चालू घडामोडी - ११ जून २०१७

Date : 11 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात :
  • चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत पावसाच्या अवकृपेमुळे पहिल्या दोन लढतींवर पाणी सोडावे लागलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

  • ‘अ’ गटातील ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या साखळी सामन्यात पाऊस आलाच, परंतु डकवर्थ लुईस नियमांच्या गणितानुसार इंग्लंडचा संघ धावसंख्येच्या बाबतीत ४० धावांनी पुढे होता आणि त्यामुळे त्यांना यावेळी विजयी घोषित करण्यात आले.

  • ऑस्ट्रेलियाच्या या पराभवामुळे ‘अ’ गटातून इंग्लंडपाठोपाठ बांगलादेशचा उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का झाला.

  • ऑस्ट्रेलियाच्या २७७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ४०.२ षटकांत ४ बाद २४० धावा केल्या होत्या आणि त्यावेळी पावसाचे दमदार आगमन झाले. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला विजयासाठी ४०.२ षटकांत २०१ धावा करणे अपेक्षित होते. मात्र, इंग्लंडने त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

  • कर्णधार इयॉन मॉर्गन (८७) आणि सामनावीर बेन स्टोक्स (नाबाद १०२) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने हा विजय मिळवला. इंग्लंडचे ३ फलंदाज अवघ्या ३५ धावांत माघारी परतले असताना पावसाचे आगमन झाले. त्यानंतर  मॉर्गन आणि स्टोक्सने जोरदार फटकेबाजी करत इंग्लंडला सावरले.

ब्रिटनच्या संसदेत पहिली शीख महिला खासदार :
  • ब्रिटनमधील सर्वसाधारण निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून ब्रिटनच्या संसदेत पहिल्या शीख महिला खासदाराची निवड झाली आहे. लेबर पार्टीच्या उमेदवार प्रीत कौर गिल यांनी विजय मिळवला.

  • प्रीत कौर गिल यांनी बर्मिंगहॅम एडबॅस्टनची जागा २४ हजार १२४ मतं मिळवून जिंकली. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या उमेदवार कॅरलिन स्क्वायर यांचा गिल यांनी ६ हजार ९१७ मतांनी पराभव केला.

  • ‘ज्या मतदारसंघात माझा जन्म झाला, मी लहानाची मोठी झाले, त्याच भागाचं खासदारपद भूषवण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी झाले आहे. मेहनत आणि दृढनिश्चयाच्या बळावर मी कठीण गोष्टी साध्य करेन, असा विश्वास प्रीत कौर गिल यांनी विजयानंतर व्यक्त केला.

  • भारतीय वंशाच्या प्रिती पटेल, अलोक शर्मा, शैलेश वरा, रिषी सुनाक, सुएला फर्नांडिस, किथ वाझ, वलेरी वाझ, लिसा नंदी, सीमा मल्होत्रा, वीरेंद्र शर्मा यांनी खिंड लढवली आहे. माजी महापौर नीरज पाटील यांचा मात्र यूकेच्या शिक्षणमंत्र्यांनी पराभव केला.

माजी नौदल अधिकाऱ्यांवर वर्णविद्वेषाचा गुन्हा :
  • कन्सास सिटी बारमध्ये भारतीय तंत्रज्ञ श्रीनिवास कुचीभोटला याला बाचाबाचीत ठार केल्याच्या प्रकरणी नौदलाचा माजी अधिकारी अॅडम प्युरिटन याच्यावर वर्णविद्वेष व शस्त्रे बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी इतर दोन जण जखमी झाले होते.

  • कन्सासमधील ओलाथचा रहिवासी असलेल्या प्युरिटन याच्यावर संघराज्य न्यायालयाने २२ फेब्रुवारीच्या गोळीबाराच्या घटनेत आरोप निश्चित केले आहेत.

