चालू घडामोडी - ११ ऑक्टोबर २०१७

Date : 11 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक राजन खान यांचा अर्ज दाखल :
  • बडोदा येथे होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • खान यांच्या अर्जावर सूचक म्हणून संजय भास्कर जोशी यांची, तर अनुमोदक म्हणून संतोष शेणई, संदेश भंडारे, भारत देसडला, रमेश राठीवडेकर आणि गोपाळ कांबळे यांच्या स्वाक्षºया आहेत.

  • खान म्हणाले, ‘‘संमेलनाध्यक्षपद एका वषार्साठी नव्हे तर आयुष्यभरासाठी असते, मी पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून कोणतेही आदरणीय, ज्येष्ठ नाव समोर आल्यास माघार घेण्याची माझी तयारी असेल.’’

  • लेखक, कार्यकर्ता म्हणून मी आजवर काम करत आलो असून लेखकाची ओळख मर्यादित असते,  संमेलनाध्यक्षपदाला महाराष्ट्रात वलय, आदराचे स्थान आहे. त्यामुळे लेखकाच्या कामाला संमेलनाध्यक्षपदाच्या वलयाचा निश्चित उपयोग होतो.

  • राज्यात, देशभरात अनेक छोटी संमेलने होत असली तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.

प्रकाश जावडेकर यांचा दावा कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येईल :
  • देशभरात भाजपाच्या बाजूने कौल मिळत आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीतही हा कौल दिसून आला, असे सांगतानाच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच जिंकून सत्तेवर येईल, असा दावा मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.

  • महाराष्ट्रात सरपंचाची निवड थेट करण्याची ही पहिली वेळ होती आणि त्यातही भाजपाला मोठे यश मिळाले असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा पुढे आला आहे, असेही जावडेकर म्हणाले.

  • ‘लोकमत’समूहाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्याशी जावडेकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थतीवर विस्तृत चर्चा केली.

  • शास्त्री भवन येथील कार्यालयात झालेल्या या चर्चेत प्रकाश जावडेकर यांनी दावा केला की, कर्नाटकात दौरा केल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत आले आहेत की, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर येईल. 

  • लोक आजही पंतप्रधान मोदी यांना पसंत करतात आणि त्यांच्या नावावर मत देतात, याचा पुनरुच्चार करून जावडेकर म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी जी मोहिम सुरु केली आहे त्याचे परिणाम समोर येत आहेत.

  • रिटर्न फाइल करण्याच्या बाबतीत कर दात्यांच्या संख्येत मोठे परिवर्तन पहायला मिळत असून आगामी काळात याची कक्षा आणखी रुंदावेल आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

१०० फुटी श्रीरामाची भव्य मूर्ती उभारणार योगी सरकार शरयू तिरी :
  • उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भाजपच्या अजेंड्यावरील अयोध्येच्या विषयाला नेहमीच प्राथमिकता दिलेली असून यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

  • यावेळी श्रीरामांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार असून शरयू तिरी हजारो दिव्यांची आरास करण्यात येणार आहे विशेष म्हणजे या ठिकाणीच योगी सरकार श्रीरामांची १०० फूट भव्य मूर्तीची उभारण्याच्या तयारीत आहे.

  • शरयू तिरी उभारण्यात येणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीबद्दल राज्यपाल राम नाईक यांनाही याची कल्पना दिली असून या उपक्रमासाठी सरकारने जागा आणि बजेटही निश्चित केले आहे यावर एनजीटीची परवानगी लवकरच घेण्यात येणार आहे.

  • पर्यटना विभागाचे प्रमुख सचिव अवनीश अवस्थी यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, “प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्रस्ताव विचाराधीन असून, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. 

  • योगी सरकारने या नव्या योजनेला ‘अयोध्या’ असं नाव दिलं असून, या योजनेअंतर्गत प्रभू श्रीरामांनी जलसमाधी घेतलेल्या गुप्तार घाटाचाही कायापालट करण्यात येणार आहे.

ट्रम्प यांचे इमिग्रेशनचे नवे प्रस्ताव भारतीयांना मारक :
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इमिग्रेशन प्रस्तावांचे काही संच मंजुरीसाठी अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह काँग्रेसला पाठविले आहेत, हे प्रस्ताव भारतीयांसाठी मारक असल्याचे समोर येत आहे.

  • अमेरिकेत काम करणाऱ्यांची अल्पवयीन मुले आणि वैवाहिक जोडीदार सोडून इतर कुटुंबीयांना ग्रीन कार्ड न देण्याची तरतूद या प्रस्तावांत आहे.

  • भारतीय व्यावसायिकांसाठी ही बाब जाचक ठरणार असून ट्रम्प प्रशासनाची नवी पद्धती गुणवत्ताधिष्ठित आहे, कुटुंबाधिष्ठित ग्रीन कार्ड देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी प्रस्तावित केला आहे.

लावा कंपनीने भारतात आपल्या झेड मालिकेत चार नवीन स्मार्टफोन :
  • लावा या भारतीय कंपनीने चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात झेड ६०, झेड ७०, झेड ८० आणि झेड ९० यांचा समावेश आहे.

  • लावा कंपनीने भारतात आपल्या झेड मालिकेत चार नवीन स्मार्टफोन सादर केले असून ते सर्व विविध शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत, या चारही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ५,५००; ८,०००; ९,००० आणि १०७५० रूपये असेल. 

  • लावा झेड ९० हे या चारही स्मार्टफोनमधील सर्वात उत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल असून यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे.

  • अर्थात याच्या मागील बाजूस ८ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल, या दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. लावा झेड ९० या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल.

  • १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने युक्त असणार्‍या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल. यातील बॅटरी २७५० मिलीअँपिअर क्षमतेची असून या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय मुलगी दिन

जन्म /वाढदिवस

  • स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म : ११ ऑक्टोबर १९०२

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म  : ११ ऑक्टोबर १९३२

  • परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म : ११ ऑक्टोबर १९४६

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  : ११ ऑक्टोबर १९६८
  • स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन : ११ ऑक्टोबर २०००

  • भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन : ११ ऑक्टोबर २००७

ठळक घटना

  • युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना : ११ ऑक्टोबर १८५२

  • व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर : ११ ऑक्टोबर २००१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.