चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१७

Date : 12 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इतिहासकार रामचंद्र गुहांना भाजपने बजावली कायदेशीर नोटीस :
  • ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

  • गौरी लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएस आणि भाजपचा थेट संबंध नसला तरीही अशा हत्या व्हाव्यात, समाजात तेढ निर्माण व्हावी, सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात भावना भडकवल्या जाव्यात असे वातावरण निर्माण करण्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हातभार लावला असल्याचे रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे.

  • भाजपने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली असून अशा हल्लेखोरांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असते, ज्यानंतर कर्नाटकच्या भाजयुमोने रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

  • सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात या लोकांची माथी भडकवण्याचे कामही असेच नेते करत असतात असेही गुहा यांनी म्हटले असून एका दैनिकात लिहिलेल्या लेखात रामचंद्र गुहा यांनी हे सगळे आरोप केले होते.

भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य कोणत्याही वादापेक्षा मोठे : जयंत पवार
  • कोणत्याही साहित्याची केवळ लाट असून चालत नसून त्यामागे विचार असेल तरच तो लेखक व ते साहित्य टिकतील वरवरची निर्माण होणारी वादग्रस्तता ही माध्यमे तयार करतात.

  • ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य समजून न घेता ते काय बोलतात, याचा अर्थ काढून वाद निर्माण केले असून त्यांची अनेक विधाने मूलभूत आहेत, तर काही वादग्रस्त विधाने काहींना न पटणारीही आहेत.

  • त्यामुळे नेमाडे कायम वेगळ्या कारणाने चर्चेत राहत असून त्यांचे साहित्य त्यापलीकडे मोठे आहेत त्यांच्या कादंबऱ्या, कविता या वादापेक्षा मोठ्या असून त्यामुळे त्या टिकणार आहेत ती लाट आहे, असे मला वाटत नाही, असे मत ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार यांनी व्यक्त केले आहे.

  • कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या लेखन कार्यशाळेत ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी नेमाडे यांच्या साहित्याच्या लाटेचे दिवस भरले असून त्यावर जयंत पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

  • पवार यांनी सांगितले की, मराठी साहित्यात अशी कोणाची आणखी लाट होती, हे मला माहीत नाही. कोणाची अशी लाट नसते. त्यांच्याभोवती त्यांच्या चांगल्यावाईट कारणांनी वलय निर्माण होते. 

मोदींच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२२ रोजी धावणार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी होणार असून मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

  • पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद नगरी सज्ज झाली असून प्रकल्पाच्या नियोजनानुसार काम पूर्ण झाल्यास १५ ऑगस्ट २०२२ रोजी बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

  • मोदी गुरुवारी दुपारी अडीच वाजता, तर आबे दुपारी तीन वाजता अहमदाबाद पोहोचतील विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत ते रोड शो करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे रोड शोचा मार्ग सात किलोमीटरचा असून या मार्गावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

  • बुलेट ट्रेन प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण झाल्यास १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशातील पहिली बुलेट ट्रेन धावेल १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपानचे कर्जसहाय्य घेण्यात आले आहे. 

  • जपानकडून भारताला ०.१ टक्के दराने ८८ हजार कोटींचे कर्ज देण्यात येणार असून हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यास मोदींनी १५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या देखरेखीसाठी नवे निरीक्षक नेमा : सुप्रीम कोर्ट
  • सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना दहा दिवसांच्या आत निरीक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे.

  • अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या देखरेखीसाठी नव्या निरीक्षकांची (ऑब्जर्वर) नियुक्ती केली जाणार असून यामध्ये जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त न्यायाधीश किंवा विशेष न्यायाधीश असू शकतात.

  • सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्ह्यातील न्यायमुर्तींच्या नावाची सूची उच्च न्यायालयाला परत पाठवली असून याबाबत मोहम्मद हाशिम यांच्याकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल  मुख्यमंत्र्यांना भेटले :
  • लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली असून यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली.

  • मुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे, त्याला जोडणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी आदी संदर्भात चर्चा झाली.

  • मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबई शहरात प्रभावी आणि सुलभ परिवहन व्यवस्था, परवडणारी घरे आणि स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी लंडन शहराने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

  • राजेश अग्रवाल म्हणाले, लंडन शहरात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी स्वतंत्र चिफ डिजिटल आॅफिसर नेमण्यात आला आहे.

  • सध्याच्या मुलभूत सुविधा वापरूनच शहराची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी, परवडणारी घरे, सक्षम परिवहन व्यवस्था यासह विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

'कौन बनेगा करोडपती' मध्ये सहभागी झाल्याने प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अडचणीत :
  • छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अडचणीत आल्या होत्या.

  • उपजिल्हाधिकारी केबीसीमध्ये सहभागी झाल्याच विषय इतका वाढला की या प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला.

  • मंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’ साठी झाली होती.

  • भोपाळमध्ये ऑडिशन झाल्यानंतर अनुराधा अग्रवाल यांना कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मुंबईला बोलावण्यात आल बीबीसीने हे वृत्त दिलं आहे. 

  • अनुराधा यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभाद घेतला या कार्यक्रमात त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉट सीटवर बसून प्रश्नांची उत्तरंही दिली.

  • प्रश्नांची अचून उत्तरं दिल्याने अनुराधा यांनी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरावर ठरलेले पैसेही मिळाले पण केबीसीचं शुटिंग संपवून मंगोलीमध्ये परतल्यानंतर केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना परवानगीच देण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समजली. 

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • राष्ट्रीय दिन : केप व्हर्दे

  • राष्ट्रीय क्रांती दिन : इथियोपिया

जन्म /वाढदिवस

  • मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू : १२ सप्टेंबर १९४८

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर : १२ सप्टेंबर १९५२

  • पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक : १२ सप्टेंबर १९९२

ठळक घटना

  • 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण : १२ सप्टेंबर २००२

  • आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले : १२ सप्टेंबर १९४८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.