चालू घडामोडी - ०९ मे २०१७

Date : 9 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मे पासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर :
  • आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त कोलंबोमध्ये १२ ते १४ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचाही समावेश आहे.

  • पतप्रधान मोदींचा हा श्रीलंकेचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात मोदी कॅंडीलाही भेट देणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याला ११ मे पासून सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात मोदी हे वेसाक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

  • तसेच या परिषदेला शंभर देशांतील सुमारे चारशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वेसाक हा बौद्ध कालगणनेतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो.

प्रा. विशाल यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर :
  • प्राध्यापक विशाल सध्या कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.

  • भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार देते. कांस्य पदक आणि २५ हजार रुपये रोख असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना, भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे (आयएनएसए) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड :
  • चॅंपियन्स स्पर्धेसाठी नवी दिल्लीत संघ निवड समितीची बैठक घेण्यात आली असून या बैठकीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (आयसीसी) सुरू असलेल्या महसूल वाटपाच्या वादात एक पाऊल मागे घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय संघाच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहभागावर शिक्कामोर्तब केले होते.

  • चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.

  • भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी.

सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त :
  • सोहेल महमूद हे सध्या तुर्कीत पाकिस्तानचे राजदूत आहेत. ते नवीन पदाची सूत्रे मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला घेणार आहेत.

  • भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली असून भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे.

  • अब्दुल बासित यांचा भारतातील तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला असल्याने त्यांच्या जागी सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फक्त नोटाबंदीने काळ्या पैशाला चाप बसणार नाही : संयुक्त राष्ट्र 
  • एकट्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा घालता येणार नाही, असे संयुक्त राष्ट्राने एका अहवालात म्हटले आहे. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी अधिक पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

  • ‘भारतीय बाजारातील काळ्या पैशांचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० ते २५ टक्के इतके आहे. एकूण काळ्या पैशांपैकी फक्त १० टक्के काळा पैसा हा रोख रकमेच्या स्वरुपात आहे,’ असे ‘इकॉनॉमिक अँड सोशल सर्व्हे ऑफ एशिया अँड पॅसिफिक २०१७’ या अहवालात संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

  • ‘डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्यास आणि रोख व्यवहारांना पर्याय मिळल्यास काळ्या पैशाच्या व्यवहारांना चाप बसेल. सरकारने नोटाबंदीच्या काळात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यावर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलत यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले होते.

मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने मेगा इव्हेंटची तयारी :
  • मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भाजपने मेगा इव्हेंटचं आयोजन केले असून २६ मे रोजी भाजपच्या प्रचार कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.  सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत असून केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, पीयूश गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची टीम कार्यक्रमाची रुपरेषा आखत आहे.

काय आहे भाजपचा मेगा इव्हेंट ?

  • मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रचार कार्यक्रम

  • २६ मे रोजी या कार्यक्रमाला सुरुवात होणार

  • दोन आठवड्यांसाठी हा कार्यक्रम असेल.

  • सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, भाजपच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी असतील.

  • केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळणाऱ्यांसाठी लाभार्थी संमेलनाचं आयोजन

  • मुख्यमंत्री चार संमेलनांना संबोधित करु शकतात. प्रत्येक राज्यात कार्यक्रम घेण्याची योजना

  • देशभरात संमेलनासोबत पत्रकार परिषदाही होणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना तीन वर्षाचा रिपोर्ट घेऊन प्रचाराला उतरण्याचे आदेश दिले

  • येत्या दोन दिवसात प्रचार कार्यक्रमाची अंतिम रुपरेषा तयार होईल

  • पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं नियोजन

  • केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, पीयूश गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची टीम कार्यक्रमाची रुपरेषा आखणार

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • विश्व थॅलस्सेमिया दिन
  • विजय दिन : रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.

जन्म, वाढदिवस

  • मेवाडचा प्रसिध्द वीरपुरुष महाराणा प्रताप : ०९ मे १५४०
  • दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार : ०९ मे १८१४
  • गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक : ०९ मे १८६६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • कर्मवीर भाऊराव पाटील : ०९ मे १९५९
  • तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस : ०९ मे १९८६
  • तलत मेहमूद, पार्श्वगायक : ०९ मे १९९८

ठळक घटना

  • मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरु झाली : ०९ मे १८७४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.