चालू घडामोडी - १३ जुलै २०१८

Date : 13 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचे प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण :
  • भारताकडून पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रणावर ट्रम्प यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • भारताने पाठवलेल्या या प्रस्तावावर अमेरिकन प्रशासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात ट्रम्प यांना हे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ट्रम्प सरकार भारताच्या या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनेक राजकीय चर्चांचा विचार करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

  • जर ट्रम्प यांनी भारताचे हे निमंत्रण स्विकरले तर यापूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत झालेल्या भेटीपेक्षा यावेळी परस्परांमधील आश्वासने अधिक नाट्यमय असतील. २०१५मध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तत्कालिन अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मोदी सरकारचे पहिले प्रमुख पाहुणे बनले होते.

  • सध्या जगातील जवळजवळ प्रत्येक देशाची ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सामान्य ठेवण्यासाठी धडपड सुरु आहे. ट्रम्प यांचा कडक आणि चिडचिडा स्वभाव इतर देशांसाठी सामंजस्याची भुमिका घेणे आव्हान ठरते. त्यामुळे जर भारत हे सर्व दिव्य पार करु शकला तर भारत यासाठी अपवाद असेल.

भारतीय धावपटू हिमा दासचा जागितक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम :
  • टॅम्पर, फिनलंड : भारताची धावपटू हिमा दासने 'सुवर्ण'मयी विक्रमाला गवसणी घातली आहे. फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला.

  • फिनलंडमधील टॅम्परमध्ये आयएएएफ वर्ल्ड अंडर 20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप सुरु आहे. हिमाने महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली.

  • हिमा दासने चारशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत 51.46 सेकंदांची वेळ नोंदवली. 18 वर्षांची हिमा आसामची रहिवासी आहे. एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर इव्हेंटमध्ये ती सहावी आली होती.

  • या स्पर्धेत रोमानियाची अँड्रिया मिकलोस हिने रौप्यपदक, तर अमेरिकेच्या टेलर मॅन्सन हिने कांस्यपदकाची कमाई केली.

  • भारताच्या नीरज चोप्राने 2016 साली या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत नवा विश्वविक्रम रचला होता. त्यानंतर हिमा दासही नीरज चोप्राच्या पंक्तीत विराजमान झाली आहे.

सर्वात कमी वयात बनली अब्जाधीश, मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागे :
  • नवी दिल्ली : अमेरिकेतील कायली जेनर सर्वात कमी वयात अब्जाधीश ठरली आहे. कायलीने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे. मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. मात्र कायलीने अवघ्या 20व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे. फोर्ब्स'नं अमेरिकेतील 'सेल्फ मेड बिलेनिअर'ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर आहे.

  • 'कायली कॉस्मेटिक्स' नावाच्या सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती मालक आहे. ही कंपनी महिलांसाठीचे सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू तयार करते. दोन वर्षापूर्वी कायलीने या कंपनीची स्थापना केली होती. अवघ्या तीन वर्षात कंपनीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे. कायलीच्या कंपनी आजवर 63 कोटी डॉलरचे सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली आहे.

  • फोर्ब्स मासिकानं दिलेल्या माहितीनुसार कायलीची संपत्ती सध्या 61 अब्ज 74 कोटींच्या घरात आहे. कायलीची कंपनी 'कायली कॉस्मेटिक्स'ची उलाढाल 54 अब्जांच्या आसपास आहे. येणाऱ्या काळात कायलीचा व्यवसाय आणखी वाढण्याचा अंदाज आहे. कायलीची तिच्या कंपनीत 100 टक्के भागिदारी आहे. कायलीने तिच्या कंपनीची सुरुवात 29 डॉलर म्हणजेच जवळपास 1990 रुपयांच्या लिप किटपासून केली होती. या किटचा उपयोग लिपस्टिक आणि लिप लायनर यांना मॅच करण्यासाठी केला जातो.

  • फोर्ब्सच्या यादीत कायलीला अमेरिकेतील सर्वात कमी वयाची अब्जाधीश ठरली आहे. कायलीने ट्वीट करत फोर्ब्सचे आभार मानले आहे. कायलीने ट्वीटमध्ये म्हटलं की, 'धन्यवाद फोर्ब्स. मी नशीबवान आहे, मला जे आवडतं ते काम मी दररोज करते.'

२९ कोटी नागरिकांची प्रति व्यक्ती कमाई ३० रुपयांपेक्षाही कमी :
  • मुंबई : 'फोर्ब्स'च्या यादीत भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढून 119 झाली आहे, जी अमेरिका आणि चीन या देशांना सोडून इतर सर्व देशांपेक्षा सर्वाधिक आहे. या 119 अब्जाधीशांची संपत्ती 440 बिलियन डॉलर म्हणजे 30 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. 1990 पूर्वी देशात फक्त दोन अब्जाधीश होते, मात्र 1991 च्या आर्थिक बदलांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने उसळी घेतली आणि 2016 पर्यंत अब्जाधीशांची संख्या 84 झाली.

