चालू घडामोडी - ११ जुलै २०१७

Date : 11 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयआयटी प्रवेशावरील निर्बंध सुप्रीम कोर्टानं हटवले :
  • आयआयटी प्रवेशावर लावण्यात आलेले निर्बंध अखेर सुप्रीम कोर्टानं हटवले असून त्यामुळे तब्बल ३३ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • परीक्षेत बोगस गुण दिल्याच्या तक्रारीवर स्वत: सुप्रीम कोर्टानेच प्रवेशावर बंदी घातली होती, कोर्टाने हे आदेश देताना स्पष्ट केलं की, आतापर्यंत ३३,३०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

  • आयआयटी-जेईई यासारख्या परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न विचारले जातात याबाबत कोर्टानं  नाराजी व्यक्त केली.

  • भविष्यात ही चूक कशी टाळली जाईल यावर सरकारनं उत्तर मागवलं आहे, यावर १० ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

पनवेलच्या महापौरपदी कविता चौतमोल यांची निवड :
  • पनवेल महापालिकेच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या विशेष महासभेत ही घोषणा करण्यात आली. 

  • पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची घोषणा पीठासन अधिकाऱ्यांनी केली.

  • शेकापच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमलता गोवारी व उपमहापौरपदाचे उमेदवार रवींद्र भगत यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

  • तसेच रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहत आहे.

ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे 'मुंबई फर्स्ट' या संस्थेबरोबर सामंजस्य करार :
  • मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने 'मुंबई फर्स्ट' या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन संस्थांकडून विविध क्षेत्रांत विकासासाठी प्रकल्प व उपक्रम राबविले जाणार आहेत.

  • शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन कौशल्याच्या संवर्धनावर तसेच महानगर क्षेत्रातील स्वस्त खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल.

  • अध्यापन कौशल्य व मिळणारे शिक्षण यांत सुधारणा करण्यासाठी कौशल्य विकास आणि भाषा प्रावीण्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले जातील.

  • हे कार्यक्रम प्रत्यक्ष व डिजिटल अशा दोन्ही स्वरूपांत चालवले जातील, त्यामध्ये सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश केला जाईल, अशी माहिती ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात आली आहे.

US Visa - वैद्यकीय अहवालाची मुदत संपली तर काय करायचं ?
  • माझा अमेरिकेचा इमिग्रंट व्हिसा मंजूर झाला आहे, पण मी अमेरिकेला जाण्याआधी माझ्या वैद्यकीय अहवालाची मुदत संपणार आहे, तरीही मी अमेरिकेला जाऊ शकतो का ? 

  • उत्तर - वैद्यकीय अहवालाची मुदत संपल्यानंतर तुम्हाला जो व्हिसा मंजूर झालाय त्यावर तुम्ही प्रवास करु शकत नाही.

  • तुम्हाला पुन्हा नव्याने वैद्यकीय तपासणी करुन नव्याने व्हिसा मिळवावा लागेल.

  • इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेला जाण्यासाठी तुमच्याकडे वैध वैद्यकीय अहवाल असला पाहिजे, वैद्यकीय अहवाल त्याच्या तारखेपासून  फक्त सहा महिनेच ग्राहय धरला जातो व वैद्यकीय अहवालाची मुदत संपते त्याच दिवशी तुमचा व्हिसाही संपतो. 

ओसामाचा रोबोट करतोय वेटरचे काम :
  • पाकिस्तान आणि रोबोटचा रोजच्या कामात वापर हे शब्द एकत्र वाचले तरी विचित्र वाटत होत, पण हे खरंय, पाकिस्तानातील एका रेस्टॉरंटमध्ये  एक रोबोटच काम करू लागला आहे, मुलतानमधील एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये राबिया नावाचा एक रोबोट वेट्रेसचं काम करत आहे. 

  • ओसामा जाफरी या अभियंत्याने तयार केलेल्या या रोबोटचे वजन २५ किलो इतके असून हा रोबोट एकावेळेस एक पिझ्झा ग्राहकांपर्यंत नेऊ शकतो, साधारण मध्यम उंचीच्या या रोबोटने पांढरा-लाल रंगाचा अॅप्रन परिधान केला आहे.

  • ग्राहकांपैकी कोणा कट्टर व्यक्तीच्या भावना दुखावू नयेत म्हणून ओसामा जाफरी या वेट्रेसच्या गळ्यात एक स्कार्फही अडकवला आहे.  

  • ओसामाच्या वडिलांचे मुलतान शहरामध्ये पिझ्झा डॉट कॉम नावाचे रेस्टॉंरंट असून हा रोबोट येथे काम करु लागल्यापासून मुलतानच्या लोकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

  • त्यामुळे पिझ्झाचा खूप दुपटीने वाढल्याचे ओसामा आता तीन नव्या रोबोटसह रेस्टॉरंटची नवी शाखा सुरु करण्याचा ओसामाचा विचार सुरु आहे. 

नासाने घेतली गुरुपौर्णिमेची दखल : 
  • नॅशनल एरोनॉटिक्स अॅंड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाच्या ट्वीटर हॅंडलवरुन कालच्या पौर्णिमेची माहिती देताना गुरु पौर्णिमेचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • भारतामध्ये उत्साहात साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमेची दखल नासानेही घेतली असून ०९ जुलै रोजी येणाऱ्या पौर्णिमेला जगाच्या विविध भागांमध्ये कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते याची माहिती देणारा एक ट्वीट नासाने केला आहे.

  • काल पौर्णिमेच्या निमित्त माहिती देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये 'फुल मून धिस विकेंड कॉल्ड गुरुपौर्णिमा, हे मून, मिड मून, राइप मून, बक मून ऑर अवर फेवरिट थंडर मून' अशी नावे नमूद करण्यात आली आहेत. .

  • जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या गडगडाटी वादळांमुळे या महिन्यातील पौर्णिमेला थंडर मून असे संबोधले जाते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक लोकसंख्या दिन : संयुक्त राष्ट्रे.

  • राष्ट्रीय समुद्री दिन : चीन.

जन्म, वाढदिवस

  • जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६ वा राष्ट्राध्यक्ष : ११ जुलै १७६७

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री : ११ जुलै १८०४

ठळक घटना

  • नेदरलँड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला : ११ जुलै १९१९

  • अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित : ११ जुलै १९९५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.