चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९

Updated On : Jan 13, 2019 | Category : Current Affairsअमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवार रिंगणात :
 • वॉशिंग्टन : हवाई बेटांतून अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेवर सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या तुलसी गब्बार्ड यांनी २०२० मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या स्पर्धेत उतरण्याचे जाहीर केले आहे.

 • विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा निवडणूक लढविण्याचे याआधी जाहीर केले आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक इच्छुकांमधून गब्बार्ड यांना खरोखरच उमेदवारी मिळाली तर अमेरिकेची अघ्यक्षीय निवडणूक लढविणाºया त्या पहिल्या हिंदू उमेदवार ठरतील.

 • निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची कारणे विशद करताना ३७ वर्षांच्या गब्बार्ड यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, अमेरिकी जनतेपुढे असलेल्या अनेक आव्हानांविषयी मी चिंतित असून, त्यांची सोडवणूक करण्याची माझी इच्छा आहे. आरोग्य सेवा, फौजदारी न्यायव्यवस्था याखेरीज युद्ध आणि शांतता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे.

 • डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार निवडण्यासाठी प्राथमिक मतदानास फेब्रुवारी २०२० मध्ये इवोहा राज्यातून सुरुवात होईल. उमेदवाराची अंतिम निवड त्या वर्षीच्या उन्हाळ्यात पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात होईल. जो उमेदवार ठरेल तो फेब्रुवारी २०२० मध्ये होणाºया निवडणुकीत ट्रम्प यांच्याविरुद्ध डेमोक्रॅटिक उमेदवार असेल.

नाबाद ९९ - बी.के. बिर्ला जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती :
 • मुंबई : बसंतकुमार बिर्लांचा जन्म १२ जानेवारी १९२१ रोजी कोलकात्यात झाला. सुप्रसिद्ध उद्योगपती घनशामदास बिर्ला यांचे ते कनिष्ठ चिरंजीव व विदर्भवीर ब्रिजलाल बियाणी यांचे जामात. कै. सरलादेवी या त्यांच्या पत्नी. बसंतकुमार बिर्ला यांनी १५ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला व वस्त्रोद्योग, सिमेंट, टायर, रिफॅक्टरीज, कागद, स्पन पाईप, चहा, कॉफी, प्लायवूड इत्यादी क्षेत्रात कंपन्या व १० अब्ज डॉलर्स संपत्ती मूल्य असलेला बी.के. बिर्ला उद्योगसमूह उभा केला.

 • सरलादेवींच्या मृत्यूनंतर २०१५ साली बसंतकुमार बिर्ला यांनी आपल्या १० कंपन्या नातू कुमारमंगलम बिर्ला, मुली मंजुश्री खेतान, जयश्री मोहता व नात विदुला जालान यांच्या सुपुर्द करून व्यवसाय-निवृत्ती स्वीकारली. उद्योग विश्वात ‘बीकेबाबू’ अशी ओळख असलेले बिर्ला अद्यापही अधूनमधून समूहाच्या कंपन्यांच्या कार्यालयात भेटी देत असतात.

 • अमेरिकेत वर्क-यूएस या संस्थेने तयार केलेल्या यादीनुसार जगात ८५ वर्षापेक्षा अधिक वयाचे व एक अब्ज डॉलर्स संपत्तीमूल्य असलेले १३ उद्योगप्रमुख आहेत आणि विशेष म्हणजे त्यापैकी तब्बल आठ उद्योगप्रमुख भारतीय आहेत. ही बाब उद्योगजगताला प्रेरणा देणारी आहे.

 • बी.के. बिर्लानंतर महाशियान दिहट्टी (एमडीएच) मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचा नंबर लागतो. ते ९६ वर्षांचे आहेत व आजही एमडीएच मसाल्यांच्या जाहिरातीत टीव्हीवर येत असतात.

 • तिसऱ्या क्रमांकावर जपानचे नोबुत्सुगू शिमिझू (९१) आहेत. ते सोलर पॅनेल्स बनवणाºया लाइफ कॉर्पोरेशनचे प्रमुख आहेत. चौथ्या क्रमांकावर शिनतारो त्सुजी (९०) आहेत. फिल्म निर्मिती व वितरण करणाºया हॅलो किट्टी कॉर्पोरेशनचे ते अध्यक्ष आहेत.

 • पाचव्या क्रमांकावर शापूरजी पल्लनजी मिस्त्री समूहाचे पल्लनजी मिस्त्री (९०) आहेत. शापूरजी पल्लनजी समूह टाटा सन्स या टाटा समूहाचा सर्वांत मोठा भागधारक आहे. पल्लनजी मिस्त्री यांचे संपत्तीमूल्य १७ अब्ज डॉलर्स आहे. यानंतर श्री सिमेंटस् समूहाच्या बेणूगोपाल बांगुर यांचा नंबर लागतो. त्यांचे संपत्ती मूल्य ४ अब्ज डॉलर्स आहे.

