चालू घडामोडी - १२ फेब्रुवारी २०१८

Date : 12 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींनी केले आबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन :
  • अबुधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाइनच्या दौ-यानंतर आता संयुक्त अरब अमिराता(यूएई)ची राजधानी अबुधाबीमध्ये दाखल झाले आहेत. अबुधाबीमध्ये त्यांनी आज पहिल्यांदा वॉर मेमोरियलमध्ये वाहत अल करमा यांना श्रद्धांजली वाहिली. तेथे मोदींनी अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले.  त्यानंतर त्यांनी दुबईतल्या ऑपेरा हाऊसमधून भारतीयांशी संवाद साधला.

  • ते म्हणाले, भारताला जगात सर्वोच्च स्थान मला मिळवून द्यायचं आहे. 21वं शतक हे भारताचं असेल. नोटाबंदी हे गरिबांनीही योग्य दिशेनं उचललेलं पाऊल असल्याचं मानलं आहे. लोकांच्या आवडीचे नव्हे, तर फायद्याचे निर्णय घेणं गरजेचं आहे. चार वर्षांत देशाचा आत्मविश्वास वाढला असून, निराशा आणि समस्यांनाही आम्हाला तोंड द्यावं लागलं आहे. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत भारत विकासाचे नवनवे शिखर गाठतो आहे. अबुधाबीमध्येही सेतूच्या स्वरुपात मंदिर निर्माण केलं जातंय. हे मानवी भागीदारीचं उत्तम उदाहरण आहे. अबुधाबीतलं हे मंदिर भव्य असेल.

  • अबुधाबीमध्ये भारतीय समुदायातील 30 लाखांहून अधिक लोक आहेत. भारतीय लोकांना राहण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्याबद्दल मी अबुधाबीच्या प्रिन्सचे आभार व्यक्त करतो. गेल्या वेळी मी आलो होतो, तेव्हा मंदिर बनवण्यास सुरुवात झाली होती. भारताचं खाडीकिनारील देशांशी चांगले संबंध राहिले आहेत.

  • आमचं नातं फक्त आयात आणि निर्यात करण्यापुरतं नाही, तर चांगल्या भागीदाराचं राहिलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींना ऐकण्यासाठी भारतीय वंशाचे 30 लाखांहून अधिक लोकांनी ऑपेरा हाऊसमध्ये गर्दी केली होती.(source :lokmat)

भारताचं आजचं स्वरुप मराठ्यांच्या शौर्यामुळेच : मुख्यमंत्री :
  • मुंबई : भारताचं आजचं स्वरुप हे मराठ्यांचे कार्य आणि शौर्यामुळेच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईतील एलफिन्स्टनमध्ये कामगार मैदानात आय़ोजित मराठा सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

  • मराठा मोर्चांसमोर सराकर नतमस्तक : मुख्यमंत्री -गेले काही वर्षे मराठा तरुण अस्वस्थ आहे. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चे निघाले. समाजाचे विराट रुप त्यातून दिसले, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मोर्चांची तुलना महाभारतातील एका प्रसंगाशी केली. “महाभारतात श्रीकृष्णाने विराट रुपाचं दर्शन दिल्यावर जशी सृष्टी नतमस्तक झाली, त्याप्रमाणे मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विराट रुपाचे दर्शन झाले. सरकार या रुपापुढे नतमस्तक झाले आणि त्यामुळे विविध निर्णय घेतले.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • “आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. त्यावर कार्यवाही सुरु आहे. न्यायालयात यावर सरकार सक्षमपणे काम करते आहे.”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • तसेच, “मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आणि उच्च शिक्षणाची दारे उघडली गेली. लाखो तरुण या योजनेचा फायदा घेत आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ केवळ कागदावर होते, ते आम्ही जिवंत केले. त्यातून तरुण लाभ घेत आहेत.”, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.(source :abpmajha)

मराठी अभियंत्याने पटकावला ‘आॅस्कर’ :
  • मुंबई : मराठी चित्रपटांवर आॅस्करची नाममुद्रा कोरली जावी, हे मराठी माणसांनी ब-याच वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न विकास साठ्ये या मुंबईकर युवकाने सत्यात उतरविले. कॅमेरा तंत्र विकसित करण्यासाठी त्याला आॅस्कर सन्मानाने गौरविण्यात आले. उभ्या महाराष्ट्राचा उर भरून यावा, अशीच ही घटना.

