चालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१७

Date : 12 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचे चीनचे मनसुबे :
  • विश्वात कुठेतरी परग्रहवासीय असतील तर त्यांच्याशी आता आम्हीच पहिल्यांदा संपर्क साधणार आहोत असा दावा चीनने केला आहे. चीन अवकाश क्षेत्रात महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी परग्रहवासीयांशी इतर देशांच्या आधी संपर्क साधण्याची तयारी सुरू केली आहे.

  • चीनची रेडिओ दुर्बीण ही ५०० मीटर अपरचरची असून ती अमेरिकेतील प्युटरेरिको वेधशाळेत असलेल्या दुर्बिणीच्या दुप्पट आकाराची असून अवकाशातील खोलवर ठिकाणाहून आलेले संदेश ती टिपू शकते.

  • २०१६ मध्ये चीन अवकाश संशोधनात शक्तिशाली बनला असून त्या देशाने टियांगगाँग २ ही अवकाश प्रयोगशाळाच जवळच्या कक्षेत सोडून अमेरिका व चीन यांची बरोबरी केली आहे.

  • अमेरिकेतील महाकाय भिंतीजवळ अनेक यूएफओचे अनुभव आले असून त्याला अनोळखी अवकाशीय वस्तू असे म्हणतात. डेली स्टार ऑनलाइनने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार चीनने अब्जावधी पौंड हे अवकाश संशोधनावर खर्च केले असून त्यात परग्रहवासीयांचे संदेश टिपण्यासाठी रेडिओ दुर्बिणीच्या उभारणीचा समावेश आहे. (source :loksatta)

क्वीन्सलँड हे तर जणू पृथ्वीवरील स्वर्गच :
  • आॅस्ट्रेलिया हा देश चित्रात, सिनेमात दिसतो, त्याहून नितांत सुंदर आहे. क्वीन्सलँड हे तर जणू पृथ्वीवरील स्वर्गच! ‘जगाच्या पाठीवर यासारखे दुसरे स्थळ नाही,’ अशी या राज्याची टॅग लाइनच आहे आणि ती रास्त आहे.

  • दर्यावर्दी, पशू-पक्षी, निसर्गप्रेमी आणि साहसाची आवड असणाºयांसाठी तर क्वीन्सलँड पर्वणीच. निळ्याशार अथांग समुद्रातील बोटीतील सफर असो की, त्याच समुद्रात डुबकी मारणे. हा अनुभव आयुष्याला वेगळीच ओल देऊन जातो. ब्रिस्बेन विमानतळावर उतरताक्षणीच तेथील मनमोहक वातावरणानेच मन प्रसन्न होऊन जाते.

  • या ब्रिस्बेन शहरात शिरण्यापूर्वी जरा प्राणिसंग्रहालय, सनशाइन कोस्ट, मलुुलुबा बीच अशा अवतीभोवतीच्या रम्य स्थळांचा फेरफटका मारून येऊ या.

  • स्टीव्ह एरविन हे नाव जिओग्राफी चॅनेलमुळे तसे आपल्या परिचयाचे. महाकाय मगरींच्या जबड्यात हात घालणारा हाच तो स्टीव्ह एरविन! त्याच्याच मालकीचे हे आॅस्ट्रेलिया प्राणिसंग्रहालय. सत्तर एकर जागेवर वसवलेल्या या संग्रहालयात एक हजाराहून अधिक प्रकारचे प्राणी आपल्याला भेटतात. (source :lokmat)

येत्या ४ वर्षात डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड होणार कालबाह्य; नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचे भाकीत :
  • दिल्ली : नीती आयोग के सीईओ अमिताभ कांत यांनी येत्या ४ वर्षाच्या काळात डेबिट व क्रेडिट कार्ड सोबत एटीएम मशीन्ससुद्धा कालबाह्य होतील आणि लोक सर्व वित्तीय व्यवहार आपल्या मोबाईलवरून करण्यास प्राधान्य देतील असे भाकीत वर्तवले आहे.

  • शनिवारी नोएडा येथील एमिटी यूनिवर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली त्यावेळी ते बोलत होते. विविध विषयावर आपले मत व्यक्त करत कांत यांनी देशाच्या लोकसंख्येवरही भाष्य केले, ते म्हणाले, भारताची लोकसंख्या हि इतिहासातील सर्वात मोठ्या संक्रमण काळातून जात आहे.

