चालू घडामोडी - १३ जून २०१८

Date : 13 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय विद्यापीठांच्या निवृत्तांना सातव्या आयोगानुसार पेन्शन :
  • नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे सुमारे २५ हजार निवृत्तांचे पेन्शन महिन्याला ६ ते १६ हजार रुपयांनी वाढू शकेल.

  • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती टिष्ट्वटरवर दिली. केंद्र सरकारी कर्मचाºयांना व निवृत्त कर्मचाºयांना यापूर्वीच सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

  • आता तेच लाभ केंद्रीय विद्यापीठांमधील पेन्शनरनाही देण्यात आले आहेत. केंद्रीय विद्यापीठांखेरीज विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे संचालित अभिमत विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांनाही या नव्या निर्णयाचा लाभ मिळेल.

  • या कर्मचाºयांनाही होणार लाभ - जावडेकर म्हणाले, राज्यांनी त्यांच्या कायद्यानुसार स्थापन केलेल्या विद्यापीठांनी केंद्रीय विद्यापीठांना लागू असलेली वेतनश्रेणी स्वीकारली असेल किंवा यापुढे स्वीकारणार असतील तर अशी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनाही वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन मिळू शकेल. असे संभाव्य लाभार्थी निवृत्त शिक्षक ८ लाख व शिक्षकेतर कर्मचारी १५ लाख असू शकतील.

जुलैमध्ये सुरू होणार पोस्टल बँक; दीड लाख शाखा :
  • नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी बँक जुलै महिन्यात भारतात सुरू होणार आहे. टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीला लागले आहे. रिझर्व्ह बँकेकडून १५ दिवसांत टपाल खात्याला बँकिंगची परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.

  • सध्या त्याच्या रायपूर व रांची या दोनच शहरांत शाखा असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत आणखी ६५० शाखा सुरू होतील. त्यानंतरच्या दीड वर्षात दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांत एक्सेस पॉइंट वा एक्स्टेंशन शाखा सुरू झालेल्या असतील. केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. ती मिळाल्यानंतर १५ दिवसांत एक डझनाहून अधिक पोस्टल बँक शाखा सुरू होतील.

  • ही अशी बँक असेल की जिच्या १ लाख ३३ हजारांहून अधिक ब्रँच वा एक्सेस पॉइंट ग्रामीण भागांत असतील. सध्या २३ हजार टपाल कार्यालयांत बँकिंगसाठी आवश्यक असणारी सीबीएस म्हणजेच कोअर बँकिंग सिस्टिम आहे.

  • शिवाय ९९५ एटीएमही बसवण्यात आले आहेत. आम्ही ग्राहकांच्या घरी जाऊ नही बँकिंग सेवा देऊ शकू; शिवाय पोस्टमनमार्फतही खातेदारांना पैसे मिळतील.

  • १० हजार गावांत प्रत्येक कुटुंबाला विमा देशातील १० हजार गावांत प्रत्येक घराला मार्च २०१९पर्यंत विमा योजनेशी जोडण्याचे लक्ष्य टपाल खात्याने ठरवले आहे. आतापर्यंत १२४४ गावांत हे काम पूर्ण झाले आहे, असे मनोज सिन्हा म्हणाले.

स्वीटीचा रशियात ‘गोल्डन पंच’ :
  • नवी दिल्ली  - भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने रशियात आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्ण जिंकले. स्वीटीने मिडलवेट (७५ किलो) गटाच्या अंतिम सामन्यात अ‍ॅना अनफिनोजिनोवा हिच्यावर विजय मिळविला.

  • याआधी विश्व युवा चॅम्पियन शशी चोप्रा (५७), पिंकी जांगडा (५१), आणि पवित्रा (६० किलो) यांनी उपांत्य लढती गमविल्याने कांस्यवर समाधान मानावे लागले. विश्व चॅम्पियनशिपचा कांस्य विजेता गौरव विधुडी (५६) यानेही उपांत्य लढत गमविल्याने त्याला कांस्य मिळाले.

  • बृजेश यादव (८१) आणि वीरेंद्र कुमार (९१)हे अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. 

पुन्हा पाहा धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, ऐतिहासिक कसोटीत अफगाणिस्तानच्या संघात 'MS' :
  • नवी दिल्ली - भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उद्या १४ जूनपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघातून एम.एस खेळणार आहे. चमकलात ना....? पण हे खरे आहे. हा एम.एस अफगाणिस्तानचा आहे.  

