चालू घडामोडी - १२ ऑगस्ट २०१८

Date : 12 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात एक वर्षात १ कोटी रोजगार दिले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका खासगी वृत्तवाहिनीला ई-मेलद्वारे मुलाखत दिली. त्यामध्ये मोदींनी एनआरसी, जीएसटी, रोजगार आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य केले. रोजगारासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता.

  • त्यावर बोलताना, देशात गेल्या वर्षभरात 1 कोटी नागरिकांना नोकरी मिळाल्याचा दावा मोदींनी केला आहे. त्यामुळे देशातील तरुणांना नोकरी मिळत नसल्याचा प्रचार बंद केला पाहिजे, असेही मोदींनी म्हटले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणापूर्वीच एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी मोदींनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा मुद्दा बनलेल्या एनआरसीवरही भाष्य केले. तसेच मॉब लिंचिंग आणि रोजगार निर्मित्तीच्या प्रश्नावरही उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2 कोटी रोजगार निर्माण करणार, असल्याची घोषणा करण्यात आली होती. याबाबत काँग्रेस आणि विरोधकांकडून नेहमीच मोदींना टार्गेट करण्यात येते.

  • त्यावर बोलताना, गेल्या वर्षभरात देशात 1 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्याचे म्हटले आहे. सन 2017 ते 2018 या कालावधीत 45 लाख औपचारिक रोजगारनिर्मित्ती झाली आहे. तर ईपीएफओच्या आकडेवारीवरुन गेल्या वर्षभरात देशात 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले.

  • पर्यटन विकास, मुद्रालोन, स्टार्टअप आणि बांधकामाच्या क्षेत्रात रोगगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच डिजीटल इंडियाच्या माध्यमातून मोबाईल कंपनींच्या युनिटची संख्याही वाढली आहे. सन 2014 साली देशात केवळ दोन मोबाईल युनिट होते, आता देशात 120 मोबाईल युनिट झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचेही मोदींनी सांगितले.

अभिनव बिंद्राकडून सुवर्णपदकासाठी आवाहन :
  • नवी दिल्ली - अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आॅलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. भारताकडून आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

  • सुवर्णपदक पटकावलेल्या घटनेला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रसिद्ध करण्यातत आलेल्या या व्हिडिओमध्ये बिंद्रा याच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बिंद्राने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तो म्हणाला, ‘तू मला मी जो आहे तो घडवलस. आता तू अन्य भारतीय खेळाडूंनाही प्रेरणा द्यायला हवी. आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी सुवर्णपदक मिळवावे यासाठी मी शुभेच्छा देत आहे.’

  • हॅपी बर्थडे गोल्ड..दहा वर्ष पूर्ण झाली. आता टोकियो २०२० साठी दोन वर्ष उरली आहेत.’

  • तो म्हणाला, मेहनत, समर्पण, बलीदान व सयंम या गोष्टींमुळेच विजयाला गवसणी घालता येते.आपल्या देशात गुणवत्तेला कमतरता नाही. माझा हा व्हिडिओ आशियाई व आॅलिंपिक स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यासाठी प्रेरणादाई ठरेल अशी मला आशा आहे.’

नोबेल विजेते साहित्यिक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन :
  • ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’ आणि ‘अ हाऊस फॉर मिस्टर’ बिस्वास यांसारख्या कादंबऱ्या लिहिणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे शनिवारी लंडन येथे निधन झाले; ते ८५ वर्षांचे होते. लंडनमधील त्यांच्या राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली.

  • नायपॉल यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना त्यांच्या पत्नी नादिरा म्हणाल्या, त्यांनी उभ्या आयुष्यात जे काही मिळवले ते समृद्ध करणारे आहे. ते ज्यांच्यावर प्रेम करीत होते त्यांच्यासोबत असतानाच त्यांनी आपला प्राण सोडला.

  • १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या नायपॉल यांच्या रचनांमध्ये त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव जाणवतो. त्यांना २००१ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये नायपॉल यांनी ज्या रचना केल्या, त्यामुळे त्यांना २०व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले. नायपॉल यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यांमध्ये विकसनशील देशांतील प्रत्येक नागिरकाचा संघर्ष पहायला मिळतो.