  • आपली ७२ टक्के लोकसंख्या ३२ वर्षाची आहे. आपली लोकसंख्या तरुण होत आहे तर या उलट अमेरिका व युरोपची लोकसंख्या वृद्ध होत आहे. आपल्याला सतत नवीनतेच ध्यास असणा-या समाजाची रचना करायची आहे.

  • कांत पुढे  म्हणाले कि, " येत्या ३ ते ४ वर्षात आपण सर्वच जास्तीत जास्त व्यवहार हे मोबाईलवर करण्यास प्राधान्य देऊ. यामुळे क्रेडिट व डेबिट कार्ड आणि एटीएम एक प्रकारे कालबाह्य होतील.(source :lokmat)

खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे राज्यावर केंद्राची तीव्र नाराजी; केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे आदेश :
  • मुंबई : खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडीद, मुगाची खरेदी का होत नाही, तूर खरेदीची स्थिती काय आहे, असे सवाल केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी राज्य सरकारला विचारले.

  • हमी भाव देऊनही खरेदी का होत नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी शनिवारी बैठकही घेतली. त्यात सोयाबीन, उडीद, मूग यांची फक्त ७२ हजार क्विंटलच खरेदी झाल्याचे समोर आले.

  • राज्य सरकारने बैठकीविषयी मौन बाळगले. ग्रेडिंगची पद्धत चुकीची असल्याने शेतक-यांमध्ये रोष आहे, बाजार समित्या, नाफेडचे ग्रेडर माल कमी ग्रेडचा दाखवून नाकारत आहेत. त्यामुळे शेतकरी कमी भावाने व्यापा-यांना माल विकत असल्याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त झाली.

  • खरेदी का होत नाही, हा सवाल राधामोहन यांनी केला, तेव्हा आम्ही खरेदीत पारदर्शकता आणली. नोंदणी, आधार कार्ड सक्तीचे केले, पण अधिकारी सहकार्य करत नाहीत, असे राज्याने सांगितले.(source :lokmat)

जीएसटीतील बदलामागचे कारण आणि अर्थकारण :
  • सरकारने काल झालेल्या जीएसटीच्या परिषदेत खूप महत्त्वपूर्ण बदल सुचविले आहेत. त्यात काही वस्तू आणि सेवांच्या जीएसटी दरामध्ये अतिशय मोठ्या दिलाशाची शिफारस केली आहे.

  • कराच्या दराच्या कपातीमुळे सरकारला रु. २०,००० कोटींचा फटका बसेल, असे परिषदेत बोलले गेले. तरीही सरकार असे निर्णय घेत आहे. याचा अर्थ असा तर नाही की, तेवढा महसूल त्यांनी आधीच गोळा केला आहे? की, जीएसटीची सुरुवातच चूक झाली? असे प्रश्न नक्कीच निर्माण होतात.

  • करदर २८% वरून १८% शाम्पू, मेहंदी, सौंदर्य प्रसाधने, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वायर, डिटर्जंट यासारख्या जनसामान्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू त्याचप्रमाणे चॉकलेट, कोको बटर यासारख्या खाण्याच्या वस्तू यांचा त्यात समावेश आहे.

  • या वस्तूंचे बिल सर्वसामान्य लोक साधारणत: घेत नाहीत; परंतु पुरवठादार हा त्यावरील कर गोळा करतो आणि त्याने बिल न दिल्याने तो सरकारला कर देत नाही. यामुळे करचोरी होते आणि काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळते.

  • हे या वस्तूंच्या करामध्ये बदल करण्याचे कारण सांगण्यात येत आहे. तथापि, हे सर्व व्हॅट आणि एक्साईजमध्ये कर लावलेल्या वस्तू होत्या व त्यांच्यावरील जीएसटी कराचा दर कोणता असावा, याची माहिती त्यांच्याकडे होतीच. (source :lokmat)

दिनविशेष 

जागतिक दिवस

  • जागतिक न्यूमोनिया दिन

महत्वाच्या घटना

  • १९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

  • १९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

  • १९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

  • १९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

  • १९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.

  • १९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.

  • २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • २०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

  • २००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

जन्म दिवस

  • १८६६: चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९२५)

  • १८८०: सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा पारनेर, जि.अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

  • १८८९: रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९८१)

  • १८९६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८७)

  • १९४०: हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै१९९२ – मुंबई)

मृत्यू

  • १९५९: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८६)

  • १९९७: वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.

  • २००५: रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९२४)

  • २००७: भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.