  • अफगाणिस्तान संघातील विकेटकीपर फलंदाज मोहम्मद शहजाद भारताचा माजी कर्णधार  महेंद्र सिंह धोनीचा फॅन आहे. धोनीला तो आपला हिरो मानतो आणि स्वत:ला ‘MS’ म्हणने त्याला आवडते.  मोहम्मद शहजादने क्रिकेट सुरु केल्यापासून तो धोनीचा चाहता आहे. धोनीप्रमाणे विकेटकींग, फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करत असतो. मोहम्मद शहजादला धोनीसारखे षटकार मारुन सामना संपवायला आवडते.

  • मोहम्मद शहजाद धोनीसारखा हेलीकॉप्टर शॉटही मारतो. धोनीचे व्हिडीओ पाहून तो त्याची नकल करत असतो. धोनीसारखे फटके, चपळ स्टपींग, मैदानावर वावर आणि देहयष्टी ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. 

  • भारताचा संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, करुण नायर, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक, नवदीप सैनी 

  • अफगाणिस्तान संघ- असगर स्टॅनिकजई, मोहम्मद शहजाद, जावेद अहमदी, रहमत शाह, इहसानुल्लाह जनत, नासिर जमाल, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जाजाई, मोहम्मद नबी, राशिद खान, झहीर खान, आमिर हमजा होटक, सैयद अहमद शिरजाद, यामिन अहमदजाई वफादार आणि मुजिब-उर-रहमान 

ट्रम्प-किम जोंग यांच्या ५० मिनिटं चर्चेने तिसरं महायुद्ध टळलं :
  • सिंगापूर : अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन शत्रूराष्ट्रांच्या प्रमुखांनी सिंगापूरमध्ये घेतलेली ऐतिहासिक भेट यशस्वी झाली. या भेटीमुळे अवघ्या जगाने सुटकेचा निश्वास टाकला, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. कारण 50 मिनिटांच्या या चर्चासत्रामुळे तिसरं महायुद्ध टळलं.

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यात आज तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही देशांमधील पूर्वीचे ताणले गेलेले संबंध दूर सारत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी हस्तांदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत फक्त दोघांचे अनुवादक उपस्थित होते.

  • डिन्यूक्लियरायझेशन म्हणजे अण्वस्त्रमुक्ती करारावर दोन्ही देशाच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या.

  • चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांची प्रतिनिधी मंडळ स्तरावरही चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांमधील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर ट्रम्प यांनी किम यांचं कौतुक केलं. आगामी काळात या दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहतील असंही ट्रम्प म्हणाले.

नीरव, माल्ल्याला सोडण्यासाठी ब्रिटीश सरकारची नवी अट :
  • नवी दिल्ली : फरार बिझनेसमन नीरव मोदी, ललित मोदी आणि विजय माल्ल्या यांच्या प्रत्यार्पणात ब्रिटीश सरकार बोटचेपी धोरण राबवण्याच्या तयारीत आहे. ब्रिटनमध्ये अवैधपणे राहणाऱ्या 75 हजार भारतीयांना मायदेशी बोलवण्याची अट ब्रिटीश सरकारने घातली आहे.

  • नीरव मोदी, ललित मोदी आणि विजय माल्ल्या यांचं भारतात प्रत्यार्पण करुन घ्यायचं असल्यास ब्रिटनमध्ये अवैधपणे राहणाऱ्या 75 हजार भारतीयांना देशाबाहेर काढण्यासाठी सरकारला मदत करावी, अशी अट ब्रिटीश सरकारने भारतीय अधिकाऱ्यांना घातली आहे.

  • ब्रिटनमध्ये अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना हद्दपार करण्याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रीजिज यांनी यूके सरकारसोबत एका सामंजस्य कराराचा मसुदा तयार केला होता. एप्रिलमधील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षरी करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही.

  • दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या सामंजस्य कराराचा मुद्दा ब्रिटनने पुन्हा उचलून धरला. याबाबत पुढील कारवाई होईपर्यंत माल्ल्या, नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणात यूके सरकार कोणतीही मदत करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली.

  • 2017 मध्ये पाच हजार भारतीय स्वेच्छेने मायदेशी परतले होते, तर 500 जणांना हद्दपार करण्यात आलं होतं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३४: व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.

  • १९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

  • १९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.

  • १९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

  • १९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.

  • २०००: स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.

जन्म 

  • १८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ – केम्ब्रिज, यु. के.)

  • १८७९: कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४५)

  • १९०५: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)

  • १९०९: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९९८)

  • १९२३: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१ – मुंबई)

  • १९३७: द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९६७: भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)

  • १९६९: विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)

  • २०१३: ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.