  • सिनेमॅटिक कॅमे-याचे देशी तंत्र विकसित करणारे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या धडपडीवरील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. याच्या कथानकाशी साजेशी धडपड करत विकास साठ्ये याने ‘के1 शॉटओव्हर’ कॅमेरा तंत्र विकसित करून जागतिक सिनेमाचे छायांकन सुस्पष्ट केले आहे.

  • ‘के1 शॉटओव्हर’ या कॅमे-याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचणारे साठ्ये यांना ९०व्या आॅस्कर अकॅडमी अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्काराने लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आले. अकॅडमी आॅफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या निवड समितीने साठ्ये यांच्यासोबत या कॅमे-यावर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली.(source :lokmat)

६ जणांमुळे अमेरिकेच्या कन्सास राज्यात पेंच, मतदारही नसलेल्यांना व्हायचेय गव्हर्नर :
  • कन्सास सिटी : अमेरिकेच्या कन्सास या राज्याच्या गव्हर्नरपदासाठी सहा अल्पवयीन मुले गांभीर्याने निवडणूक रिंगणात उतरल्याने मुरब्बी राजकारण्यांपुढे काहीसा पेंच निर्माण झाला आहे. मजेची गोष्ट म्हणजे शाळा-कॉलेजांमध्ये शिकणारी ही किशोकवयीन मुले निवडणुकीत मतदारही नाहीत. कन्सास राज्यात गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कायद्यातील या उणीवेचा फायदा घेत या सहाजणांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाºया गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

  • या सहा अल्पवयीन उमेदवारांपैकी १६ वर्षांचा जोसेफ तुतेरा (ज्यू.) हा सर्वात तरुण आहे. त्याच्याखेरीज अ‍ॅरॉन कोलमन , टायलर रुझिच, डॉमिनिक स्कावुझो, इथान रँडलीज आणि जॅक बर्गेसनही पाच अल्पवयीन मुलेही निवडणूक रिंगणात उतरली आहेत.

  • जॅक बर्गेसन हा अल्पवयीन मुलगा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार असून त्याला किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्याची इच्छा आहे. त्याशिवाय मारिजुआनाला कायदेशीर मान्यताही द्यायची आहे. डॉमिनिक स्कावुझो किमान वेतनात वाढ करण्याचे प्रयत्न करू इच्छितो.

  • टायलर रुझिच हा शाळकरी विद्यार्थी असून तो रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे. जोसेफ तुतेरा ज्युनिअर हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असून त्याच्या मते युवकांकडे अनेक उत्तम कल्पना असतात. त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घ्यायला हवे. कन्सासप्रमाणेच व्हरमॉन्ट व मॅसॅच्युसेटट्स या राज्यांमध्येही निवडणुकीला उभे राहाण्यासाठी उमेदवाराला कोणतीही वयोमर्यादा कायद्याने घालण्यात आलेली नाही.(source :lokmat)

जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई १२ व्या स्थानी :
  • मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगभरातील श्रीमंतांच्या यादीत झळकली आहे. 950 बिलियन डॉलर म्हणजे तब्बल 611,27,75,00,00,000 (अंदाजे 61 लाख 12 हजार 775 कोटी) रुपये संपत्ती असलेली मुंबई जगभरातील 15 श्रीमंत शहरांमध्ये 12 व्या स्थानी आहे.

  • न्यूयॉर्कने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूयॉर्कची संपत्ती 3 ट्रिलियन डॉलर म्हणजे 193019,09,99,99,999 (अंदाजे 193 लाख कोटी) रुपये आहे. 'न्यू वर्ल्ड हेल्थ'ने अहवालात ही माहिती दिली आहे.

