चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ मे २०१९

Date : 12 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींसह मंत्र्यांच्या परदेश आणि देशांतर्गत प्रवासावर ३९३ कोटींचा खर्च :
  • मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेशी दौऱ्यावर होणाऱ्या खर्च बाबत विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे. त्यातच, मोदींसह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या प्रवासावर मागील पाच वर्षांत एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्र्यांच्या परदेश दौरे वाढल्याने त्याच्यावरील खर्चही वाढल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मंत्रिमंडळाच्या वेतन विभागाने ही माहिती दिली आहे.

  • मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागीतीली होती. यातील सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला आहे. ही रक्कम २९२ कोटी इतकी आहे. देशांतर्गत प्रवासांवर ११० कोटी खर्च झाला आहे. एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाला आहे.

  • गेल्या पाच वर्षांत कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण २५२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये खर्च करण्यात आले, तर देशांतर्गत प्रवासांवर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये खर्च करण्यात आले, तर देशांतर्गत प्रवासांवर ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.

  • आधीच मोदींच्या विदेशी दौऱ्यावरून विरोधकांनी भाजपला कैचीत पकडण्याच्या प्रयत्न केला आहे.त्यातच, पाच वर्षात सरकारच्या मंत्र्यांनी तब्बल ३९३ कोटी ५७ लाख रुपये प्रवासावर खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील काळात यावरून सत्ताधाऱ्यांची अडचण वाढू शकते.

सहाव्या टप्प्याचे आज मतदान :
  • लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात रविवारी देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, हर्षवर्धन व मेनका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह व ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानात होणार आहे.

  • रविवारी उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असून एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुका सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने १.१३ लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारली आहेत.

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. राजधानी दिल्लीत भाजप, आप व काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप व डावी आघाडी हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. यंदा भाजपने तृणमूल काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

सर्वांचा विकास हेच ध्येय :
  • समाजाताली सर्व घटकांचा फायदा होईल या दृष्टीने निर्णय घेतले. स्वच्छतेला प्राधान्य दिले. त्यातून ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये शौचालये उभी राहिली. ‘आयुष्यमान भारत’सारख्या योजनेतून गोरगरिबांना आरोग्याच्या योजनांचा लाभ झाला. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भरीव काम झाले.

  • अटलजींच्या धर्तीवरच आमच्या सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था गतिमान राहिली. जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताचा गौरव झाला. रस्ते आणि महामार्गाची प्रचंड कामे झाली. वाजपेयी सरकाच्या काळातही काँग्रेस पक्षाने संरक्षण दलाच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची आवई उठविली होती, पण ते असत्य असल्याचे सिद्ध झाले. माझ्या सरकारवरही असेच आरोप काँग्रेसने केले आहेत. पण हे आरोपही खोटे आहेत. नेहमी सत्याचाच विजय होतो.

  • रोजगाराच्या मुद्दय़ावरही लोकांची दिशाभूल केली जात आहे. आपल्या सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये भरीव काम झाले आहे. यामुळे एक-दोन विषयांवर बोलणे हे चुकीचे ठरेल. १३ वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री असताना सर्व क्षेत्रांचा विकास केला होता. हेच मॉडेल मी आता राबविले आहे.

जिन्हांना पंतप्रधान केले असते तर फाळणी झालीच नसती :
  • “महमंद अली जिन्हा हे अभ्यासू होते, जर आपण त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर देशाची फाळणीच झाली नसती “, भाजपचे मध्य प्रदेशमधील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गुमानसिंग दामोर यांनी असे म्हटले आहे.

  • मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान बोलतांना गुमानसिंग यांनी म्हटले की, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जर नेहरूंनी हट्टीपणा केला नसता तर, या देशाचे विभाजन झाले नसते. महमंद अली जिन्हा एक कायदेपंडित, विद्वान होते. त्यावेळी जर त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर, देशाचे तुकडे झाले नसते. त्यामुळे फाळणीसाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसची हीच विचारसरणी अजुनही कायम आहे हे दुर्देवी आहे.

  • तर प्रदेश काँग्रेसच्या माध्यम प्रमुख शोभा ओझा म्हणाल्या की, भाजपकडून अशा प्रकारच्याच वक्तव्याची अपेक्षा आहे, हे काही नवीन नाही. एसपी मुखर्जी, सावरकर, आडवाणी, जसवंतसिंग आणि मोदी यांनी या अगोदरच त्यांचे पाकिस्तान आणि जिन्हा बद्दलचे प्रेम दाखवून दिलेले आहे. आडवाणींनी जिन्हांच्या कबरीसही भेट दिली आहे, तर जसवंतसिंग यांनी जिन्हांवर पुस्तक लिहून त्यात त्यांची स्तुती केली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांना भारतात भाचपचे सरकार पाहायचे आहे असे म्हटले होते, याकडेही ओझा यांनी लक्ष वेधले.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.

महत्वाच्या घटना 

  • १३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.

  • १५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.

  • १६६६: आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.

  • १७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.

  • १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.

  • १९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.

  • १९५२: प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

  • १९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.

  • १९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.

  • १९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.

  • १९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.

  • १९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २००८: चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.

  • २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १८२०: परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)

  • १८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)

  • १८९९: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००२)

  • १९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)

  • १९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)

  • १९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)

मृत्यू 

  • १९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९१)

  • २०१०: लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन.

  • २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.