चालू घडामोडी - १२ ऑक्टोबर २०१८

Date : 12 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप :
  • भारतीय संविधान आकारास येत असताना ज्या ज्या बाबी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांत समाविष्ट करणे घटनाकारांना शक्य झाले नाही, त्या सर्व बाबी त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणात समाविष्ट केल्या आहेत. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे ही दोन प्रकरणे जरी कोणी वाचली, तरी त्यांना भारतीय घटनाकारांच्या महासागराहूनही विशाल असलेल्या हृदयाचे आणि त्यांच्या स्वप्नातील प्रगत, प्रगल्भ आणि प्रबुद्ध भारताचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

  • २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी ३९५ कलमे व आठ परिशिष्टांचे भारतीय संविधान आपण स्वीकारले. भारतीय संविधानात आजवर सुमारे शंभर घटनादुरुस्त्या झालेल्या असून अनेक तरतुदींत अनेक महत्त्वपूर्ण बदल व पुनर्बदल झालेले असले, तरी त्यातील कलमांचा क्रमांक एखादा अपवाद वगळता बदलण्यात आलेला नाही. त्यामुळे ढोबळ मानाने कलमांची संख्या आहे तीच राहिली आहे. संविधानात काही नवी परिशिष्टे घातल्यामुळे त्यांची संख्या मात्र वाढून ती बारा इतकी झाली आहे.

  • भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातीलङ्कमूलभूत अधिकारांना संविधानाचा आत्मा किंंवा प्राण असे संबोधले होते. कलमङ्कक्र. १२ ते ३५ मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केल्यानंतर संविधानकारांनी कलम क्र. ३६ ते ५१ङ्कमध्येङ्कमार्गदर्शक तत्त्वांची योजना केलेली आहे. सुरुवातीला भारतीय संविधानात सात प्रकारचे मूलभूत अधिकार होते. त्यातला एक ‘संपत्तीचा अधिकार’ हा १९७८ साली ४४ व्या घटनादुरुस्तीनंतर काढून टाकण्यात आला व त्याचा समावेश संविधानाच्या ३०० व्या कलमात सर्वसाधारण अधिकार म्हणून करण्यात आला.

  • सध्या समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि न्यायालयीन उपाय योजण्याचा अधिकार असे सहा प्रकारचेङ्कमूलभूत अधिकार लागू आहेत.

पॅरा आशियाई; शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्ण :
  • जकार्ता : गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. दोन वर्षांचा असताना पोलिओविरोधी मोहिमेत बानावट औषधाचा डोस दिल्यामुळे शरदवर ही परिस्थिती ओढवली होती.

  • विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक विजेता असलेल्या २६ वर्षांच्या शरदने उंच उडीच्या टी-४२/६३ प्रकारात १.९० मीटर उडी घेत आशियाई तसेच स्पर्धा विक्रमांची नोंद केली. टी ४२/६३ प्रकार शरीराच्या खालच्या भागातील दिव्यांगाशी संबंधित आहे. आॅलिम्पिक कांस्य विजेता वरुण भाटी याने १.८२ मीटर उडी घेत रौप्य जिंकले. कांस्य थंगावेलू मरियप्पनला मिळाले. मरियप्पनने याच प्रकारात रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते, हे विशेष.

  • ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड प्रकारात आनंदन गुणसेकरमने टी ४४,६२/६४ प्रकारात रौप्य व विनय कुमारने कांस्य जिंकले. टी४५/४६/४७ प्रकारात संदीप मान याला कांस्य मिळाले. हे दोन्ही प्रकार पायाच्या वरील भागाच्या दिव्यांगाशी संबंधित आहेत. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत (अंधत्व) राधा व्यंकटेशला कांस्य, तर जलतरणात स्वप्निल पाटीलला ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्यवर समाधान मानावे लागले.

  • गुर्जरला भालाफेकीत रौप्य; देवेंद्र झाझरियाकडून निराशा भारताचा भालाफेकपटू सुंदरसिंग गुर्जर याने गुरुवारी पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, दोन वेळेचा सुवर्ण विजेता, ‘खेलरत्न’चा मानकरी देवेंद्र झझारिया याने घोर निराशा केली. तो चौथ्या स्थानी राहिला.

'या' देशात चक्क तीन राष्ट्राध्यक्ष निवडले जातात :
  • मुंबई- अरे काय, आम्हाला एक पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष निवडायचा झाला तर किती प्रयत्न करावे लागतात आणि या देशात चक्क तीन राष्ट्राध्यक्ष निवडले जातात? असा प्रश्न जगातील कोणत्याही नागरिकाला पडू शकतो. पण युरोपमधल्या एका देशात तीन राष्ट्राध्यक्ष निवडले जातात. बोस्निया-हर्जेगोविना असं या देशाचं नाव आहे. युगोस्लावियाने दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात जास्त भौगोलिक, वांशिक, धार्मिक, भाषिक अस्थिरता अनुभवली.

