चालू घडामोडी - ०९ सप्टेंबर २०१७

Date : 9 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राम रहिमच्या डेऱ्यात वापरले जायचे प्लॅस्टिकचे चलन :
  • हरयाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची तपासणी सुरु करण्यात आली आहे आतापर्यंतच्या तपासणीत पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना रोख रक्कम आढळली आहे.

  • याशिवाय मुख्यालयातील दोन खोल्या सील करण्यात आल्या असून तपासणीदरम्यान पोलिसांना काही हार्ड डिस्क सापडल्या आहेत.

  • डेऱ्यात वापरले जाणारे प्लॅस्टिकचे चलनदेखील तपासात सापडले असून याच चलनाच्या माध्यमातून डेऱ्यातील सर्व व्यवहार केले जायचे, अशी माहिती समोर आली आहे.

  • डेरा परिसरातील दुकानांमध्ये प्लॅस्टिकचे चलन स्वीकारले जायचे. या चलनांवर ‘धन धन सद्गुरु तेरा ही आसरा, डेरा सच्चा सौदा सिरसा,’ असे वाक्य छापण्यात आले आहे.

  • डेऱ्याची तपासणी करणाऱ्या पोलीस पथकाला १० रुपये मूल्य असलेले केशरी रंगाचे आणि १ रुपये मूल्य असलेले निळे चलन आढळून आले आहे.

  • ७ हजार जुन्या आणि १,२०० नव्या नोटादेखील पोलिसांना डेऱ्याच्या तपासणीदरम्यान सापडल्या आहेत.

पाकच्या सर्वात मोठ्या बँकेची न्यूयॉर्कमधील शाखा बंद :
  • पाकिस्तानला दहशतवादी संघटनांसोबतचे लागेबंधे चांगलेच भोवले आहेत कारण अमेरिकेतील न्यूयॉर्क वित्तीय विभाग (DFS) ने पाकिस्तानच्या हबीब बँकेच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसचं शटर डाऊन केलं आहे.

  • तसेच नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेला तब्बल १४०० कोटींचा दंडही ठोठावला असून गेल्याच महिन्यात डीएसफने बँकेला ४ हजार कोटीचा दंड ठोठावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं स्पष्ट केलं होतं.

  • पण आता १४०० कोटीच्या दंडासह बँकेला तत्काळ आपले सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेशही डीएसएफने दिले आहेत, बँकेकडून मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचा डीएफएसचा आरोप आहे.

  • डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बँकेला आपली चूक सुधारण्याची संधी दिली गेली होती बँकेने त्याकडे दुर्लक्ष केले, अन् चूक सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत त्यामुळे त्यांना याची मोठी किमत चुकवावीच लागेल.

१० ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य अन्यथा या योजना सेवांचे दरवाजे बंद : 
  • आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन कार्डशी लिंक करावे लागेल, आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत वाढवली आहे. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल.

  • जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार असून अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

  • अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणारअसून बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य.

  • ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे, यासाठी सरकारने ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे.

  • वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.

  • ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे फसवणूक होऊ नये यासाठी हे केले आहे.

  • मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे.

उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ :
  • सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नसून विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले.

  • त्यातही गोंधळ असल्याने, आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.

  • मुंबई विद्यापीठाने शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढले असून या परिपत्रकात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखेत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे.

  • त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वाचे काही निकाल जाहीर केले, पण या निकालातही मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला आहे.

  • आतापर्यंत तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे समोर आले आहे.

सानिया मिर्झा आणि शुआई पेंगचं आव्हान संपुष्टात यूएस ओपन :
  • मार्टिना हिंगिस- युंग जान चान या जोडीनं त्यांच्यावर ६-४,६-४ असा विजय मिळवला असून या विजयसाह मार्टिना हिंगिस- युंग जान चाननं महिला दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.  

  • यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारतीय स्टार सानिया मिर्झा व पेंग या जोडीचा पराभव झाला आहे.

  • सानियानं चीनच्या शुआई पेंगसोबत खेळताना उपांत्यपूर्व सामन्यात टिमिया बाबोस- आंद्रिया लावास्कोवा यांचा ७-६,६-४ असा पराभव केला होता.

  • ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत बाहेर पडलेल्या सानियाची यंदा ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे, सानियाने मागच्यावर्षी आठ जेतेपद पटकविले त्यापैकी पाच जेतेपद मार्टिना हिंगिससोबत होते.

  • वर्षाअखेर दुहेरी रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर होती पण हिंगिसपासून विभक्त होताच वारंवार जोडीदार बदलल्याने सानिया नवव्या स्थानावर घसरली.

दिनविशेष : 

जागतिक दिवस 

  • प्रजासत्ताक दिन : उत्तर कोरिया : ०९ सप्टेंबर १९४८

  • स्वातंत्र्य दिन : ताजिकिस्तान : ०९ सप्टेंबर १९९१

जन्म /वाढदिवस

  • विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी : ०९ सप्टेंबर १९७४

  • अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता : ०९ सप्टेंबर १९६७

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक : ०९ सप्टेंबर २०१०

ठळक घटना

  • सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले : ०९ सप्टेंबर १९९४

  • व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला : ०९ सप्टेंबर २००१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.