  • जगातील 15 श्रीमंत शहरांची यादी आणि संपत्ती

1. न्यूयॉर्क (अमेरिका) - 3 ट्रिलियन डॉलर

2. लंडन (यूके) - 2.7 ट्रिलियन डॉलर

3. टोकियो (जपान) - 2.5 ट्रिलियन डॉलर

4. सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) - 2.3 ट्रिलियन डॉलर

5. बीजिंग (चीन) - 2.2 ट्रिलियन डॉलर

6. शांघाय (चीन) -2 ट्रिलियन डॉलर

7. लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) - 1.4 ट्रिलियन डॉलर

8. हाँग काँग - 1.3 ट्रिलियन डॉलर

9. सिडनी (ऑस्ट्रेलिया) - 1 ट्रिलियन डॉलर

10. सिंगापूर - 1 ट्रिलियन डॉलर

11. शिकागो -  988 बिलियन डॉलर

12. मुंबई (भारत) -  950 बिलियन डॉलर

13. टोरंटो (कॅनडा) - 944 बिलियन डॉलर

14. फ्रँकफर्ट (जर्मनी) - 912 बिलियन डॉलर

15. पॅरिस (फ्रान्स) - 860 बिलियन डॉलर

रोहन मोरेने केला असोसिएशन सेव्हन खाडी पार करून विक्रम :
  • पुणे : पुण्याचा अव्वल जलतरणपटू रोहन मोरेने न्यूझीलंडची कुकस्ट्रेट खाडी (चॅनेल) ८ तास ३७ मिनिटांत पार करून नवा आशियाई उच्चांक नोंदवला. न्यूझीलंडच्या दक्षिण व उत्तर बेटामधील ही २६ किलोमीटर अंतराची खाडी पार करताना जगामधील अवघड सात समुद्र (असोसिएशन सेव्हन चॅलेंज) पार करणारा तो आशियामधील व भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ठरला, तर जगामधील तो नववा जलतरणपटू म्हणून मान मिळवला.

  • रोहनला ही कामगिरी करण्यासाठी गेली तीन आठवडे खराब हवामानामुळे आपल्या मोहिमेची वाट पाहावी लागली.

  • अखेर निसर्गाने ९ फेब्रुवारीला त्याला साथ दिली. त्याने सकाळी ९.३० वाजता पोहण्यास उत्तर बेटाकडून प्रारंभ केला. पहिल्या पाच तासांत समुद्र शांत होता व तापमान १९ सेंटिमीटर होते.

  • पण तो दक्षिणेच्या बेटाकडे येऊ लागला. तसे पाण्याचे तापमान अ‍ॅन्ट्रासिरिक खंडामधून येणाºया पाण्याच्या प्रवाहामुळे चार सेंटिमीटर उतरले. परंतु त्याने जिद्दीने थंड पाणी व जोरदार अ‍ॅन्ट्रासिरिक खंडाच्या प्रवाहावर मात करत ही खाडी ८ तास ३७ मिनिटांत केली.

  • कुकस्ट्रेटच्या दक्षिण किनाºयावर जेव्हा रोहन पोहोचला तेव्हा मला माझे आनंदाश्रू आवरता आले नाही. त्याने मनाशी बाळगलेले मोठे ध्येय पूर्ण झाले. त्याने हा विक्रम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्याला जेव्हा कळाले, की वातावरण योग्य नाही तेव्हा तो खूप नाराज झाला होता. पण, तेथील सहकाºयांनी त्याला धीर दिला आणि आपण वाट पाहू, आपल्याला नक्कीच यश येईल, असे जेव्हा सांगितले तेव्हा त्याला बरे वाटले. आणि लगेच तिसºया दिवशी हवामान योग्य असल्याचा आम्हाला निरोप आला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.(source :Lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

  • १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.

  • १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

जन्म

  • १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८००)

  • १८०९: उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)

  • १८०९: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)

  • १८२४: संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)

  • १८७१: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)

  • १८७७: फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९४४)

  • १८८१: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)

  • १९२०: चित्रपट अभिनेता प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

  • १९४९: शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ यांचा जन्म.

मृत्यू

  • १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.

  • १८०४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १७२४)

  • १९९८: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९१३)

  • २०००: सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन.

  • २००१: अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.