चालू घडामोडी - १३ मे २०१७

Date : 13 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत अमेरिकेकडून घेणार रासायनिक हल्लेविरोधी सुट्स, संभाव्य हल्ल्यांसाठी भारताची तयारी :
  • भारताने साधारण उद्देशाचे ३८ हजार ३४ एम ५० मुखवटे (मास्कस) मागितले आहेत. जॉइंट सर्व्हिस लाइटवेट इंटिग्रेटेड सूट टेक्नॉलॉजीत ३८ हजार ३४ सुट्समध्ये ग्लोव्हज्, ट्राऊझर्स आणि बूट, एनबीसी बॅग्ज, ८५४ अ‍ॅप्रन्स, ८५४ पर्यायी अ‍ॅप्रन्स, ९,५०९ क्विक डॉफ हूडस् आणि ११४,१०२ एम ६१ फिल्टर्सचा समावेश आहे, असे अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-आॅपरेशन एजन्सीने म्हटले.

  • रासायनिक, जैविक, किरणोत्सारी किंवा अण्वस्त्रांच्या (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर-सीबीआरएन) संभाव्य हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी भारत अमेरिकेकडून अण्वस्त्रविरोधी आणि रसायनविरोधी सुट्स (ड्रेस किंवा कपडे) विकत घेणार आहे. ७५ दशलक्ष डॉलर्सचा (४८० कोटी रुपये) हा व्यवहार आहे.

  • अमेरिकेने या सुट्स विक्रीला ११ मे रोजी मान्यता दिली.

  • भारताची रासायनिक, जैविक किंवा अण्वस्त्रांवर आधारित संभाव्य हल्ले झाल्यास ते हाताळण्याची, त्यांना रोखण्याची आणि एवढेच काय त्यांना हाणून पाडण्याची क्षमता निश्चितपणे वाढणार आहे, असे डीएससीएने अमेरिकेच्या काँग्रेसकडे केलेल्या निवेदनात म्हटले.

  • भारत सरकारला सीबीआरएन हल्ल्यांत सुरक्षा देणारी उपकरणे विकण्यास मान्यता देऊन अमेरिकेने ठाम भूमिका घेतली आहे, असे एजन्सीने म्हटले.

अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प : 
  • युरोपसह जगातील अनेक देशामध्ये कम्प्युटर व्हायरस हल्ला झाल्याचं वृत्त समजतं आहे. युरोप, अमेरिका, चीन आणि रशियासह अनेक ठिकाणचे कम्प्युटर ठप्प झाले आहेत.

  • रेनसमवेयर असं या व्हायरसचं नाव आहे. ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्विस या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.

…म्हणून रेनसमवेयर व्हायरसचा हल्ला

  • इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा.

कम्प्युटर व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करावं?   

  • तुमच्या सिस्टममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्या. तसेच अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा.

  • तुम्ही तुमच्या कम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या.

काय आहे रेनसमवेयर व्हायरस?

  • अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदर  मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.

भाग्यवान इस्त्राईल - ऐकावं ते नवलच 
  • खूपच कमनशीबी आहोत आपण, कारण आपल्याकडे निसर्गाची कृपा आहे. खूप कमनशिबी आहोत आपण, कारण आपल्याकडे मोठी युवा शक्ती आहे. खूप कमनशिबी आहोत आपण, कारण आपल्याला देश उभारणीसाठी काहीच करावे लागत नाही.

  • आणि, खूप भाग्यवान आहेत ते इस्राएली लोक....खूपच भाग्यवान आहेत इस्त्राईलमधील  लोकं कारण,  निसर्गाने त्यांच्यावर कृपेचा कटाक्षही टाकलेला नाही. खूप भाग्यवान आहेत ती इस्त्राईलमधील  लोकं, कारण त्यांच्याकडे माणसेच नाहीत.

  • खूप भाग्यवान आहेत ती इस्त्राईलमधील  लोकं, आजही आबालवृद्धाना देशउभारणीसाठी झटावे लागते.  खूप भाग्यवान आहेत इस्त्राईलमधील  लोकं, त्यांचा देश दिवसरात्र तोफेच्या तोंडावर वसला आहे, नव्हे सत्तर हजार ज्यू गॅसचेंबर मध्ये कोंबून ठार मारल्याचा इतिहास असल्याने त्यांचे अश्रू आटून गेलेत.

  • आपण इतके कमनशिबी आहोत की आपल्या सध्याच्या पिढीला सर्वकाही आयते मिळालेले असल्याने स्वतःला काहीच करावे लागत नाही. आपण इतके कमनशिबी आहोत की आपल्याला देशप्रेम शिकवावे लागते आणि इस्त्राईलमधील माणसे इतकी भाग्यवान आहेत की ज्यांच्या शरीरात जणू रक्ताऐवजी देशप्रेम असते. 

बीएसईत सायबर सुरक्षा संचालन केंद्र उभारणार :
  • मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) सायबर सुरक्षा संचालन केंद्र (एसओसी) उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयबीएमची निवड केली आहे.

  • नव्या काळातील ऑनलाईन धोके दूर ठेवणे, सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि समभागधारकांच्या मालमत्तांचे संरक्षण करणे या उद्देशाने बीएसई हे केंद्र उभारत आहे.

  • केंद्र पूर्णत: अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल. आयबीएमच्या मदतीने त्याची उभारणी करण्यात येईल.

  • बीएसई आणि आयबीएम यांच्यात पाच वर्षांचा सुरक्षा करार झाला आहे. त्यानुसार हे केंद्र शेअर बाजारातील हालचालींवर चोवीस तास निगराणी ठेवण्याचे काम करील.

अमिताभ बच्चन हेपेटायटिस सदिच्छा दूत :
  • 'हू'च्या प्रादेशिक संचालक (ईशान्य आशिया) पूनम खेत्रपाल सिंग यांनी बच्चन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

  • जागतिक आरोग्य संघटनेने (हू) आग्नेय आशियात हेपेटायटिसबाबत जनजागृती वाढवून या साथीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली.

  • विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. मी हेपेटायटिसच्या निर्मूलनास पूर्णपणे बांधील आहे.

  • हेपेटायटिसचे या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील.

प्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा :
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे.

  • राज्यभर २५ ते २८ मे असे चार दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी यांच्या शिवार संवाद सभा होणार आहेत.

  • कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे हे शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत.

ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन :
  • खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी नाशिकमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

  • मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योग विद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोसळले.

  • क्रीडामानसोपचार तज्ज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या बाम यांनी क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह 'द वॉल' राहुल द्रविड या जगभरातील महान क्रिकेटपटूंसह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला.

  • नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सहकार्य केले.

  • महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत २०११-२०१२ या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • मलेरियाबरील जंतूचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शास्त्रज्ञ सर रोनॉल्ड रॉस यांचा भारतात जन्म : १३ मे १८५७

ठळक घटना

  • डॉ.राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले : १३ मे १९६२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.