चालू घडामोडी - १२ मे २०१८

Date : 12 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जाणून घ्या कोण होते डॅशिंग आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय :
  • मुंबई-  कर्तबगार आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये हिमांशू रॉय यांनी शिक्षण पूर्ण केलं. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष त्यांनी मुंबई क्राईम ब्रॅन्चमध्ये काम केलं. महाराष्ट्र एटीएस प्रमुख पदावर असताना ते जास्त चर्चेत आले. 

  • गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती. फिट राहण्यासाठी अत्यंत मेहनत रॉय घ्यायचेस परंतु दुर्दैवानं त्यांना दुर्धर आजार झाला होता. हिमांशू रॉय हे हनुमानाचे निस्सीम भक्त होते. 

  • हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाइल प्रकरणं हाताळली. 2013मध्ये घडलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदू दारा सिंह यांना अटक करण्यामाहे हिमांशू रॉय यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. पत्रकार जे डे हत्या प्रकरणातील तपासात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता. याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.

  • हिमांशू रॉय यांनी पोलीस प्रशासनात आल्यापासून अनेक ठिकाणी कर्तव्य बजावलं आहे. 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला.  नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१ मध्येही काम केलं.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी काठमांडू सज्ज :
  • काठमांडू- दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नेपाळची राजधानी सज्ज असल्याचे वृत्त नेपाळमधील द हिमालयन टाइम्स या वर्तमानपत्राने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत.

  • याबाबत बोलताना नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते रामकृष्णा सुबेदी म्हणाले, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय तपासयंत्रणा विभाग सर्व ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी उतरले आहेत.

  • काठमांडूच्या मेट्रोपोलिटन वाहतूक पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी जनकपूरवरुन काठमांडूला सर्वात जवळच्या मार्गाने पोहोचतील. ते येण्यापुर्वी केवळ 10 मिनिटे रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्यात येईल आणि वाहनचालकांना 10 ते 20 मिनिटांपर्यंत वाहतूक थांबवावी लागेल. इतर दिवासांच्या तुलनेत आज सकाळपासून काठमांडू शहरात वाहतूक रहदारी कमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महत्त्वाची ठिकाणे स्वच्छ करुन सुशोभित करण्यात आली आहेत. 

  • आता दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे.

नदालने मोडला मॅकेन्रोचा विक्रम :
  • माद्रिद : जगातील नंबर वन टेनिसपटू स्पेनचा राफेल नदाल याने क्ले कोर्टवर सलग ५० सेट जिंकून जॉन मॅकेन्रो याचा ३४ वर्षे जुना विक्रम मोडित काढला.

  • माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत नदालने हा विक्रम नोंदविताना दिएगो श्वार्त्झमन याच्यावर ६-३,६-४ ने विजय नोंदविला.

  • मॅकेन्रोने १९८४ साली सलग ४९ सेट जिंकले होते. त्यात माद्रिद ओपनच्या जेतेपदाचा देखील समावेश होता. नदाल आता आॅस्ट्रियाचा डोमिनिक थियेमविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे.

  • १९८४ पासून हा विक्रम मॅकेन्रोच्या नावावर होता आणि त्याच्या सलग ४९ सेट विजयांमध्ये माद्रिद इनडोअर ओपनच्या विजेतेपदाचाही समावेश होता.

  • नदालच्या सलग ५० सेट विजयांमध्ये बार्सिलोना, माँटे कार्लो आणि गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपन अजिंक्यपदाचा समावेश आहे. माद्रिद येथील स्पर्धा तो सहाव्यांदा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.

  • ३१ वर्षीय नदाल या विक्रमाबद्दल म्हणाला की जेव्हा मीनिवृत्त झालेला असेल तेंव्हा माझ्या असल्या विक्रमांच्या नोंदीच कायम असतील. सलग ५० सेट जिंकणे अतिशय अवघड आहे म्हणून हा एक मोठा विक्रम आहे आणि तो मी केलाय. परंतु आता त्यात अधिक रमण्यापेक्षा आपल्या पुढच्या सामन्यावर मला लक्ष केंद्रित करायला हवे.

