चालू घडामोडी - ११ मार्च २०१८

Date : 11 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुरेश प्रभूंकडे हवाई वाहतूक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार :
  • नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आला आहे. टीडीपी मंत्री अशोक गजपती राजू यांच्या राजीनाम्यानंतर हा बदल करण्यात आला.

  • तेलुगू देसम पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनीही राजीनामे दिले.

  • विशेष म्हणजे सुरेश प्रभू हे आंध्र प्रदेश मधून टीडीपीच्याच पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून आले होते. यूपीएच्या काळात प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर एनडीएतही हे खातं मराठी माणसाकडे देण्यात आलं आहे.

  • अशोक गजपती राजू यांच्या राजीनाम्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान मोदींकडे देण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करुन तशी माहिती दिली होती. मात्र आता ही जबाबदारी प्रभूंकडे सोपवण्यात आली आहे.

संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड :
  • नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याआधी तीनवेळा भय्याजी जोशी यांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची धुरा समर्थपणे पेलली आहे. आज झालेल्या बैठकीत चौथ्यांदा त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती.

  • आज नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भय्याजी जोशींची चौथ्यांदा संघाच्या सरकार्यवाहपदी निवड करण्यात आली. 2018 ते 2021 या तीन वर्षांसाठी ही निवड असेल.

  • भय्याजी जोशी हे 2009 पासून संघाच्या सरकार्यवाहपदी कार्यरत आहे. दर तीन वर्षांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक होते. यात सलग चौथ्यांदा भय्याची जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

गोरखपूर आणि फुलपूरमध्ये आज पोटनिवडणूक :
  • उत्तर प्रदेशातील गोरखपूर लोकसभा मतदार संघ आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झाली आहे. याच दोन जागांसाठी आज पोटनिवडणूक पार पडते आहे.

  • भाजपासाठी या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या आहेत. या दोन जागांवर काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. तर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला बसपाने पाठिंबा दिला आहे. फुलपूरच्या जागेसाठी २२ उमेदवार तर गोरखपूरसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत.

  • आज या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराच पुन्हा निवडून दिले जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण राजस्थान आणि मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या दोन पोटनिवडणुकांमध्ये काय होणार यावर भाजपाचे लक्ष असणार आहे.

  • गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणच्या जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र त्यातही गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ हे ३ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले होते. योगी आदित्यनाथ यांचा करीश्मा चालला की नाही हे या पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

  • मायावती यांनी या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. गेल्या २५ वर्षांपासून बसपा आणि सपा यांच्यात वाद आहे. मात्र तो वाद या दोन्ही पक्षांनी संपुष्टात आणला आहे. आज काय होणार? मतदार राजा कोणत्या पक्षाला कौल देणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

पंतप्रधानांना गीता भेट देणारा तरूण अडचणीत, बँक कर्मचारी त्रास देत असल्याचे पत्र :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदीप सोनी या कानपूरच्या तरूणाने लाकडावर कोरलेली गीता भेट दिली होती. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच बँक आपल्याला व्यवसायासाठी कर्ज देत नसल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर बँकेने त्याला कर्ज दिले.

  • असे असले तरीही या संदीप सोनी या तरूण व्यावसायिकाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. मी माझा व्यवसाय करू शकत नाही. कारण बँक कर्मचारी मला त्रास देत आहेत अशा आशयाचे पत्र संदीप सोनी याने लिहिले आहे.

  • २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून संदीप सोनी या सुतारकामाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने लाकडावर कोरलेली गीता भेट दिली होती. संदीप सोनीला फर्निचरचे शोरूम सुरु करण्यासाठी कर्ज हवे होते. मात्र ते मिळतानाही त्याला अडचणी येत होत्या.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गीता भेट दिल्यानंतर त्याचा आणि पंतप्रधानांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. आता बँक कर्मचारी त्रास देत असल्याने याच तरूणावर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाकडावर कोरलेली गीता पाहून खुश झाले.

  • त्यांनी त्यावेळी संदीप सोनीला १ कोटी पर्यंतचे कर्ज दिले जावे असे स्पष्ट केले होते. त्यानंतर संदीपला कर्ज मिळाले. त्याने कानपूरमध्येच आपले शोरूमही सुरु केले. मात्र आता बँकेचे कर्मचारी आपल्याला इतका त्रास देत आहेत की मला माझा व्यवसाय बंद करावा लागणार आहे असे पत्र संदीप सोनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

अफगाणिस्तानच्या आर्थिक विकासात भारताची महत्त्वाची भूमिका – वेल्स :
  • अफगाणिस्तानच्या आर्थिक विकासात भारताने जबाबदारीने भूमिका बजावली असल्याचे सांगतानाच, भारत- अफगाणिस्तान- अमेरिका यांच्यातील त्रिपक्षीय सहकार्य पाकिस्तानच्या विरोधात नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • भारताने गेल्या अनेक वर्षांत अफगाणिस्तानचा आर्थिक विकास आणि पुनर्निर्माण यांच्यात जबाबदारीची भूमिका बजावल्याचे आम्ही पाहिले असून, अफगाणिस्तान सरकारनेही या भूमिकेची प्रशंसा केली आहे, असे दक्षिण व मध्य आशियासाठीचे अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अ‍ॅलिस वेल्स यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात सांगितले.

  • काबूल शांतता प्रक्रियेच्या बैठकीत हजर राहण्यासाठी वेल्स या महिन्याच्या सुरुवातीला काबूलमध्ये आल्या होत्या. यानिमित्त त्यांनी भारत- अमेरिका- अफगाणिस्तान त्रिपक्षीय बैठकीतही भाग घेतल्यामुळे पाकिस्तानच्या भुवया उंचावल्या होत्या.

  • विकासात्मक व्यापार आणि गुंतवणुकीच्या प्राधान्याबाबत तिन्ही देश अधिक चांगल्या रीतीने कशा प्रकारे काम करू शकतात याचा आढावा घेण्यासाठी ही त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्यात आल्याचे वेल्स म्हणाल्या; तथापि पाकिस्तानविरुद्ध वापरून घेण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानचा उपयोग करून घेत असल्याचा त्याचा अर्थ अजिबात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८१८: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

  • १८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

  • १८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

  • १९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

  • १९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

  • १९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

  • २००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

  • २००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

  • २०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्म

  • १८६३: बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९)

  • १८७३: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९३३)

  • १९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

  • १९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)

  • १९१६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९५)

  • १९८५: श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.

मृत्यू

  • १६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म: १४ मे १६५७)

  • १९५५: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट१८८१)

  • १९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

  • १९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

  • १९७०: अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १८८९)

  • १९७९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

  • १९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)

  • २००६: सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट१९४१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.