चालू घडामोडी - १२ जुलै २०१७

Date : 12 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गांधीजींच्या रेखाचित्राचा ३२ हजार पौंडास लिलाव :
  • महात्मा गांधी ४ डिसेंबर १९३१ रोजी लंडनमध्ये गोलमेज परिषदेसाठी आले असता जॉन हेन्री अ‍ॅमशेवित्झ या चित्रकाराने

  • पेन्सिलने चितारलेले त्यांचे दुर्मिळ पोर्टेट चित्र मंगळवारी लिलावात अपेक्षित किंमतीच्या तिप्पट किंमतीला म्हणजे ३२,५०० पौंडांना विकले गेले.

  • या पोर्ट्रेटवर महात्मा गांधीजींनी ‘ट्रुथ इज गॉड’ असे लिहून स्वाक्षरी केली होती. 

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री :
  • बीसीसीआयने ११ जुलै रोजी रात्री रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी सोपविली.

  • माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

  • राहुल द्रविड हे भारतीय 'अ' आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत.

  • बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील.

  • तसेच भारताकडून २०१४ मध्ये अखेरचा सामना खेळणारा झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो.

भारतीय महिलांचा हॉकीत पराभव : 
  • अमेरिकेने महिला हॉकी विश्व लीगच्या उपांत्य फेरीतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताचा ४-१ ने पराभव केला.

  • २२ व्या मि.ला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. जिल विटमेर हिने पहिला गोल २४ व्या मि.ला नोंदवला. ३८ व्या मि.ला लिलिमा मिज हिने गोल नोंदवला.

  • अमेरिकेसाठी दुसरा गोल ४० व्या मि.ला टेलर वेस्टने नोंदवला. विटमेरने ४३ व्या मि.ला अमेरिकेचा तिसरा गोल नोंदवला. सहा मि.च्या अंतराने मिशेल विटेसेने गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला.

गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार :
  • गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीला सर्व १८ विरोधी पक्षांनी संमती दिली. त्यात जनता दलाचा (यु) समावेश आहे.

  • उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात १८ विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उतरणार आहेत.

  • राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे.

  • गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे व देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.

एकदिवसीय क्रमवारी विराट कोहली प्रथमस्थानी :
  • विराट फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे, तर त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स आणि इंग्लंडचा जो रूट आणि बाबर आझम यांचा नंबर आहे. 

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तीन स्थानांनी प्रगती करत १२ वे स्थान पटकावले आहे.

  • नवीन जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत आघाडीचे पाच फलंदाज, पाच गोलंदाज आणि पाच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बदल झालेला नाही.

भारत -चीन सीमा वाद का ताणला जातोय :
  • भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत. पण यावेळेस हा प्रश्न का सोडवू शकत नाहीत याचे कोणतेही कारण सांगता येणार नाही, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बोलून दाखवले.

  • ‘इंडिया -आसियान अँड द चेंजिंग जियोपॉलिटिक्स’विषयावर व्याख्यान देताना जयशंकर म्हणाले की, ही सीमा अतिशय दूरपर्यंत पसरलेली आहे.. जमिनी स्तरावर सीमेबाबत सहमती झालेली नाही. 

  • भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेजवळ डोकलाम भागात चिनी सैन्याने रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन आठवड्यांपासून या भागात दोन देशात तणाव निर्माण झाला आहे.

  • भूतान या भागाला डोकलाम म्हणून ओळखते. या भागाचे भारतीय नाव डोका ला असून चीन याला डोंगलांग म्हणते.

  • भारत आणि चीन यांच्यात जम्मू - काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किमी लांब सीमा आहे. यातील २२० किमीचे क्षेत्र सिक्किममध्ये येते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.

जन्म, वाढदिवस

  • यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश : १२ जुलै १९२०

  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक : १२ जुलै १८६४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष : १२ जुलै १९४९

ठळक घटना

  • हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला : १२ जुलै १९३२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.