चालू घडामोडी - १२ ऑक्टोबर २०१७

Date : 12 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष :
  • बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली असून गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची नियुक्ती झाली आहे.

  • फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था ही पुण्यात आहे, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अभिनेता गजेंद्र चौहान यांना प्रतिष्ठित एफटीआयआयचे अध्यक्ष बनवलं होत, परंतु विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता.

  • अनुपम खेर यांनी १९८२ मध्ये ‘आगमन’ या चित्रपटातून सिने कारकीर्दीची सुरुवात केली होती खेर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केल २००४ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

  • अनुपम खेर यांच्या पत्नी आणि भाजप खासदार किरण खेर यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला असून “मला अनुपम खेर यांचा अभिमान असून ते जबाबदारी योग्यरित्या निभावतील. मी सरकार आणि मोदींची आभारी आहे, अशा भावना किरण खेर यांनी व्यक्त केलं.

सातवा वेतन आयोग लागू - सरकारकडून प्राध्यापकांना दिवाळी भेट :
  • केंद्र सरकारने बुधवारी देशभरातील अनुदानित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिवाळी भेट दिली असून या प्राध्यापकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

  • दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी जानेवारी २०१६ पासून प्राध्यापकांसाठी सातवा वेतन लागू करण्यात आल्याचे सांगितले.

  • देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून राज्य विद्यापीठे आणि १२१९२ महाविद्यालयांतील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश असेल.

नांदेड महानगरपालिकेची आज मतमोजणी :
  • नांदेड महानगरपालिकेची आज मतमोजणी होत असून या निवडणुकीत काँग्रेस सत्ता टिकवणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड महापालिकेची आज मतमोजणी होत आहे, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, नांदेड महापालिकेसाठी काल ६० टक्के मतदान झालं.

  • महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी मात्र भाजपनं काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं त्यामुळे अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखून ठेवतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

  • एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी हे मतदान झाल असून त्यापैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

  • या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपलं नशिब आजमवत असून प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात आला.

  • एकूण २० पैकी १९ प्रभाग चार सदस्यांचे आहेत, एक प्रभाग ५ सदस्यांचा असून एकूण ३ लाख ९३ हजार ८७२ मतदार होते, त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

गुजराती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील - विनोद तावडे
  • उत्कृष्ट साहित्याचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे त्यासाठी गुजराती साहित्यातील पाच पुस्तकांचा मराठीत तर पाच उत्कृष्ट मराठी पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद करू, असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच केले.

  • महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या कवी नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

  • कोणत्याही महान व्यक्तीचा गौरव हा त्याच क्षेत्रातील महान व्यक्तीच्या हस्ते व्हायला पाहिजे, गुजराती साहित्य अकादमीतर्फे वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करावे, त्यांना पूर्ण सहकार्य करू, साहित्य क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

  •  २०१७ चा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रतिलाल बोरीसागर, साहित्य पुरस्कार साहित्यिक आबिद सुरती, कला पुरस्कार गौतम जोशी, पत्रकारिता पुरस्कार शिरीष मेहता व संस्था पुरस्कार भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना देऊन गौरविण्यात आले.

  • महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारामध्ये चुनीलाल मडिया पुरस्कार (नवलकथा) प्रथम पुरस्कार वर्षा अडालजा आणि सोनल परीख यांना संयुक्तरीत्या तर द्वितीय पुरस्कार मालती कापडिया यांना तसेच नाटक विभागात देण्यात येणारा प्रबोध जोशी पुरस्कार उत्तम गडा यांना तसेच निबंध विभागातील वाडिलाल डगली पुरस्कार दीपक मेहता आणि तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरीत्या देऊन गौरविण्यात आले.

IG विश्वास नांगरे - पाटील कुठेही पळा, अटक करणारच :
  • राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे पुन्हा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.

  • कारण गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात दोन्ही राजे अर्थात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी, नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

  • उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आनेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरुन राडा झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे.

  • प्रत्येकाचा गुन्ह्यातील सहभाग पाहून कठोर कारवाई करु, मग तो कोणीही असो कायदा सर्वांना समान आहे, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले इतकंच नाही तर या राड्यात सहभागी असणारे आरोपी पळून पळून कुठे पळतील ?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा नांगरे पाटील यांनी दिला.

  • यावेळी नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचं आणि सातारा पोलिसांचं कौतुक केलं. 

२२ वर्षीय रुद्राली पाटील बनल्या ब्रिटिश उच्चायुक्त - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत :
  • ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुलींच्या अधिकारावर सामाजिक व जीवन मूल्याच्या दृष्टीने मूलभूत मंथन मांडणा-या लातूर येथील रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांना ब्रिटिश उच्चायुक्तालयात दोन दिवस उच्चायुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

  • रुद्राली या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नात आणि शैलेश व डॉ. अर्चनाताई यांच्या कन्या आहेत, आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधून ब्रिटिश उच्चायुक्तालयाने मुलींच्या अधिकारावर चित्रफीत स्पर्धा व चर्चा आयोजिण्यात आली होती.

  • त्यामध्ये ‘मुलींचे अधिकार, सामाजिक दृष्टिकोन व परिवर्तनाचे मार्ग’ यावर चर्चा झाली असून यात दिल्ली येथे कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय रुद्राली पाटील यांनी मुलींच्या अधिकारावर चित्रफीत बनविली.

  • त्यानंतर यशस्वी स्पर्धकांची उच्चायुक्तालयाकडून दूरध्वनीद्वारे मुलाखत घेण्यात आली असून त्यामध्ये रुद्राली यांनी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्याची भूमिका मांडली.

  • या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या रुद्राली पाटील यांना दिल्ली स्थित ब्रिटिश उच्चायुक्तालयामध्ये उच्चायुक्त म्हणून ९ व ११ आॅक्टोबर रोजी काम करण्याची संधी मिळाली, ‘कायद्याच्या पदवीच्या पाचव्या वर्षात शिकत असताना मिळालेली ही बहुमोल संधी अवर्णनीय आहे.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म : १२ ऑक्टोबर १८६८

  • उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म : १२ ऑक्टोबर १९१८

  • संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म : १२ ऑक्टोबर १९२१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन : १२ ऑक्टोबर १९६७

  • सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रितची यांचे निधन : १२ ऑक्टोबर २०११

  • भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन : १२ ऑक्टोबर २०१२

ठळक घटना

  • भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर : १२ ऑक्टोबर २०००

  • संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर : १२ ऑक्टोबर २००१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.