पत्रकारांची पेंशन योजना 8 दिवसात सुरु होणार - गृहराज्यमंत्री :
 • सिंधुदुर्ग : पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात सरकारने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून, येत्या 8 ते 15 दिवसांत याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात दिली. यासोबतच नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक आहे, असेही ते म्हणाले.

 • सिंधुदुर्गात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्गात साडेचार कोटी रुपये खर्चून स्मारक आणि पत्रकार भवन उभारण्यात येत आहे.

 • ते राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल.  कमीत कमी कालावधीत या पत्रकार भवनाची उभारणी केली जाईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

 • यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन भव्य आहे. कमीत कमी वेळात ही भव्य इमारत उभी रहावी अशी अपेक्षा आहे. तर सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन हे राज्यात आदर्शवत ठरेल, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी :
 • आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली. आता राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्याने या विधेयकाचं रुपांतर कायद्यात होणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना १० टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 • नोकरी आणि शिक्षण या दोहोंमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण मिळावं म्हणून हे विधेयक ८ जानेवारीला लोकसबेत मांडलं. लोकसभेतील ३२६ खासदारांपैकी ३२३ जणांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केलं, तर तीन खासदारांनी विरोधात मतदान केलं.

 • राज्यसभेत हे विधेयक मांडलं गेलं तेव्हा मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मात्र हा निकालही १६५ मतं विधेयकाच्या बाजूने तर ७ मते विरोधात असा लागला. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना भाजपाची कसोटी पणाला लागली होती. मात्र ती कसोटी भाजापने पार केली आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांना हिंदू महिला देऊ शकते आव्हान :
 • पुढच्यावर्षी २०२० साली अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गॅबर्ड या हिंदू महिलेकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान मिळू शकते. तुलसी गॅबर्ड या अमेरिकन काँग्रेसच्या कायदेमंडळाच्या सदस्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असल्याचे तुलसी यांनी जाहीर केले आहे.

 • तुलसी गॅबर्ड या डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या उमेदवार आहेत. त्यांच्याआधी सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी सुद्धा शर्यतीत असल्याचे जाहीर केले आहे. गॅबर्ड अवघ्या ३७ वर्षांच्या आहेत. कॅलिफोर्नियातील भारतीय वंशाचे सिनेटर कमला हॅरिस यांच्यासह डेमोक्रॅटसकडून एकूण १२ जण राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करु शकतात.

 • हवाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तुलसी गॅबर्ड यांनी डेमोक्रॅटसकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करणार असून पुढच्या आठवडयात याची घोषणा करीन असे शुक्रवारी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गॅबर्ड अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणाऱ्या पहिल्या हिंदू ठरु शकतात.

 • गॅबर्ड या भारतीय अमेरिकन नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर त्या अमेरिकेतील सर्वात तरुण आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. अमेरिकेतील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या बिगर ख्रिश्चन आणि पहिल्या हिंदू महिला ठरतील.

मराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या :
 • कर्जमाफीचा लाभ, बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शासनाकडून घोषणा झाली असली तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यातच आवकाळी पाऊव व गारपीटीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडून गेले होते. घेतलेले कर्ज कसे फेडावे या काळजीने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पतकारने भाग पडले होते. मराठवाड्यात वर्षभरात तब्बल ९४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 • मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे उत्पादन घटले आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत भर पडली. अशा नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज होती. पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने न घेतल्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत गेल्या.

 • २०१७ या वर्षात मराठवाडा विभागात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे. त्याच प्रमाणे गेल्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही,  सरकारने केलेल्या कर्जमाफी योजना फसवी निघाली त्याचा लाभ मिळण्यास झालेला विलंब त्याचबरोबर बोंडआळीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदत देण्याकडे शासनाने केलेली दिरंगाई आणि कमी पावसामुळे घेतलेल्या पिक हातातून गेल्यामुळे आत्महत्येच्या घटना वाढण्यास कारणीभूत ठरल्या.

 • १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१८ कालावधीत मराठवाड्यात तब्बल ९४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यातील ६०३ शेतकरी कुटुंबांना सरकारी मदत मिळाली. त्यातील ८० प्रकरणे अपात्र ठरवली, तर आतापर्यंत २६४ प्रकरणांची चौकशी अद्यापही शासन दरबारी सुरू असल्यामुळे प्रलंबित आहेत. काही प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांचे वारस मदतीपासून वंचित राहिले आहेत. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या बीड १९७,औरंगाबाद १४९, उस्मानाबाद १४० जिल्ह्यात झाल्या आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

 • १८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

 • १९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

 • १९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

 • १९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

 • १९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

 • १९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

 • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

 • १९१९: आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

 • १९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००९)

 • १९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

 • १९४८: जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

 • १९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८३२: लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

 • १९७६: सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

 • १९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

 • १९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

 • २०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)

 • २०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)

टिप्पणी करा (Comment Below)