चालू घडामोडी - ०९ ऑक्टोबर २०१७

Date : 9 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मगावाचा दौरा :
  • वडनगरने मला विष प्यायला शिकवले असून नव्याने बांधलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर तसेच लसीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर मोदी यांनी जाहीर सभेतील भाषणात सांगितले.

  • पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या जन्मगावाला दिलेल्या पहिल्याच भेटीत नरेंद्र मोदी यांनी रविवारी रोड-शो करून त्यांच्या शाळेला भेट दिली, या शहराने आपल्याला ‘विष प्यायला’ शिकवले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

  • मोदी ज्या शाळेत शिकले, त्या बी.एन. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांनी शाळेच्या परिसरातील वाळू कपाळावर लावली, एकेकाळी वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकणाऱ्या मोदी यांनी गुजरातपासून दिल्लीपर्यंतच्या वाटचालीच्या आठवणी जागवल्या.

  • २००१ सालापासून १३ वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, दरम्यानच्या काळात काही लोकांनी ‘गरळ ओकल्यानंतरही’ भगवान शिवाच्या आशीर्वादामुळे २००१ सालापासून आपण देशाची सेवा करू शकलो, असे मोदी म्हणाले.

  • गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीनंतर मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर झालेल्या शाब्दिक हल्ल्यांचा याला संदर्भ होता.

मुंबईत जमीन देणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन जागतिक शांती केंद्रासाठी :
  • मांगी तुंगी येथे भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट विशाल मूर्तीची स्थापना, तसेच तेथील विकासासाठी शासनाने सहकार्य केले असून या कामाच्या दुस-या टप्प्यासाठीही सरकार मदत करेल.

  • जैन समाजाच्या प्रस्तावित जागतिक शांती केंद्रासाठी मुंबईत जागा निश्चित करून, ती या केंद्राकरिता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  • गोरेगाव येथे श्री ज्ञानमती माताजी यांच्या ६६व्या त्याग दिवस आणि ८४ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते, मांगी तुंगी येथील भगवान वृषभदेव यांच्या विशाल मूर्तीमुळे देशाला जागतिक कीर्ती मिळाली असून, याचे सारे श्रेय श्री ज्ञानमती माताजींचे आहे.

  • माताजींनी समाजासाठी मोठा त्याग केला. चारशे ग्रंथांची निर्मिती केली असून त्यांच्या या ग्रंथामुळे आपल्या जीवनाचे सार्थक होण्यास मदत होते, जैन समाजाने जगाला नेहमीच दातृत्वाची कृतिशील शिकवण दिली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • महोत्सवास आमदार मंगल प्रभात लोढा, राज पुरोहित, राजेंद्र पाटनी, तसेच रवींद्र कीर्ती स्वामी, आर. के. जैन, संजय बोरा, सुरेश जैन, मूर्ती समितीचे अनिल जैन उपस्थित होते.

अदानी विलमार कंपनीच्या प्रस्तावित खाणींना विरोध :
  • अदानी विलमार कंपनीच्या प्रस्तावित खाणींना विरोध करण्यासाठी ऑस्ट्रेलियात विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली असून राजधानी सिडनीसह, ब्रिस्बेन, मेलबर्न, गोल्डकोस्ट आणि पोर्ट डग्लसमध्ये हजारो नागरिकांनी अदानींच्या खाणींना विरोध केला आहे.

  • वेस्टर्न क्वीन्सलँडमध्ये होऊ घातलेल्या या खाणी ऑस्ट्रेलियाचं पर्यावरण दूषित करणार असल्याचा आरोप निदर्शन करणाऱ्या नागरिकांनी केला असून इतकंच नाही, तर या खाणींमुळे दी ग्रेट बॅरियर रीफमधल्या समुद्राखालची जैवविविधता नष्ट होणार असून, हा प्रकल्प ग्लोबल वॉर्मिंगलाही हातभार लावत असल्याचा दावा आहे.

  • फोर कॉर्नर्सच्या टीमने ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल एबीसीच्या माध्यमातून अदानी कंपनीचा भारतातला इतिहास जगासमोर आणल्यानंतर या प्रकल्पाला विरोध वाढला आहे.

  • या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला होता, पण प्रत्यक्षात तसं होणार नसल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे.

अत्यंत स्वस्त दरात फोर-जी फिचर फोन लॉन्च करणार : नोकिया
  • एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या नोकिया ब्रँडच्या माध्यमातून अत्यंत स्वस्त दरात फोर-जी फिचर फोन लॉन्च करणार असून यामुळे जिओ फोनला आव्हान उभे राहू शकते, तर एकंदरीतच या क्षेत्रातील स्पर्धादेखील यामुळे तीव्र होण्याचे संकेत आहेत.

  • रिलायन्स कंपनीच्या अत्यंत किफायतशीर जिओफोनमुळे अन्य कंपन्यांचे धाबे दणाणले असून मुळातच नेट न्युट्रिलिटीचा दुसरा अध्याय स्मार्टफोनच्या माध्यमातून सुरू होणार असल्याचे कधीपासूनच स्पष्ट झाले आहे.

  • या संदर्भात लोकमतवर आधीच 'नेट न्युट्रिलिटी २.०: आता स्वस्त स्मार्टफोनच्या मैदानावरील लढाई'  या शीर्षकाखाली लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

  • सेल्युलर कंपन्या एकीकडे स्वस्त डाटा प्लॅन्स जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असून दुसरीकडे किफायतशीर मोबाइल हँडसेटही दिले जात आहेत.

  • यातून मिळवलेल्या ग्राहकांना काय द्यावे आणि काय नको हे सर्वाधिकार त्याच कंपनीच्या हातात राहणार असून यामुळे भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये जिओफोनमुळे हँडसेट उत्पादनाची स्पर्धा सुरू झाली आहे.

  • एयरटेल लवकरच स्वस्त मोबाईल हँडसेट लाँच करणार असून बीएसएनएलनेही काही भारतीय कंपन्यांच्या मदतीने किफायतशीर मोबाइल बाजारपेठेत उतारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, तर आयडियानेही याची चाचपणी सुरू केली असताना या क्षेत्रात आता नोकिया कंपनीने उडी घेतली आहे.

कोणत्याही क्षणी भारत युद्धासाठी सज्ज बी.एस. धनोआ :
  • वायुसेनेची ताकद वाढल्याचेही स्पष्ट कोणत्याही क्षणी भारत युद्धासाठी सज्ज असल्याचा पुनरुच्चार रविवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी केला.

  • वायुसेना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलले असून देशाच्या सुरक्षेबाबत कोणतेही संकट निर्माण झाले तर त्याचा सामना करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे.

  • तातडीच्या सुचनेनंतरही (शॉर्ट नोटीस) आम्ही युद्धासाठी सज्ज होऊ शकतो. वायुसेनेची ताकद वाढली आहे लष्कर आणि नौदल यांच्या साथीने आम्ही कोणत्याही समस्येला तोंड द्यायला तयार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक टपाल दिन

  • स्वातंत्र्य दिन - युगांडा

जन्म /वाढदिवस

  • ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म : ०९ ऑक्टोबर १८७७

  • मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म : ०९ ऑक्टोबर १८९७

  • भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म : ०९ ऑक्टोबर १९२४

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन : ०९ ऑक्टोबर १९८७

  • भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन : ०९ ऑक्टोबर २०१५

ठळक घटना

  • विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला : ०९ ऑक्टोबर १९६०

  • ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून अँथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली : ०९ ऑक्टोबर २००१

  • अफगाणिस्तानमध्ये निवडणूका : ०९ ऑक्टोबर २००४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.