चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ सप्टेंबर २०१९

Updated On : Sep 09, 2019 | Category : Current Affairsतब्बल १८ वर्षांनी जुळून आला ‘हा’ योगायोग :
 • अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने रविवारी लौकिकाला साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेचा अ‍ॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. २०१७ च्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असे यश मिळवले होते.

 • ऑस्ट्रेलियाने टीम पेनच्या नेतृत्वाखाली हा सामना जिंकला आणि मालिकेत आघाडी घेतली. या विजयामुळे तब्बल १८ वर्षांनी ऑस्ट्रेलियासाठी एक सुखद योगायोग जुळून आला. २००१ साली स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंडमधून अ‍ॅशेस ट्रॉफी स्वत:कडे आणण्यात यश मिळवले होते. त्याचप्रकारे टीम पेन ने यंदा इंग्लंडमध्ये स्पर्धा सुरू असताना ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.

 • ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १९७ धावांत आटोपला. शनिवारच्या २ बाद १८ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जो डेन्ली यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६६ धावांची भागीदारी रचली; परंतु कमिन्सचे दुसऱ्या स्पेलमध्ये आगमन होताच इंग्लंडचा डाव कोसळला.

रायगड जिल्ह्य़ात वीस वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद :
 • रायगड जिल्ह्यत यंदा पावसाने ४ हजा १३६ मिलीमीटरची सरासरी गाठली आहे. गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यत नोंदवला गेलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. सप्टेंबर महिन्याच्या ४ तारखेपर्यंत जिल्ह्यत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा १३१ टक्के पाऊस पडला आहे.

 • रायगड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३ हजार १४२ मिलीमीटर आहे. मात्र यावर्षी जिल्ह्यत सरासरी ४ हजार १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा १ हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत माथेरान मध्ये १९८ टक्के, पेणमध्ये १६८ टक्के, तळा येथे १६० टक्के तर माणगावमध्ये १५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

 • यापुर्वी जिल्ह्यत २०१६ मध्ये ३ हजार ९३० मिमी, तर २०१५ मध्ये ३ हजार ८५३ मिमी पाऊसाची नोंद झाली होती. मात्र गेल्या २० वर्षांत कधीही पावसाने वार्षिक सरासरीचा ४ हजार मिलीमिटरचा टप्पा ओलांडला नव्हता. यावर्षी मात्र जिल्ह्यत सणसणीत पाऊस झाला. जून महिन्यात सरासरीच्या ९१ टक्के, जुलै महिन्यात सरासरीच्या १६१ टक्के, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १३२ टक्के तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात १०५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

 • जून महिन्यात ६०६ मिमी, जुलै महिन्यात १८७५ मिमी, ऑगस्ट महिन्यात ११७५ मिमी तर सप्टेंबर महिन्यात पाच दिवसात ४७८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. २५ जुलै २००५ मध्ये जिल्ह्यत सर्वाधिक पावसाची नोंद पोलादपूर येथे झाली होती. चोवीस तासात तिथे ५८९ मिलीमिटर पाऊस नोंदविला गेला होता. जिल्ह्यात २४ तासात आजवर नोंदविला गेलेला हा सर्वाधिक पाऊस होता. यावर्षी २७ जुलै रोजी माथेरान मध्ये ४३४ मिमी तर पेण मध्ये ४०० मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यत गेल्या वीस वर्षांत २४ तासात नोंदविला गेलेला हा दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे.

देशभरात आता ‘इस्रो’ची लाट : पंतप्रधान ;
 • चंद्रयान-२ या इस्रोच्या अभियानाने देशाने एकत्र जोडण्याचं काम केलं आहे. देशवायीस आता यश आणि अपयशाच्या पलिकडे पाहत आहेत. आता देशभरात केवळ इस्रो स्पिरिट आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. रविवारी रोहतकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला ते संबोधित करत होते.

 • ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी संपूर्ण देश चंद्रयान-२ मोहिमेसाठी आपल्या टिव्हीवर नजर ठेवून बसला होता. चंद्रयान लँड होण्यावर सर्वांची नजर होती. त्यावेळी त्या १०० सेकदांनी संपूर्ण देशाला एकत्र आणलं. आता देशभरात केवळ इस्रोची लाट आहे. देश आता नकारात्मक गोष्टी स्वीकारायला तयार नाही. ज्याप्रकारे स्पोर्ट्समॅन स्पिरीटबद्दल चर्चा होते, तशी आता सर्वत्र इस्रो स्पिरीटची चर्चा होईल, असं मोदी यावेळी म्हणाले.

 • देश आता पुरूषार्थ आणि पराक्रमाची पूजा करतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. विरोधकांना अपयश दाखवण्यातच आनंद मिळतो. आशा आणि विश्वासाची ताकद काय असते, त्याचं सामर्थ्य काय असतं हे देशाने १०० सेकंदांमध्ये दाखवून दिल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण झाल्याचाही उल्लेख केला. हे १०० दिवस म्हणजे परिवर्तन, संकल्प, सुधारणा आणि उत्तम दृष्टीकोनाचे दिवस असल्याचे ते म्हणाले. ज्या दिवशी केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत, त्याच दिवशी हरियाणाचा दौरा करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

नासा- इस्रोच्या सौरमाला मोहिमेचा प्रस्ताव :
 • चांद्रयान २ मोहिमेतून अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढे इस्रोसमवेत सौर मालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्यास आम्ही तयार आहोत, असे नासाने स्पष्ट केले.

 • चांद्रयान २  या मोहिमेत भारताने केलेल्या कामगिरीचे नासाने कौतुक करताना म्हटले आहे,की अवकाश मोहिमा कठीणच असतात. चांद्रयान २ मोहिमेत यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते पण त्यात अपयश आले असले तरी जो टप्पा गाठला गेला तेही काही कमी महत्त्वाचे नाही.

 • ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकारी अलाइस जी वेल्स यांनी  सांगितले, की चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न हे मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो. भारतासाठी हे मोठे पाऊल आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली बरीच माहिती यातून निर्माण होणार आहे. भारत त्याच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

 • नासाचे माजी अवकाशवीर जेरी लिनेन्गर यांनी असे म्हटले आहे, की भारताने चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा होता. त्यात अपयश आले असले तरी या अनुभवाचा फायदा पुढील मोहिमात होणार आहे, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. भारताने अतिशय अवघड अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लँडर चांद्रभूमीवर उतरत असताना सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित पार पडले पण नंतर ते नियंत्रणाबाहेर गेले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दिनविशेष :
 • हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.

महत्वाच्या घटना 

 • १५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

 • १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

 • १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

 • १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

 • १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 • १९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

 • १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

 • १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

 • १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

 • १९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

 • २००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

 • २००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.

 • २०१२:भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

 • २०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

 • २०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.

 •  

 • जन्म 

 • १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)

 • १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)

 • १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

 • १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

 • १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

 • १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

 • १९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

 • १९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

 • १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

 • १९५०: संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.

 • १९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.

मृत्यू 

 • १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

 • १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

 • १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)

 • १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)

 • १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)

 • १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

 • १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

 • १९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

 • २००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)

 • २०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)

 • २०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)