  • नायपॉल यांच्या वंशजांना वेस्टइंडिजमध्ये भारतातून जबरदस्तीने मजुरीसाठी आणण्यात आले होते. त्यांचे वडिलही एक कादंबरीकार होते मात्र, त्यांना योग्य संधी मिळू न शकल्याने त्यांना यात करिअर करता आले नाही. नायपॉल यांना लवकरात लवकर त्रिनिदाद सोडण्याची इच्छा होती. त्यानंतर अनेक मुलाखतीत त्यांनी आपण त्रिनिदादला आपल्या ओळखीपासून कायमच दूर ठेवल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संशोधक आणि उद्योजक हा देशविकासाचा कणा :
  • संशोधक आणि उद्योजक हे देशविकासाचा कणा आहेत. जे देश संशोधनाबाबत निष्क्रिय राहतात त्यांची प्रगतीच खुंटते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘आयआयटी’मुंबईच्या ५६व्या पदवीदान सोहळ्यात केले. देशातील ‘आयआयटी’ म्हणजे परिवर्तनाचे माध्यम आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.

  • नित्यनूतन संशोधन आणि नवनवे उपक्रम यांची देशाला गरज आहे. ही गरज प्रशासनातून नव्हे, तर तुमच्यासारख्या धडाडीच्या नवसंशोधकांतूनच पूर्ण होणार आहे. पुढील दोन दशके ही संशोधन आणि तंत्रज्ञानाचीच असतील, असेही मोदी म्हणाले.

  • ऊर्जा आणि पर्यावरण यात समतोल राखण्याचे मोठे आव्हानही येत्या दोन दशकांत देशासमोरच नव्हे, तर जगासमोर उभे ठाकणार आहे. त्या आव्हानातून मार्ग काढण्यासाठी आयआयटीचा वारसा लाभलेल्या संशोधकांचीच मोलाची मदत आवश्यक ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

  • मुंबई आयआयटीला सरकारने एक हजार कोटी रुपयांचे साह्य़ केले आहे. तसेच आयआयटी, आयआयएम, आयआयएससीसारख्या नव्या संशोधन संस्थांसाठी सुमारे एक लाख कोटी रुपये उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. जग आज आयआयटीला स्टार्टअप नर्सरी म्हणून ओळखते. ज्याची सुरुवात आपल्या भारतातून झाली आहे. त्याचसोबत हा स्टार्टअप उद्योग सुमारे एक हजार अब्ज डॉलरच्या पलीकडे जाणार असल्याचे भाकितही मोदी यांनी वर्तविले.

SBI डेबिट कार्ड धारकांनी २०१८ मध्येच 'हे' करावं :
  • मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात 'एसबीआय'च्या डेबिटकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. एसबीआयचं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे निर्देश बँकेने दिले आहेत.

  • 'एसबीआय'ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार 2018 वर्ष संपण्यापूर्वी मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून ईएमव्ही चिप डेबिट कार्ड घेण्याचं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे.

  • मुदतीपूर्वी आपलं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतलं नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे 31 डिसेंबर 2018 पूर्वीच एसबीआय एटीएम कार्डधारकांना अपडेटेड कार्ड घ्यावं लागेल.

  • एसबीआयकडून कन्व्हर्जन प्रोसेस करण्यात येत असून त्यासाठी ग्राहकाला एक रुपयाही मोजावा लागणार नाही. ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमीसुद्धा एसबीआयने दिली आहे.

दिनविशेष :
  • जागतिक हत्ती दिन

महत्वाच्या घटना

  • १९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.

  • १९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.

  • १९५३: पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.

  • १९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.

  • १९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.

  • १९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.

  • १९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

  • १९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.

  • १९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.

  • १९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.

  • १९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार जाहीर.

  • २०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.

  • २००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.

जन्म

  • १८८०: चरित्रकार,वाड्मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म.

  • १८८७: नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६१)

  • १९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)

  • १९१०: सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यूसुफ बिन इशक यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७०)

  • १९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)

  • १९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००४)

  • १९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७५)

  • १९२६: गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म.

  • १९५९: बुद्धीबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म.

मृत्यू

  • १९६४: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८)

  • १९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन.

  • १९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११)

  • १९८४: कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.

  • २००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.