चालू घडामोडी - ०९ जून २०१७

Date : 9 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कझाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी- नवाज शरीफ यांची भेट, एकमेकांकडून प्रकृतीची विचारपूस
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ या दोघांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे परस्परांची भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर संमेलनापूर्वी या दोन्ही नेत्यांनी परस्परांची भेट घेऊन एकमेकांच्या तब्यतेची विचारपूस केली.

  • विशेष म्हणजे दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान दोघांची भेट झाली आहे.

  • नवाज शरीफ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट होती. त्यामुळे मोदींनी शरीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर त्यांच्या आई व कुटुंबीयांबाबतही जाणून घेतले.

  • त्यावेळी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय स्तरावर चर्चा सुरू ठेवण्यावर सहमतीही बनली होती. परंतु, २०१६च्या सुरूवातीस पठाणकोट हल्ल्यामुळे दोन्ही देशातील संबंधात कटुता निर्माण झाली.

  • २०१६ मध्ये जुलै महिन्यात पुन्हा एकदा मोदी आणि शरीफ शांघाय सहकार्य संघटना बैठकीत समोरासमोर आले होते.

अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी आबासाहेब जऱ्हाड :
  • शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी (शहर) शासनाने नियुक्ती केली असून, उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांची अतिरिक्त पालिका आयुक्तपदी (पूर्व उपनगरे) नियुक्ती केली आहे.

  • आबासाहेब जऱ्हाड हे १९९७ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. तर सिंघल हे १९९७ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत.

राज्यातील ४७६ महाविद्यालये कॅशलेस :
  • मुख्यमंत्री कार्यालय व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे एप्रिलअखेरीस व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतील प्राचार्यांना पत्र पाठवून कॅशलेस व्यवहार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सुचविले होते. शुल्क आकारण्याची पद्धती; तसेच उपाहारगृहे व अन्य बाबींसाठी कॅशलेस व्यवहार व्हावेत, असे या पत्रात नमूद केले होते.

  • विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्था कॅशलेसकडे वळत असताना राज्यातही डिजिधन जनजागृती कार्यक्रम धडाक्‍यात राबविला जातोय.

  • तसेच या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री कार्यालय व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे महाविद्यालये कॅशलेसवर भर दिला जात असून, राज्यातील ४७६ महाविद्यालयांनी नोंदणी केली.

  • चांगली कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांचा सत्कार करणार असल्याचेही जाहीर केले होते. प्राचार्य व उपक्रम संयोजनाची जबाबदारी असलेल्या समन्वयकांच्या जबाबदारीचीही माहिती नमूद केली होती.

मतमोजणीला सुरुवात, पंतप्रधान थेरेसांना झटका :
  • ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. मतमोजणीत पंतप्रधान पंतप्रधान थेरेसा मे पिछाडीवर आहेत.

  • आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लेबर पार्टी २०५ जागांवर विजयी झाली असून कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने १९१ जागा जिंकल्या आहेत. 

  • एक्झिट पोल्सनुसार थेरेसा मे यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३२६ जागा मिळू शकतात. २०१५ मधील आकडेवारीशी तुलना करता या जागा कमी असतील. २०१५ मध्ये ३३१ जागा कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने जिंकल्या होत्या.

  • विरोधी नेता जेर्मी कोबिन यांना गेल्या निवडणुकीमधील मिळालेल्या २३२ च्या तुलनेत यावेळी २६६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

सर्वोत्तम विद्यापीठांत दिल्ली विद्यापीठचा प्रथम दहांत समावेश :
  • 'ब्रिक्‍स' देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाला १३१ ते १४० आणि आशियाई विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ १७६ व्या स्थानावर दाखविले आहे.

  • देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

  • 'क्‍यूएस' या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात २०१८ साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.

  • विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत ४८१-४९१ स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत ८०१ ते १००० असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ 'पुणे विद्यापीठ' असा उल्लेख केलेला आहे.

  • कर्नाटकच्या मनिपाल विद्यापीठाने खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमच देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

रोहण बोपन्नाचे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद :
  • रोहण बोपन्नाने कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.

  • बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज २-६, ६-२, १२-१० ने मोडून काढली.

  • भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • जॉर्ज स्टिफन्सन, आगगाडीचा जनक : ०९ जून १७८१

  • किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी : ०९ जून १९४७

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • बंदा बहादुर, शीख सेनापती : ०९ जून १७१६

  • प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू : ०९ जून १९९५

ठळक घटना

  • लालबहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून शपथविधी : ०९ जून १९६४

  • मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला : ०९ जून १९८६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.