  • या काळात अर्थव्यवस्था केवळ 2.3 ट्रिलियनची होती. हा आकडा चीनने 2006 मध्येच गाठला होता. मात्र चीनमध्ये तेव्हा केवळ दहा अब्जाधीश होते. पण भारताच्या त्या आकाराच्या अर्थव्यवस्थेत साडे आठ पट अधिक 84 अब्जाधीश होते. 2014 साली मोदी सरकारने काळा पैसा भारतात आणणं आणि गरीब-श्रीमंत यांच्यातली दरी कमी करणं हा अजेंडा बनवला होता. मात्र याउलट जालं. अब्जाधीशांची संख्या वाढून 84 हून 119 झाली. सोबतच नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारखे उद्योगपती बँकांना गंडवून पसार झाले.

  • 2014 मध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न 88 हजार 538 रुपये होतं. हे 2018 मध्ये वाढून एक लाख 12 हजार म्हणजे प्रति दिन प्रति व्यक्ती कमाई 306 रुपये आहे. यातलं धक्कादायक वास्तव म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील 29 कोटी नागरिकांची प्रति दिन कमाई 30 रुपयांपेक्षाही कमी आहे. यामुळेच मोठा वर्ग दारिद्र्य रेषेखाली येतो.

  • भारत या वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याचवर्षी भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत फ्रान्सलाही मागे टाकलं. मात्र त्या फ्रान्सला मागे टाकल्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे, ज्या देशाची लोकसंख्या केवळ 6.6 कोटी म्हणजे राजस्थानच्या लोकसंख्येएवढी आहे.

एमपीएससीच्या नियुक्त्या ३० जुलैपर्यंत स्थगित, याचिकेवर सुनावणी ३० रोजी :
  • औरंगाबाद : आरक्षित संवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नियुक्तीस नकार देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धोरणास आव्हान देणा-या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. परिणामी एमपीएससीने ३० तारखेपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निवेदन गुरुवारी न्यायालयात केले. त्यामुळे आता एमपीएससीच्या नियुक्त्या स्थगित झाल्या आहेत.

  • ३० जुलै रोजी राज्याचे महाधिवक्ता काही प्रकरणांच्या सुनावणीसाठी औरंगाबाद खंडपीठात येणार आहेत. तोपर्यंत आयोग कोणत्याही पदावर कोणाचीही नियुक्ती करणार नाही, असे निवेदन औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी गुरुवारी याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केले.

  • नांदेड येथील याचिकाकर्ती चारुशीला चौधरी आणि इतर २७ मुलींनी लोकसेवा आयोगातर्फे महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या विविध पदांकरिता खुल्या प्रवर्गातून अर्ज केले होते. हे परीक्षार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीसाठी बोलावले होते. त्यांच्या मुलाखतपत्रावर अशी अट टाकण्यात आली होती की, मुलाखतीला येताना सोबत शाळेचा दाखला आणणे अनिवार्य आहे.

  • उमेदवार आरक्षित जातीचा असेल, तर त्यांना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देता येणार नाही, असे आयोगाचे म्हणणे होते. वस्तूत: याचिकाकर्त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला असल्यामुळे आयोेगाने त्यांंना जातीची प्रमाणपत्रे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उमेदवारांना मागास जातीचा लाभ जरी घ्यावयाचा नसला तरी केवळ ते आरक्षित जातीमध्ये जन्मल्यामुळे आयोगाने त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. त्याविरुद्ध त्यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. हे प्रकरण सध्या औरंगाबाद खंडपीठात आहे.

आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर :
  • जेरुसलेम- आकाराने अत्यंत लहान असूनही जगभरातील विविध देशांना तंत्रज्ञान पुरवणाऱ्या, संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करणाऱ्या इस्रायलने आता अंतराळात नवी झेप घेण्याचे निश्चित केले आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये चांद्रमोहीम सुरु करत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.

  • या मोहिमेत इस्रायल एक मानवरहित यान चंद्रावर पाठवणार असून त्याचे वजन 585 किलो असेल. हे यान 13 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर पोहोचेल असे इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सांगितले

  • अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यासही या मोहीमेत केला जाणार आहे.

  • गुगल लुनार एक्सप्राईज या मोहीमेअंतर्गत या प्रकल्पाची निवड झाली आहे. या प्रकल्पास 2.5 कोटी युरोची मदत मिळाली आहे. कमी खर्चात चांद्रमोहीमेचे आयोजन करणाऱ्या शास्त्रज्ञ व उद्योजकांना ही प्रोत्साहनपर मदत केली जाते.

  • इस्रायलमधील स्पेसआयएल या संस्थेने इस्रायली सरकारच्या ताब्यातील एरोस्पेस इंडस्ट्रीज या संस्थेबरोबर एकत्र काम करत चांद्रमोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६०: पावनखिंडीतील लढाई.

  • १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेल्या. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

  • १८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

  • १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

  • १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

  • १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

  • १९७७: वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.

जन्म 

  • १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

  • १९४२: अमेरिकन अभिनेते हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.

  • १९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

  • १७९३: फ्रेंच क्रांतिकारी जीन-पॉल मारत यांचे निधन.

  • १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

  • १९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

  • १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.

  • १९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

  • २०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.