  • न्याय खात्याने आरोपी प्युरिंटन याच्यावर कुचीभोटला याचा खून व अलोक मदासानी याला मारण्याचा प्रयत्न अशा मुद्दय़ांवर द्वेषमूलकता, वर्णविद्वेष, धर्मविद्वेष असे आरोप ठेवले आहेत.

  • इयान ग्रिलॉट या अमेरिकी तरुणाने यात हस्तक्षेप केला असता तोही जखमी झाला होता. हंगामी सहायक महाधिवक्ता थॉमस इ व्हीलर व कन्सासचे अधिवक्ता थॉमस बिऑल यांनी दोषारोपपत्र सादर केले. 

द. आफ्रिकेशी 'करो या मरो'ची लढाई, टीम इंडिया 'सेमी'चं तिकीट मिळवणार?
  • विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर उद्या (रविवार) आमनेसामने उभ्या ठाकणार आहेत.

  • एक चॅम्पियन्स ट्रॉफीची गतविजेती फौज, तर दुसरी आयसीसी क्रमवारीतली नंबर वन टीम. या दोन्ही संघांसमोर उद्याच्या सामन्यात मोठी रंजक परिस्थिती आहे. जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हानच संपुष्टात येणार आहे. 

  • उमेश यादवच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजनं घेतलेल्या याच एकेरी धावेनं श्रीलंकेला टीम इंडियाचा ३२१ धावांचा डोंगर ओलांडून दिलाच, पण चॅम्पियन्स ट्रॉफीत कमबॅक करण्याची संधीही मिळवून दिली.

  • श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानं टीम इंडियाची मात्र पंचाईत केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट विराट कोहलीच्या हातून अलगद निसटलं. आता ते तिकीट पुन्हा मिळवायचं तर आयसीसी क्रमवारीतल्या नंबर वन दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.

राणीच्या काळातील सुवर्ण नाणी सापडली जुन्या पियानोत :
  • जुन्या पियानोच्या कीबोर्डखाली एवढी सोन्याची नाणी कोणी आणि का दडवून ठेवली याचा चौकशी करणारे विचार करीत आहेत. ही एकूण नाणी सहा किलोग्रॅ्रम व संख्येत ९१३ आहेत. आता ती देशाचा ठेवा असल्याचे गुरुवारी अधिकाऱ्याने जाहीर केले.

  • श्रोपशायर परगण्यातील शाळेत हा पियानो होता व त्याचा सूर नीट लावण्यासाठी कारागिर आला होता त्यावेळी ही बाब उघडकीस आली. या नाण्यांचे मूल्य किती हे अजून निश्चित झालेले नाही.

  • ब्रिटिश संग्रहालयाच्या तज्ज्ञांनी या नाण्यांचा काळ १८४७ ते १९१५ असा असल्याचा सांगितला. यातील ६३३ ही पूर्ण सुवर्ण नाणी आहेत तर २८० अर्ध सुवर्ण आहेत.

  • हाताने व्यवस्थित शिवलेल्या पिशवीत ही नाणी ठेवली गेली होती. ती दडवून ठेवली गेली त्यावेळी त्यांची किमत ७७३ पौंड असावी. यातील बहुसंख्य नाणी ही क्वीन व्हिक्टोरिया यांच्या राजवटीतील असून त्यांची सुवर्ण शुद्धता ९१.७ टक्के आहे.

दिनविशेष : 

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • वासुदेवशास्त्री खरे, प्रसिध्द इतिहाससंशोधन व नाटककार : ११ जून १९२४

  • पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेता आणि स्वातंत्र्य सैनिक : ११ जून १९५०

  • राजेश पायलट, कॉँग्रेस नेता व केंद्रीय मंत्री : ११ जून २०००

ठळक घटना 

  • शिवाजीमहाराजांनी राजा जयसिंगची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सलोख्याची बोलणी करण्यासाठी त्याच्या शिबिरामध्ये प्रवेश केला : ११ जून १६६५

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना : ११ जून १८६६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.