चालू घडामोडी - १० ऑक्टोबर २०१७

Date : 10 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार रिचर्ड थेलर यांना :
  • यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला असून व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल थेलर यांचा सन्मान करण्यात आला.

  • १९४५ साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या ७२ व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले असून अर्थशास्त्राचं मानसशास्त्र समजून सांगणात थेलर यांचा हातखंडा आहे, त्याबद्दलही नोबेल समितीने थेलर यांची निवड केली.

  • वैयक्तिक निर्णय क्षमतेचं आर्थिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण यांच्यातील दुवा म्हणून रिचर्ड थेलर यांचं काम मोठं आहे, असं नोबेल समितीने म्हटलं १९९८ मध्ये भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला होता.

  • आर्थिक कुवत आणि मानसिक स्थिती यांच्यातील मानवी संभ्रमावस्थेबाबत रिचर्ड थेलर यांनी केलेलं विश्लेषण हे आर्थिक क्षेत्रात प्रमाण मानण्यात येत असून यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचं लक्ष लागलं होतं.

आधार कार्डची सक्ती आता मोदींच्या कार्यक्रमासाठीही :
  • देशातील अनेक सेवासुविधांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असून यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे.

  • पटना विद्यापीठातील मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणाऱ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

  • ‘द टेलिग्राफ’ने याबद्दलचे वृत्त दिले असून शनिवारी पंतप्रधान मोदी पटना विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

  • याआधी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने रुग्णांना दाखल करुन घेताना आधार कार्ड सक्तीचे केले असून याच पार्श्वभूमीवर पटना विद्यापीठानेही मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे.

  • जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे विद्यापीठाच्या उपकुलगुरु डॉली सिन्हांनी दिली, या कार्यक्रमाला केवळ पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि पीएचडी करणारे विद्यार्थीच उपस्थित राहू शकतात.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज :
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंतच्या पूर्णपणे वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला असून यापूर्वी भारताने एकदिवसीय मालिकेतही ४-१ असा विजय मिळवला होता.

  • त्यानंतर पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीतही भारताची कामगिरी अव्वल दर्जाची झाली होती, ऑस्ट्रेलियाच्या संघाला दौरा संपत आला असतानाही अजूनही सूर गवसलेला दिसत नाही, पण भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखून चालणार नाही.

  • पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताच्या गोलंदाजांचा मारा अचूक आणि भेदक होता, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोन्ही युवा गोलंदाजांनी सुरेख मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून दूर लोटले होते.

  • फलंदाजीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली असून रोहित शर्माने संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली होती, त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

  • फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यांनी जर हाच फॉर्म कायम ठेवला तर त्यांना मालिका विजय मिळवता येणे कठीण नसेल.

पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली :
  • पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांना सोमवारी पहाटे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) पथकाने अटक केली.

  • पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे, पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात खटले दाखल करण्याचे आदेश पाकमधील सुप्रीम कोर्टाने जुलैमध्ये दिले होते.

  • यानंतर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं, सोमवारी पहाटे शरीफ यांची मुलगी मरियम आणि जावई सफदर हे दोघे कतार एअरलाईन्सच्या विमानाने बेनझिर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते.

  • मरियम यांच्या स्वागतासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, शरीफ कुटुंबियांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही सुरु होती.

  • याच दरम्यान नॅबच्या सहा अधिकाऱ्यांचं पथक विमानतळावर पोहोचलं आणि त्यांनी सफदर यांना अटक केली आहे तर मरियम यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

एचपी कंपनीने आपल्या पव्हिलियन पॉवर या मालिकेत तीन नवीन नोटबुक :
  • एचपी पव्हिलीयन पॉवर मालिकेतील या तिन्ही नोटबुक मॉडेल्समध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स असून हे सर्व टु-इन-वन या प्रकारातील आहेत, अर्थात ते लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे.

  • या सर्व मॉडेल्समध्ये सातव्या पिढीतील अत्यंत गतीमान असे कोअर आय ५/ आय ७ प्रोसेसर देण्यात आले असून याच्या जोडीला ४ जीबी एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० ग्राफीक कार्डही असेल. 

  • उत्तम दर्जाच्या ध्वनीसाठी यात एचपी ऑडिओ बुस्टसह बी अँड ओ प्ले ही प्रणाली देण्यात आली आहे, यातील बॅटरी एचपीच्या फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने सज्ज असून ती दीड तासात ९० टक्के चार्ज होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

  • एचपी पव्हिलीयन पॉवर मालिकेतील सर्व मॉडेल्समध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजे फुल हाय डेफिनेशन क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे.

  • यात १२८ जीबी इतके एसएसडी तर एक टिबी इतके हार्ड डिस्कचे स्टोअरेज असेल, हे सर्व नोटबुक विंडोज १० प्रणालीवर चालणारे असून यात युएसबी टाईप सी, युएसबी ३.१, एचडीएमआय, मायक्रो-एसडी कार्ड रीडर, हेडफोन जॅक आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

  • यात वाय-फाय कनेक्टिव्हिटीही असेल, या सर्व मॉडेल्समध्ये एमएस ऑफीस होम आणि एमएस ऑफीस स्टुडंट - २०१६ एडिशन प्रदान करण्यात आली आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • राष्ट्र दिन - फिजी

  • स्वास्थ्य दिन - जपान

जन्म /वाढदिवस

  • भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म : १० ऑक्टोबर १९१२

  • सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म : १० ऑक्टोबर १९१६

  • चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म : १० ऑक्टोबर १९५४

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले : १० ऑक्टोबर २०००

  • गझल गायक जगजित सिंग यांचे निधन : १० ऑक्टोबर २०११

ठळक घटना

  • श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले : १० ऑक्टोबर १९५४

  • आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश : १० ऑक्टोबर १९९८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.