चालू घडामोडी - १० सप्टेंबर २०१७

Date : 10 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राचा वीजनिर्मिती मध्ये देशात सहावा क्रमांक २०१६-१७ :
  • वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर असून त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागतो.

  • २०१४-१५ मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा असून राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे.

  • २०१६-१७ मध्ये डिसेंबरपर्यंत राज्यात ८२ हजार ४४१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. एकूण वीजनिर्मितीत 'महानिर्मिती'चा वाटा ४१.९ टक्के असून, त्याखालोखाल अदानी पॉवर कंपनीचा वाटा

  • महाराष्ट्रात २०१५-१६ मध्ये एकूण वीजनिर्मितीत पूर्वीच्या वर्षापेक्षा ९.६ टक्के इतकी वाढ झाली असून, १ लाख १३ हजार ७८७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

  • १७.६ टक्के, नवीकरणीय ऊर्जा ७.६ टक्के, जेएसडब्ल्यू एनर्जी ७.४ टक्के, टाटा पॉवर ७.१ टक्के, रतन इंडिया पॉवर ५.४ टक्के, व्हीआयपी बुटीबोरी व एम्को पॉवर प्रत्येकी ३.५ टक्के आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर ३.१ टक्के व इतर २.९ टक्के असा होता.

आज होणार टीम इंडियाची निवड आॅस्ट्रेलिया संघ चेन्नईत दाखल :
  • १७ सप्टेंबर  रोजी होणा-या ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथसह आॅस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची दुसरी तुकडी दाखल झाली आहे.

  • स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यासह संघातील पाच अन्य खेळाडू ढाका येथून मुंबईमार्गे चेन्नईला पोहोचले असून बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेला १७ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

  • खेळाडू विमानतळावरून संघाचे निवासस्थान असलेले पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले आहेत संघाचे मुख्य मार्गदर्शक डेरेन लेमन बांगलादेश मालिकेनंतर आॅस्ट्रेलियाला गेले.

  • सहायक मार्गदर्शक डेव्हिड साकेर भारताविरुद्धच्या वन डे, टी-२० सामन्यांसाठी संघाची जबाबदारी सांभाळतील या मालिकेसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे.  

न्या. अरुण चौधरी यांची देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीचे अध्यक्षपदी नियुक्ती :
  • मुंबई उच्च न्यायालयातून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात बदली होऊन गेलेले न्यायमूर्ती अरुण चौधरी यांची देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • ५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांना न्यायमूर्तिपदी कायम करण्यात आले असून मुख्य न्यायमूर्ती एस.जे. वझीफदार यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

  • २ एप्रिल १९५७ रोजी वर्धा येथे जन्मलेले न्या. चौधरी यांनी मुंबईतील शासकीय विधी विद्यालयातून एलएल. बी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांची ८ सप्टेंबर २००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

  • या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान न्यायमूर्ती चौधरी यांना मिळाला असून चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीमध्ये भारतासह श्रीलंका व बांगलादेश येथील न्यायाधीशांनाही त्यांच्या विनंतीवरून प्रशिक्षण दिले जाते.

बीसीसीआयने भरला ४४ लाखांच्या कराचा पहिला हप्ता : जीएसटीचा दणका
  • जुलै महिन्यात ४४,२९,५७६ रुपये कर भरल्याचे बीसीसीआयने वेबसाईटवर म्हटले आहे. भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना पाच महिन्यांचे ६० लाख रुपये वेतन देण्यात आलेअसून काही खेळाडूंना २०१५-१६ च्या मोसमातील सामन्यांतून झालेल्या शुद्ध नफ्यातील त्यांचा वाटा देण्यात आला.

  • केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर देशातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयने ४४ लाखांच्या कराचा पहिला हप्ता भरला.

  • स्टुअर्ट बिन्नीला ९२ लाख, हरभजनसिंग याला ६२ लाख, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला ३७ लाख आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवला ३५ लाख रुपये देण्यात आले.

सरकारकडून मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला निधी मंजूर :
  • मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था ही उपयोजित अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण, संख्यात्मक गणिती वित्तीय अर्थशास्त्र व डेटा सायन्स या विषयासंबंधी जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून कार्य करेल.

  • देशातील आद्य अर्थशास्त्र विभाग असलेल्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विभागाला जागतिक संस्थेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्याचे नामकरण मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था (मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी) असे करण्यासह चालू आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे 25 कोटी रुपये निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने विभागाला प्रगत अध्ययन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. स्वायत्त दर्जा प्राप्त असलेल्या या विभागाचा अभ्यासक्रम आजमितीस अर्थशास्त्र विषयातील जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांमध्ये गणला जातो.

  • मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील शिक्षक आणि संशोधकांनी अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • राष्ट्र दिन : जिब्राल्टर

  • शिक्षक दिन : चीन

जन्म /वाढदिवस

  • गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते : १० सप्टेंबर १८८७

  • भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री : १० सप्टेंबर १९४८

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • पं.श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक : १० सप्टेंबर १९६४

ठळक घटना

  • स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश : १० सप्टेंबर २००२

  • पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली : १० सप्टेंबर १९६६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.