चालू घडामोडी - १३ ऑक्टोबर २०१७

Date : 13 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुणेकर गौतम बंबवाले यांची चीनमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती :
  • भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली असून  मूळ पुणेकर असलेले गौतम बंबवाले यांची २०१५ मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

  • यापूर्वी २००७ मध्ये चीनमधील गुआँगझोहुमध्ये भारताचे पहिले काऊन्सील ऑफ जनरल बनण्याचा मान गौतम बंबवाले यांना मिळाला होता, २००९ ते २०१४ या कालावधीदरम्यान त्यांनी परराष्ट्र खात्यातसह सचिव म्हणून काम केलं आहे.

  • फर्ग्युसन कॉलेजचा उंबरठा ओलांडल्यानंतर गौतम बंबवाले यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली असून बंबावले घराण्याची सनदी अधिकाऱ्याची परंपरा गौतम यांनी देखील कायम ठेवली.

  • १९८४ मध्ये ते आयएफएस म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये रूजू झाले १९८५ आणि १९९१ मध्ये बंबवाले यांची नियुक्ती हाँगकाँग आणि बीजिंगमध्ये करण्यात आली असून १९९३ मध्ये त्यांनी अमेरिकन डिव्हिजन ऑफ मिनिस्टरच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली.

०१ नोव्हेंबरला आशिष नेहरा निवृत्ती घेणार :
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ट्‌वेंटी-२० मालिकेसाठी नेहराला संघात स्थान दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या भारतीय संघात ३८ वर्षीय नेहराला स्थान कसे काय, असा प्रश्‍न अनेक तज्ज्ञांनी उपस्थित केला होता.

  • भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने १२ ऑक्टोबर रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या ०१ नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ट्‌वेंटी-२० सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल.

  • हैदराबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, 'घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही! निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.' निवृत्तीनंतर 'आयपीएल'मध्येही खेळणार नसल्याचे नेहराने स्पष्ट केले आहे.

  • १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेल्या नेहराला सर्वाधिक यश मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच मिळाले. पदार्पणानंतर चार वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारताच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीमध्ये नेहराचा वाटा मोठा होता. याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने २३ धावांत सहा गडी बाद केले होते.

गौतम बंबावाले भारताचे चीनमधील राजदूत :
  • ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी आणि भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 12 ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली.

  • बंबावाले मूळचे पुण्याचे आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेतील 1984च्या तुकडीचे अधिकारी आहेत. बंबावाले यांचा भारत-चीन संबंधांचा गाढा अभ्यास आहे.

  • परराष्ट्र सेवेत असताना परकी भाषा शिकण्यासाठी त्यांनी चिनी भाषेची निवड केली होती. हाँगकाँग आणि बीजिंग येथे त्यांनी 1985 ते 1991 काळात सेवा केली आहे.

  • अमेरिकाविषयक विभागाचे ते संचालकही होते. बीजिंगमध्ये दूतावासातील उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

  • चीनमधील भारताचे विद्यमान राजदूत विजय गोखले यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच पदभार सांभाळतील.

भारतीय युवक ऑन-जॉब ट्रेनिंगसाठी जपानला जाणार :
  • कौशल्य विकास मंत्री प्रधान म्हणाले की, कॅबिनेटने भारत आणि जपान यांच्यादरम्यान टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम (टीआयटीपी) बाबत होणाऱ्या कराराला (एमओसी) मंजुरी दिली आहे. आगामी जपान दौऱ्यात या एमओसीवर स्वाक्षरी होईल, असे प्रधान यांनी सांगितले.

  • कौशल्य विकास योजनेतंर्गत केंद्र सरकार देशातील ३ लाख युवकांना जपानमध्ये ३ ते ५ वर्षांसाठी ऑन-जॉब ट्रेनिंगसाठी पाठवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

  • भारतीय टेक्निकल इंटर्न्सच्या कौशल्य प्रशिक्षणावर येणारा खर्च जपान करणार असून प्रधान हे टोकियोच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असून दिनांक १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ होईल.

युनेस्को इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप :
  • संयुक्त राष्ट्रांची सांस्कृतिक संस्था असलेली युनेस्को इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून अमेरिकेने या संस्थेतून बाहेर पडत असल्याचे १२ ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे.

  • या संस्थेतून अमेरिका ३१ डिसेंबर २०१८ पासून बाहेर पडणार आहे, तोपर्यंत अमेरिका युनेस्कोची पूर्ण सदस्य राहणार आहे.

  • संस्थेमध्ये मूलभूत सुधारणा करण्याची गरज आणि सातत्याने इस्रायलविरोधी भूमिका घेतल्याने अमेरिकेला वाटणारी चिंता या निर्णयातून प्रतिबिंबित होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नॉएर्ट यांनी म्हटले आहे.

  • युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोव्हा यांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला निर्णय कळविला आहे, मात्र बिगरसदस्य म्हणून अमेरिका संस्थेसोबत असल्याचेही महासंचालकांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेचा हा निर्णय दोघांनाही नुकसानीचा ठरणार असल्याचे मत बोकोव्हा यांनी नोंदविले आहे.

  • बोकोव्हा यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाल संपत आहे. या जागेसाठी १३ ऑक्टोबर रोजी निवडणूक आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक राहिला असताना अमेरिकेने युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म : १३ ऑक्टोबर १९२४

  • भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म : १३ ऑक्टोबर १९३६

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन : १३ ऑक्टोबर १९११

  • कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन : १३ ऑक्टोबर २००१

  • नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन : १३ ऑक्टोबर २००३

ठळक घटना

  • पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले : १३ ऑक्टोबर १९२९

  • अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली : १३ ऑक्टोबर १९८३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.