चालू घडामोडी - १० जून २०१७

Date : 10 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'दंगल' आवडला, चीनच्या राष्ट्रपतींची मोदींकडे प्रतिक्रिया : 
  • दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोगाबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी शी जिनपींग यांनी दंगल सिनेमा चीनमध्ये चांगली कमाई करत असल्याचं सांगितलं. त्यांनी स्वतः हा सिनेमा पाहिला आणि तो त्यांना आवडला,’ अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कझाकस्तानच्या दौऱ्यावर असून पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली.

  • या भेटीमध्ये दोन्ही देशातील संबंध आणि व्यापारावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली, शिवाय दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोग वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

  • चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिजस्तान, उज्बेकिस्तान आणि ताजिकिस्तान या संघटनेचे सदस्य होते.

भारतीय संघ गतविजेता असला तरी अजिंक्य नाही ! विराट कोहली
  • भारताने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेपुढे ३२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेच्या फलंदाजांनी केवळ तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ते पार केले. त्यांच्या या कामगिरीबाबत कोहली म्हणाला, ‘‘आमच्या गोलंदाजांना मी बिलकूल दोष देणार नाही.

  • ‘भारतीय संघ गतविजेता असला तरी आम्ही अजिंक्य नाही. कधी तरी आमचाही पराभव होऊ शकतो. अर्थात, श्रीलंकेच्या विजयाचे श्रेय सर्वस्वी त्यांच्या फलंदाजांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीस द्यावे लागेल,’’ असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर दिले.

  • खेळपट्टीपासून जेवढे साहाय्य मिळत होते, तेवढय़ाचा उपयोग करीत त्यांनी चांगली गोलंदाजी केली. लंकेच्या फलंदाजांनी नियोजनबद्ध खेळ केला.

  • दुसऱ्या विकेटसाठी त्यांच्या फलंदाजांनी केलेली शतकी भागीदारीच खेळाला कलाटणी मिळून देणारी ठरली. श्रीलंकेनेही यापूर्वी विश्वविजेतेपद मिळवले आहे.

टाटा मोटर्समध्ये 'साम्य'वादाचा अंमल :
  • देशातील सर्वांत मोठी ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • कंपनीत टीमवर्कला वाव मिळावा आणि कर्मचाऱ्यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीचे सर्व कर्मचारी एकाच स्तरावर (समान) येणार आहेत.

  • कंपनीत यापुढे कोणीही बॉस नसेल आणि सर्व जण केवळ कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. टाटा मोटर्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदे बरखास्त करण्यात येणार आहेत.

  • कंपनीने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे पद आणि पदानुक्रमाचा विचार न करता काम करण्याची सर्वांना संधी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

  • टाटा मोटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे.

‘आधार’ असेल तर सक्ती; नसलेल्यांना मात्र सवलत :
  • आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असणारा कायम खाते क्रमांक (पॅन) आणि प्राप्तिकर विवरणपत्रांसाठी (आयटी रिटर्न्स) आधार क्रमांक सक्तीचा करण्याचा केंद्र सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अंशत: वैध ठरविला.

  • त्यामुळे आधार क्रमांक असलेल्यांना तो ‘पॅन’ व विवरणपत्रांशी १ जुलैपर्यंत जोडणे क्रमप्राप्त झाले आहे; पण आजतागायत आधार न काढलेल्यांवर तशी कोणतीही सक्ती नसेल.

  • न्यायाधीश ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी दिला. आधार सक्तीचे करणारे प्राप्तिकर कायद्यातील १३९ अ अ कलम वैध ठरविताना आणि कायदे करण्याचा संसदेचा विशेषाधिकार मान्य करताना खंडपीठाने दिलेला दिलासा या टप्प्यावर हंगामी स्वरूपाचा आहे. कारण हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठापुढे सध्या चालू असलेल्या मूळ याचिकेच्या निकालापर्यंतच वैध असेल.

  • मूळ खटल्याच्या या निकालावरच पॅन व विवरणपत्रासाठीची सक्ती अवलंबून राहणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. १ जुलैपर्यंत आधार क्रमांक जोडला नाही तर पॅन क्रमांक अवैध ठरविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

भिवंडीच्या महापौरपदी जावेद दळवी यांची निवड :
  • भिवंडीच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जावेद दळवी विजयी झाले, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड झाली.

  • विशेष महासभेच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे होते, तर या सभेसाठी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे व आयुक्त योगेश म्हसे उपस्थित होते.

  • महापौरपदासाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विलास पाटील, सुमित पाटील, मदन पाटील यांच्यासह पाच जणांनी अर्ज मागे घेतल्याने केवळ दळवी व टावरे रिंगणात होते.

  • सदस्यांनी हात वर करून मतदान केले. त्यामध्ये दळवी यांना ६२, तर टावरे यांना २८ मते मिळाली.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे कायम :
  • भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्यात येणार आहे.

  • सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाची सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे त्यांनी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • तसेच या तीन सदस्यीय समितीची बैठक झाली. या बैठकीत अनिल कुंबळेच्या जागी दुस-या प्रशिक्षकाची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक दृष्टीदान दिन : १० जून १९२४

जन्म, वाढदिवस

  • जनरल जयंतीनाथ चौधरी, भारताचे लष्करप्रमुख : १० जून १९०९

  • राहुल बजाज, प्रसिध्द उद्योगपती : १० जून १९३८

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • फुलवंतीबाई झोडगे, सामाजिक कार्यकर्त्या : १० जून २००१

ठळक घटना

  • ‘मिग’ या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती : १० जून १९६६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.