चालू घडामोडी - १० जुलै २०१७

Date : 10 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड्स’ :
  • संसदीय कामकाजात अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या देशभरातील दिग्गजांना ‘लोकमत समूहा’तर्फे ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड्स २०१७’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

  • बुधवार, १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीत मौलाना आझाद रोडवरील विज्ञान भवनातील ‘प्लेनरी’ सभागृहात हा सोहळा रंगणार आहे.

  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री व्यंकय्या नायडू, राज्यसभेचे उपसभापती प्रो. पी. जे. कुरियन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील या मान्यवरांची विशेष उपस्थिती ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्डस’ सोहळ्याला लाभणार आहे.

  • ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे या सोहळ््याचे निमंत्रक आहेत.

अहमदाबाद शहरला वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जा :
  • अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह २० देशांनी पाठिंबा दिला असून युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.

  • पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या ४१ व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.

  • अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.

  • अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची २६ सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत.

मिश्र दुहेरीत सानिया विजयी :
  • सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडिग या चौथ्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीत युसुके वातानुकी आणि मकोतो निमोमिया या जपानच्या जोडीचा १ तास १८ मिनिटे रंगलेल्या लढतीत ७-६, ६-२ असा पराभव करताना तिसरी फेरी गाठली.

  • भारताची टेनिस तारका सानिया मिर्झाने येथे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत तिसरी फेरी गाठली.

  • भारत आणि क्रोएशियाच्या जोडीने दुसऱ्या फेरीच्या लढतीत सहा वेळेस बिनतोड सर्व्हिस केली तर चार वेळेस दुहेरी चुकाही केल्या.

  • या जोडीने एक तास आणि ४५ मिनिटांच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर ६-३, ३-६, ६-४ अशी मात केली. या जोडीची तिसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस आणि तैपईच्या युंग यान चेन या तृतीय मानांकित जोडीविरुद्ध गाठ पडेल.

एनआरएआयच्या अध्यक्षपदी रानिंदरसिंग यांची फेरनिवड :
  • माजी आंतरराष्ट्रीय ट्रॅप नेमबाज रानिंदरसिंग यांची राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) अध्यक्षपदी फेरनिवड झाली.

  • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे पुत्र असलेले ४८ वर्षांचे रानिंदर यांनी मोहालीत झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी शामसिंग यादव यांचा ८९-१ असा दारुण पराभव केला.

  • महासचिवपदी डी.व्ही. सीताराम राव यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली. सिनियर उपाध्यक्ष म्हणून ओडिशातील बिजदचे खा.के. एन. सिंगदेव हे एकमताने निवडून आले.

  • कोषाध्यक्षपदी करणकुमार निर्वाचित झाले. अध्यक्षांसह उपाध्यक्षपदाच्या आठ व सचिवांच्या सहा पदांसाठी निवडणूक पार पडली.

  • तसेच रानिंदर हे दिग्विजयसिंग यांच्या निधनानंतर संघटनेचे अध्यक्ष बनले होते.

बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा :
  • हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे.

  • गतवर्षी ०८ जुलै रोजी भारतीय लष्कराच्या जवानांनी बुरहान वानीचा खात्मा केला होता.

  • बुरहान वानीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तान सरकारला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी खडे बोल सुनावले आहेत.

लेव्हिसच्या शतकाने विंडीज विजयी :
  • एव्हिन लेव्हिसची (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) शतकी खेळी व त्याने मार्लोन सॅम्युअल्ससह (नाबाद ३६) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला.

  • भारताने ६ बाद १९० धावांची दमदार मजल मारली होती. विंडीजने विजयासाठी आवश्यक धावा १८.३ षटकांत एक गडी गमावित पूर्ण केल्या.

  • भारतातर्फे कुलदीप यादवचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली. कुलदीपने ख्रिस गेलला (१८) माघारी परतवले.

  • प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर विराट कोहली (३९ धावा, २२ चेंडू) आणि शिखर धवन (२३ धावा, १२ चेंडू) यांनी सलामीला ६४ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली.

  • तीन चेंडूंच्या अंतरात हे दोघेही माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक (४८ धावा, २९ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) आणि ऋषभ पंत (३८ धावा, ३५ चेंडू) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. रवींद्र जडेजा (नाबाद १३) व रविचंद्रन अश्विन (नाबाद ११) यांनी संघाला १९० धावांची मजल मारून दिली. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : बहामा.

  • सैन्य दिन : मॉरिटानिया.

जन्म, वाढदिवस

  • सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू : १० जुलै १९४९

  • गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार : १० जुलै १९२३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जयवंत कुलकर्णी, मराठी गायक : १० जुलै २००५

  • डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक : १० जुलै १९६९

ठळक घटना

  • कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना : १० जुलै १८००

  • तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना : १० जुलै १९२५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.