चालू घडामोडी - ०९ जुलै २०१८

Date : 9 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दीपा कर्माकरचं सोनेरी पुनरागमन, वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत सुवर्णपदक :
  • नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवणारी भारताची नंबर वन जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने सोनेरी पुनरागमन साजरं केलं आहे. दीपाने तुर्कीतल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. 14.150 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले.

  • वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धा मर्सिनमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धतलं दीपाचे हे पहिले पदक आहे. स्पर्धेतील दीपाची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली, कारण एका जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली.

  • मूळच्या त्रिपुराच्या दीपा कर्माकरने 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 24 वर्षीय दिपा कर्माकरचे रिओ ऑलिम्पीकमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदक हुकलं होतं. पण त्यानंतर दीपाच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्या शस्त्रक्रियेतून सावरलेल्या दीपानं तब्बल दोन वर्षांनी यशस्वी पुनरागमन केलं आहे.

  • आगामी आशियाई खेळांसाठी भारताच्या जिम्नॅस्ट संघामध्येही दिपा कर्माकरची निवड करण्यात आलेली आहे.

जाणून घ्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातले ८ विक्रम :
  • सलामीवीर फखार झमानची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि त्याला शोएब मलिकने दिलेली खंबीर साथ या जोरावर पाकिस्तानने तिरंगी टी-२० मालिकेचं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात करत पाकिस्तानने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयासाठी दिलेलं १८४ धावांचं आव्हान पाकिस्तानने सहज पार केलं. दुसरीकडे इंग्लंडकडून व्हाईटवॉश स्विकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मात्र पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान या अंतिम सामन्यात तब्बल ८ विक्रमांची नोंद करण्यात आली.

  • सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली टी-२० सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकदाही सामना हरलेला नाहीये. धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा दहावा विजय ठरला आहे.

  • अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फखार झमानने ९१ धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम फखारच्या नावावर जमा झाला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या मार्वन सॅम्युअल्सच्या नावावर (८५ धावा नाबाद) हा विक्रम जमा होता.

  • साहिबजादा फरहान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर यष्टीचीत होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर आज फरहान यष्टीचीत झाला.

पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाला ‘आयसीएचआर’च्या कार्यालयाची भेट :
  • पुणे : ‘नमामि गंगे’ मोहिमेचा प्रारंभ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाला ‘इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च’च्या (आयसीएचआर) कार्यालयाची भेट मिळणार आहे.

  • शिक्षणाचे भगवेकरण आणि इतिहास अभ्यासक्रमांतील बदल या विषयांवरून भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका होत असताना पंतप्रधानांच्या मतदारसंघात हे कार्यालय होणार आहे. भाजपने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळलेल्या जम्मू-काश्मीर राज्यातील काश्मीरमध्ये संस्थेची शाखा प्रस्तावित आहे.

  • इतिहास विषयामध्ये अभ्यास आणि संशोधन करून ग्रंथनिर्मितीचे काम ‘आयसीएचआर’ करत असते. राजधानी दिल्ली येथे संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. त्याखेरीज पुण्यातील डेक्कन कॉलेज, कर्नाटकातील बंगळुरु आणि आसाममधील गुवाहाटी अशा देशभरातील तीन ठिकाणी संस्थेची कार्यालये आहेत.

  • संस्थेच्या कामाचा विस्तार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघासह काश्मीर अशा दोन ठिकाणी नव्याने कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘आयसीएचआर’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. अरिवद जामखेडकर यांनी दिली. संस्थेच्या नियामक मंडळामध्ये १८ सदस्यांचा समावेश आहे. संस्थेमार्फत इतिहासविषयक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

  • संस्थेच्या कामांसाठी वार्षिक २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्या माध्यमातून इतिहासविषयक प्रकल्प, पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य़, वरिष्ठ संशोधकांना अनुदान, परदेशामध्ये शोधनिबंधाचे वाचन करण्यासाठी जाणाऱ्या अभ्यासकांना प्रवासखर्च असे उपक्रम राबविले जातात.

साहित्याचे पर्यायी नोबेल, असंतुष्ट बुद्धिवंतांची ‘न्यू अकॅडमी’ :
  • स्टॉकहोम : एक प्रभावशाली सदस्य लैंगिक शोषणाच्या आरोपात गुरफटून वाद निर्माण झाल्याने नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील १०० हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

  • रॉयल स्वीडिश अकादमीच्या ’पक्षपात, उद्दामपणा व लैंगिक व्यभिचारा’चा निषेध करत १०७ मान्यवर लेखक, प्रकाशक, कलावंत व पत्रकारांनी एकत्र येऊन यासाठी ‘ न्यू अ‍ॅकॉडमी’ची स्थापना केल्याचे एका संयुक्त निवेदनाव्दारे जाहीर केले.

  • साहित्यासाठीचा पर्यायी नोबेल पुरस्कार १० लाख क्रोनर (सुमारे १,३० लाख डॉलर) असेल. यासाठी लोकवर्गणी व देणग्यांमधून निधी उभा केला जाईल.

  • एरवी नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे १४ आॅक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल व ज्या दिवशी सर्व नोबेल पुरस्कारांचे स्वीडनच्या राजांच्या हस्ते वितरण होते त्याच दिवशी (१० डिसेंबर) हा पुरस्कारही वेगळ््या कार्यक्रमात प्रदान केला जाईल.

धोनीचे एकाच सामन्यात दोन विश्वविक्रम :
  • लंडन : विराट कोहलीच्या टीम इंडियाने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी मात केली.

  • या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माने ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक ठोकून भारताला हा सामना आणि मालिका जिंकून दिली.

  • नुकताच 500 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झालेल्या महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात दोन विक्रमांना गवसणी घातली. एकाच सामन्यात पाच झेल घेणारा धोनी एकमेव खेळाडू ठरला. शिवाय टी-20 मध्ये 50 पेक्षा जास्त खेळाडूंना माघारी धाडणारा तो एकमेव खेळाडू झाला आहे.

  • धोनीने आपल्या 93 व्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकूण पाच झेल घेतले. त्याच्या नावावर एकूण 54 झेल झाले आहेत.

  • दीपक चहरच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा झेल घेतला तेव्हा धोनीने आपल्या झेल घेण्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्टो आणि लिएम प्लंकेट यांचा झेल घेतला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

  • १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.

  • १८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे केली.

  • १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

  • २०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.

  • २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्म 

  • १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.

  • १८१९: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७)

  • १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

  • १९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)

  • १९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१४)

  • १९३८: हिंदी अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

  • १९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.

  • १९५०: युक्रेनचे ५वे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)

  • १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५)

  • १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

  • २००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.