  •  बाल्कन प्रदेशातील देशांमध्ये इतके नवे देश निर्माण झाले कोणत्याही भौगोलिक प्रदेशाचे तुकडे पडण्याला बाल्कनायजेशन अशा संज्ञेने ओळखलं जाऊ लागलं. आज हे देश युद्ध, दंगली, स्थलांतरितांचे लोंढे अशा तणावातून थोडे स्थिर झाले असले तरी बोस्निया हर्जेगोविनामधील राजकीय स्थिती कमालीची गुंतागुंतीची आहे.

  • भारताच्यादृष्टीने चिमुकल्या म्हणाव्या अशा या देशातसुद्धा फेडरेशन आॅफ बोस्निया अँड हर्जेगोविना (सोयीसाठी याला फेडरेशन असं संबोधलं जातं) आणि रिपब्लिका स्राप्स्का असे दोन भाग आहेत. त्यातल्या पहिल्या भागात बहुसंख्येने बोस्निआक (मुस्लीम) आणि क्रोट्स (कॅथलिक) तर दुसऱ्या भागामध्ये मुख्यत: सर्ब (आॅर्थोडॉक्स) लोक राहातात. यांच्याबरोबर रोमा (जिप्सी) आणि ज्यू हे अल्पसंख्येने आढळतात. या देशातले नागरिक तीन राष्ट्राध्यक्ष निवडतात.

  • त्यातले एक बोस्निआक, एक क्रोट आणि तिसरे सर्ब वंशाचे असतात. त्यातील बोस्निआक आणि क्रोट वंशाचे फेडरेशनमधून तर सर्ब राष्ट्राध्यक्ष रिपब्लिका स्राप्स्कामधूनच निवडून आले पाहिजेत असा नियम आहे.

  • जर फेडरेशनमध्ये राहाणाऱ्या सर्ब व्यक्तीला आपल्या वंशाच्या म्हणजे सर्ब व्यक्तीला मतदान करायचे असेल तर ते शक्य नाही तसेच स्राप्स्कामध्ये राहाणाऱ्या बोस्निआक आणि क्रोट लोकांना आपल्या वंशाच्या लोकांना मतदान करायचे असेल तर ते शक्य नाही कारण तेथून फक्त सर्ब व्यक्तीच निवडली जाऊ शकते. दर चार वर्षांनी येथे हे तीन राष्ट्राध्यक्ष, संसदेतील प्रतिनिधी आणि फेडरेशन व स्राप्स्काची विधिमंडळांतील प्रतिनिधी निवडले जातात.

मुंबईतील ‘औद्योगिक क्रांती केंद्रा’चे दिल्लीत उद्घाटन :
  • सॅनफ्रान्सिको पाठोपाठ थेट मुंबईत ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ उभे राहत असून त्याचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दावोस येथे जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अशा स्वरुपाचे जगातील हे दुसरे केंद्र आहे. जागतिक अर्थ मंचाच्या वतीने दिल्लीत ‘औद्योगिक क्रांती केंद्र ४.०’चे आयोजन करण्यात आले होते.

  • या केंद्राचे महत्त्व स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यत तंत्रज्ञानाचा वापर साह्य़कारी ठरला आहे. हे केंद्र मुंबईत स्थापन होत असल्याने आता शेतीच्या विविध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तवता येतील.

  • शेतीमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय साधता येऊ शकेल. हवामान बदलानुसार पीक पद्धतीतही बदल करणे शक्य होईल. पीक साखळी निर्माण करणे, रोगांवरील उपाय, दुष्काळ परिस्थितीवरही उपाय शोधणे सोपे होणार आहे.

  • औद्योगिक क्रांती केंद्राच्या मदतीने ड्रोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रशासकीय सेवांमध्येही सुधारणा करता येतील. भविष्यात कृत्रिम बुध्दिमत्तेचा अधिकाधिक वापरऔद्योगिक क्रांती केंद्राच्या साह्य़ाने करणे शक्य होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती :
  • मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एस आयटी) आयुक्तपदी राज्य शासनाने अपर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली.

  • अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम आणि हेमंत नगराळे यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४९२: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.

  • १८५०: अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.

  • १८७१: भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

  • १९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.

  • १९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.

  • १९६८: मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.

  • १९९८: तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.

  • २०००: भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.

  • २००१: संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.

जन्म 

  • १८६८: ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

  • १९१८: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)

  • १९२१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१)

  • १९२२: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून २००२)

  • १९३५: भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड)

  • १९६७: समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१०)

  • २०११: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रितची यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)

  • २०१२: भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.