चालू घडामोडी - १२ मे २०१७

Date : 12 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये अनिलकुमार कांस्यपदकाचा मानकरी :
  • आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसऱ्या दिवशी आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे महिलांच्या ५३ कि.गटात रितूचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

  • महिला गटात ज्योतीला ७५ किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • अनिलने ग्रीको रोमनच्या ८५ किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना ७-६ असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले.

राज्याचे नवे कृषी आयुक्त एस.एम. केंद्रेकर :
  • अमित सैनी हे विक्रीकरण विभागात सहआयुक्त असतील. शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव कमलाकर फंड यांची बदली एकात्मिक बाल विकास योजना; नवी मुंबईच्या आयुक्तपदी झाली.

  • सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कृषी आयुक्त; पुणे विकास देशमुख यांची बदली यशदा पुणेच्या उपमहासंचालकपदी करण्यात आली.

  • एस.एम. केंद्रेकर हे राज्याचे नवे कृषी आयुक्त असतील. व्ही.एन. कळम पाटील यांची बदली चित्रपट महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी तर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अरुण उन्हाळे यांची बदली मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव म्हणून मंत्रालयात केली आहे.

  • ठाण्यातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी झाली.

भाजपचे ‘मिशन दक्षिण’ सुरू, अमित शहांनी नेत्यांकडे सोपवली ‘ब्ल्यू प्रिंट’
  • राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने दक्षिण भारतात आपला विस्तार करण्यास सुरूवात केली आहे.

  • पक्षातील सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मिशन दक्षिण’ची ब्ल्यू प्रिंट नेत्यांकडे सोपवली आहे.

  • भाजपची दक्षिणेतील आंध्र पद्रेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.

  • भाजपची दक्षिणेतील पहिली सत्वपरीक्षा याचवर्षी कर्नाटकात होणार आहे. कर्नाटकात यंदा विधानसभा निवडणुका आहेत.

  • मिशन दक्षिण अंतर्गत अन्य पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आपल्याकडे ओढणे, दुसऱ्या राज्यातील आपल्या नेत्यांना तिथे नेणे आणि लोकप्रिय चित्रपट कलाकारांना पक्षात घेणे व स्थानिक पक्षांना कमकुवत करणे हे ध्येय असल्याचे सांगितले जाते.

रोबोट देत होता शिक्षण, विद्यार्थ्यांना समजलेच नाही 
  • भारतीय प्रोफेसर अशोक गोयल यांनी मात्र नवाच प्रयोग केला. ते एक आॅनलाईन कोर्स चालवितात. ते कॉम्युटर सायन्सचे प्रोफेसर आहेत.

  • प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षकामुळेच विद्यार्थी घडतो आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळते; पण आपल्याला कोण शिक्षण देत आहे याची माहितीच विद्यार्थ्यांना नसते, असे कधी होते का? होय, असे झाले आहे.

  • मोठ्या शाळांत ब्लॅक बोर्डाच्या जागी स्मार्ट क्लास आले आहेत. अनेक विद्यापीठे आॅनलाईन क्लासही घेतात. डिस्टंस एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या माध्यमातून सोय होते.

  • शिक्षक हे समोरच्या स्क्रीनवर दिसतात. त्यांचे विद्यार्थी एवढे प्रश्न करीत होते की, या सर्वांना उत्तरे देणे अशक्य होते. या विद्यार्थ्यांना उत्तरे देण्यासाठी त्यांनी एक प्रोग्राम बनविला.

  • शेवटच्या सेमिस्टरमध्ये काही जणांना ही बाब लक्षात आली. हा प्रोग्राम तयार करणे म्हणजे रोबोटला मानवी बुद्धी देण्यासारखे हे काम असल्याचे ते सांगतात.

प्राप्तिकर विभागातर्फे नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध :
  • नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एक नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

  • तसेच यासाठी विभागाने आपल्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यावर क्लिक करुन आवश्यक माहिती भरल्यास लगेचच नागरिकाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल.

  • या पर्यायावर क्लिक करुन ग्राहकाला आपला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डाची माहिती द्यावी लागेल. यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयकडून या माहितीची पडताळणी केली जाईल.

  • आधार कार्डावरील नाव आणि नागरिकाने वेबसाईटवर दिलेले नाव यात मोठी तफावत आढळल्यास वन टाईम पासवर्डची(ओटीपी) गरज भासेल. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे हा क्रमांक कळविला जाईल.

भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी चीनचा चार सूत्री कार्यक्रम :
  • भारत आणि चीनमधील वाढता तणाव कमी करुन संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी चीनने चार सूत्री कार्यक्रम पुढे केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ (OBOR) योजनेला पंतप्रधान मोदींच्या ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’शी जोडलं जात आहे.

  • वास्तविक चीननं आपल्या OBOR योजनेसाठी १४ आणि १५ मे रोजी एक आंतरराष्ट्रीय समिटचं आयोजन केलं आहे. OBOR हा पाकिस्तानसोबतच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (CPEC) भाग आहे.

  • चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी हा प्रस्ताव पुढे केला असून, यावरुन चीनी राजदूत म्हणाले की, “चीन आणि पाकिस्तानच्या CPEC चा भाग हा पीओकेमधून जातो. ज्यामुळे OBOR वरुन भारताला चिंता आहे.

  • झाओहुई यांच्या प्रस्तावानुसार, ‘चीन- भारत ट्रीटी ऑफ गुड नेबरलीनेस अॅन्ड फ्रेंडली को-ऑपरेशन’वर चीन भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे. तसेच दोन्ही देशांच्या सीमाप्रश्नी तोडगा काढण्यावरही दोन्ही देशात चर्चा सुरु होऊ शकते.

अंजली राऊत ठरल्या मिसेस इंडिया वेस्ट २०१७ :
  • मिसेस इंडिया ब्युटी पेजंटअंतर्गत खराडी येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत अंजली राऊत हिने 'मिसेस इंडिया वेस्ट-२०१७' चा किताब पटकाविला. मानसी अरबट्टी आणि सोनल मदनानी हिने अनुक्रमे व्दितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.

  • मिसेस इंडियाच्या संस्थापक आणि माजी मिसेस एशिया इंटरनॅशनल दीपाली फडणीस यांनी सुरू केलेली मिसेस इंडिया ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहे.

  • 'क्‍लासिक मिसेस इंडिया वेस्ट २०१७' चा किताब रुचिता छेडा यांनी पटकाविला. सुनीता नेमेडे (व्दितीय) नीलम शुक्‍ला (तृतीय) यांनीही यश संपादन केले.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक परिचारिका दिन

जन्म, वाढदिवस

  • ईंद्रा देवी, भारतीय योगी : १२ मे १८९९

  • नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू : १२ मे १९३३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका : १२ मे २०१०

ठळक घटना

  • पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना : १२ मे १९०९

  • प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू : १२ मे १९५२

  • आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीमहाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली : १२ मे १९६६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.