सम साहित्य शोधणे तसे अवघडच. मालखान्याचा प्रमुख रजेवर असेल तर मग उर्वरित पोलिसांची होणारी दमछाक निराळीच. शिवाय मालखान्याचा प्रमुख बाहेर असेल तर तक्रारदारांची रीघही ठरलेलीच.

  • अशा वेळी मालखान्याच्या प्रमुखाव्यतिरिक्त जबाबदारी दिलेल्या व्यक्तीला ही कागदपत्रे शोधणे सोपे व्हावे; यासाठी दिल्लीतल्या शाहदरा जिल्ह्यातील सीमापुरी, जीटीबी एन्क्लेव पोलीस ठाण्यात राबविण्यात आलेला ‘डिजिटल मालखाना’ हा पायलट प्रोजेक्ट आता प्राप्त झालेल्या यशानंतर दिल्लीतल्या सर्व पोलीस ठाण्यांत राबविण्यात येणार आहे.

  • विशेष म्हणजे दक्षिण पूर्व जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त हरेश्वर स्वामी यांना डिजिटल मालखान्याची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात आली आहे. ते मूळचे महाराष्ट्रतल्या लातूर जिल्ह्यातील तालुका उदगीरमधल्या लोहारा येथील आहेत.

  • विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहदरा जिल्ह्यातील सीमापुरी, जीटीबी एन्क्लेव पोलीस ठाण्यात डिजिटल मालखान्याची सुरुवात करण्यात आली होती. येथे मिळालेले यश पाहता पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीतल्या सर्व पोलीस ठाण्यांत डिजिटल मालखाना सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

  • डिजिटल मालखान्यात तैनात करण्यात येणाºया पोलिसांना कोरिअर कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे गुन्हे प्रकरणात जप्त करण्यात आलेले साहित्य त्यांना डिजिटल मालखान्यातील लॉकरमध्ये ठेवता येईल. (source : lokmat)

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटले घेणार मागे :
  • लखनौ : मंत्री, लोकप्रतिनिधी आदींसह राजकीय कार्यकर्त्यांवर वेळोवेळी दाखल झालेले सुमारे २० हजार खटले मागे घेण्यास उत्तर प्रदेशने कायदा केला असून, त्याचा फायदा स्वत: योगी आदित्यनाथ यांनाही मिळणार आहे. विधानसभेत यासंबंधीची विधेयके संमत झाल्यानंतर राज्यपाल राम नाईक यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे.

  • विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले की, निदर्शने केल्याबद्दल आमदार, मंत्री यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयासमोर हजर न राहिल्याबद्दल त्यांच्यावर वॉरंटही जारी करण्यात आले होते.

  • उत्तर प्रदेशमधील सर्वच पक्षांतील राजकीय कार्यकर्त्यांवर दाखल केलेले अशा प्रकारचे २० हजार खटले मागे घेण्यासाठी एक कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे.(source : lokmat)

दिनविशेष

जागतिक दिवस

  • भारतीय प्रवासी दिन

महत्वाच्या घटना

  • १७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.

  • १७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.

  • १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.

  • १९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.

  • २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.

  • २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

  • २००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.

  • २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.

  • २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

जन्म

  • १९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

  • १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.

  • १९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

  • १९२६: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर१९९७ – मुंबई)

  • १९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.

  • १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)

  • १९३८: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

  • १९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.

  • १९६५: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.

मृत्य

  • १८४८: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५०)

  • १८७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)

  • १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२)

  • २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी यांचे निधन.

  • २००४: पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.

  • २०१३: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर१९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.