दिल्लीत ‘गो बॅक वॉलमार्ट’चे नारे :
  • नवी दिल्ली : वॉलमार्टकडून होत असलेल्या फ्लिपकार्टच्या अधिग्रहणास उजव्या संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. काही संघटनांच्या सुमारे ८० कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत निदर्शने केली. आंदोलकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचचे कार्यकर्तेही होते. कार्यकर्त्यांच्या हातात ‘गो बॅक वॉलमार्ट’ असे लिहिलेले फलक होते.

  • फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय वॉलमार्टने बुधवारी जाहीर केला. हा व्यवहार सुमारे १६ अब्ज डॉलरचा आहे. अ‍ॅमेझॉन डॉट कॉमला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टने भारतातील फ्लिपकार्टची खरेदी केली आहे.

  • दरम्यान, कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (काइट) या शिखर संघटनेनेही या अधिग्रहणास विरोध केला. काइटचे सरचिटणीस प्रवीण म्हणाले की, या व्यवहाराविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाईच्या पर्यायाचा विचार करू. आजच्या निदर्शनांमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे एक आव्हान उभे राहिले आहे.

  • वॉलमार्टमुळे देशातील छोटे व्यापारी व शेतकºयांच्या हिताला बाधा येईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. भाजपाही छोटे व्यावसायिक व शेतकºयांना चुचकारतच राजकारण करीत आले आहेत. हा वर्ग भाजपाचा मतदार आहे. त्याच वेळी भारताची विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम देश अशी प्रतिमा मोदी यांनी कायम ठेवायची आहे. या निदर्शनांमुळे या प्रतिमेला तडा जाण्याचा धोका आहे.

अवैैध तंबाखू व दारूविक्रेते होणार तडीपार :
  • गडचिरोली : वारंवार दारू विक्रेते व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. परंतु अनेकवेळा हे विक्रेते सुटून येतात, अशा विक्रेत्यांवर यापुढे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, तडीपारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

  • तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या त्रैमासिक सभेचे आयोजन गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शिवनाथ कुंभारे, आनंद मोडक उपस्थित होते.

  • बालसंरक्षण कायद्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन व्हावे, १८ वर्षाखालील कोणत्याही बालकाला तंबाखू किंवा तत्सम पदार्थ विकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

  • बाल संरक्षण कायद्याअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे हा दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार, लहान मुलांना तंबाखुजन्य पदार्थांची म्हणजे खर्रा, तंबाखू, नस, गुडाखू यांची विक्री करणाऱ्यास १ लाख रुपये दंड व सात वर्षांची सक्त मजुरी अशी शिक्षा आहे. त्या अनुषंगाने कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

अयोध्या- जनकपूर बससेवा सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन :
  • जनकपूर- भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये एकत्रित रामायण सर्किट तयार करु आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जनकपूर येथे बोलताना दिले. पंतप्रधानांनी नेपाळमधील जनकपूर ते भारतातील अयोध्या यांना जोडणाऱ्या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून  दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत.

  • सकाळी 10.15 वाजल्यापासून त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा प्रारंभ झाला. या दौऱ्यात सर्वात प्रथम ते जनकपूर येथे गेले असून जानकी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहाण्यासाठी जनकपूरवासियांनी मोठी गर्दी केली होती.

  • दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथए नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील.

  • या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतीलय या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.

महत्वाच्या घटना

  • १५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.

  • १६६६: आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.

  • १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.

  • १९५२: प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

  • १९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.

  • १९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.

  • १९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म

  • १८२०: परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)

  • १८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)

  • १८९९: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००२)

  • १९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)

  • १९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)

  • १९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)

मृत्यू

  • १९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९१)

  • २०१०: लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन.

  • २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.