चालू घडामोडी - १३ जून २०१७

Date : 13 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
…म्हणून मोदी आणि ट्रम्प यांची पहिली भेट महत्त्वाची ठरणार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल.

  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. मोदींनीदेखील हे आमंत्रण स्वीकारले होते.

  • त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांची हे भेट विशेष ठरणार आहे.

  • पॅरिस करारावरुन भारतावर केलेली टीका, एच१बी व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांना बसलेला हादरा आणि पाकिस्तानच्या कुरापती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

शालेय विद्यार्थ्यांनी अंतराळात सोडले टेडी बेअर !
  • ब्रिटनमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगाचा एक भाग म्हणून सोडलेले टेडी बेअर अंतराळात एक लाख फूट उंचीपर्यंत जाऊन सुमारे साडेचार तासांनी पुन्हा जमिनीवर आले!

  • हे टेडी बेअर ‘स्ट्रॅटोस्फियर’ या पृथ्वीच्या वातावरणाच्या दुसऱ्या पातळीपर्यंत पोहोचले. साडेचार तास हवेत राहून २८ किमीचा प्रवास केला. अतिउंचीवरील विरळ हवेमुळे अखेरीस फुग्याचा स्फोट झाला व ते गुरुत्वाकर्षणाने पुन्हा जमिनीवर आले.

  • ‘मेट्रो.को. युके’ने दिलेल्या वृत्तानुसार ८ ते १३ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अवकाशाचा अभ्यास करण्याच्या प्रयोगाचा एक भाग म्हणून ‘आॅपरेशन कॉस्मिक डस्ट’ नावाच्या एका प्रोजेक्ट अंतर्गत हे टेडी बेअर फुग्याला बांधून सोडले होते.

आयएसएसएफ विश्व चषकात भारताला सुवर्णपदक :
  • भारताचा जितू राय अणि हीना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्व चषकात दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र गटात अंतिम फेरीत रशियाला ७-६ ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर फ्रान्सने इराणवर विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.

  • या आधी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जितू आणि हीना दोन्ही पुरुष आणि महिला गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत अनुक्रमे १२ वे अणि नववे स्थान मिळवले होते, त्यामुळे दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नव्हते.

  • आघाडीचे आठ खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतात. मिश्र गटात भारत पदक तालिकेत नाही. मात्र, टोकियो ऑलिम्पिक पदक स्पर्धेसाठी भारताला मंजुरी मिळाली आहे.

  • भारताच्या या जोडीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. गाबालात चीनचा संघ सहा पदकांसह आघाडीवर आहे. त्यात चीनने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.

३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाईमध्ये भरणार :
  • मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा ११ जून रोजी अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.

  • बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने ३९वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे.

  • तसेच या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेसाहेब यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. ह्यया संमेलनात शिक्षक साहित्यिकांना अधिक वाव देण्यात येणार आहे.

  • गतवर्षी ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन लोकरंग भूमी सोयगाव येथे भरविण्यात आले होते. अंबाजोगाईमध्ये १९८२ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर :
  • गेल्या आठवड्यात लागोपाठ निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकालही लवकरच लागणार आहे.

  • राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल १३ जून रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभराने लागत आहे.

  • सीबीएसई आणि आयसीएसई नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा (SSC) निकाल प्रलंबित होता. मात्र १३ जूनला दहावीचा निकाल घोषित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारताविरुद्ध सेमीफायनल खेळण्यापूर्वी बांगलादेशची 'गर्जना'
  • पहिल्यांदाच आयसीसी टूर्नामेंटमध्ये सेमीफायनलला धडक मारल्याने बांगलादेशच्या संघाचा आनंद गगनाला भिडला आहे.

  • १५ जूनला बांगलादेशची टक्कर बर्मिंगहॅमच्या मैदानात बलाढ्य भारतासोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.

  • सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर बांगलादेशने जोरदार सेलिब्रेशन केलं. बांगलादेशचा फलंदाज तस्कीन अहमदने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • यामध्ये खेळाडू बांगलादेशी व्हर्जनमधील ‘हम होंगे कामयाब…’ या गाण्यावर सेलिब्रेशन करत आहेत.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • गणेश दामोदर सावरकर, थोर क्रांतीकारक : १३ जून १८७९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • आचार्य अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे), शिक्षणतज्ञ, कवी, नाटककार, चित्रपट, निर्माते, पत्रकार, आमदार व वक्ते अशा विविध अंगांनी प्रसिध्द असलेले महाराष्ट्राचे लाडके दैवत : १३ जून १९६९

ठळक घटना 

  • पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली : १३ जून १९८३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.