चालू घडामोडी - १३ सप्टेंबर २०१७

Date : 13 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एसबीआय ग्राहकांना कार्ड पेमेंटसाठी आता कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता नाही : 
  • स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकांना कार्ड पेमेंटसाठी आता कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता भासणार नाही कारण एसबीआयने पेमेंटचे नवे तंत्र आणले आहे.

  • यात तुमचा मोबाइल स्वाइप मशीनच्या जवळ नेल्यास तुमचे पेमेंट होऊन जाईल, या माध्यमातून ग्राहक कॉन्टेक्टलेस पेमेंट करू शकतील.

  • ‘होस्ट कार्ड इम्युलेशन’ (एचसीई) द्वारे सहज पेमेंट करता येणार असून एसबीआय यासाठी आपले अ‍ॅप्लिकेशन अद्ययावत करत आहे.

  • एसबीआयचे ग्राहक पूर्वीपासूनच कार्डऐवजी स्मार्टफोनचा वापर करत असून त्यासाठी बँकेने सॅमसंग पे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, पुढील महिन्यापासून कार्ड स्वाइपचे नवे तंत्र बँक आणणार आहे.

  • एसबीआय कार्डचे सीईओ विजय जसुजा यांनी सांगितले की, आम्ही भारत क्यूआर कोडसाठी कार्ड सक्षम केली असून नोटाबंदीपूर्वी दर महिन्याला ६० हजार कार्ड ग्राहकांना वितरित होत होती.

  • नोटांबदीनंतर मासिक १ लाख कार्ड वितरित होऊ लागली आता हे प्रमाण मासिक २ लाख कार्ड असून सध्या १५ ते २० टक्के कार्ड बिग बझार आणि टाटासारख्या सहयोगी कंपनीकडून येतात.

रामदास कदम पर्यावरण मंत्री गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी : 
  • संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले असून या संदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

  • प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे.

  • यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल तेही टप्प्याटप्याने राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे.

  • पालकमंत्र्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले.

  • आजच्या बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन आदी उपस्थित होते.

भारतीय नौदलच्या महिला अधिकारी पहिल्यांदाच जगभ्रमंतीवर :
  • पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास १९ ऑगस्ट २००९ ते १९ मे २०१० या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता.

  • 'नाविका सागर परिक्रमा' या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही 'तारिणी' या नौकेने जगप्रवासाला रवाना झाला.

  • भारत सरकारचा 'नारी शक्ती'ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

  • भारत देशासाठी हा गौरवास्पद व ऐतिहासिक क्षण असल्याचे मत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्‍त केले असून पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी ०१ नोव्हेंबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत केला होता.

  • आयएनएसव्ही तारिणीवरील या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

  • भारतात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे.

आयफोन ८ आणि ८ प्लस हे भारतात २९ सप्टेंबरला लाँच होणार आहे :
  • तमाम आयफोनप्रेमी प्रतिक्षा करत असलेल्या आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन x अखेर मंगळवारी सादर करण्यात आले असून नवनवीन फिचर्स असलेल्या या फोनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

  • अखेर अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी या रहस्यावरील पडदा उठवला असून लाँचिग सोहळ्यापूर्वी लीक झालेले बहुतांश सर्व फिचर्स या फोनमध्ये आहेत. विशेष म्हणजे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे भारतात २९ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे.

  • आयफोन ८ ची भारतातील किंमत ६४ हजार रूपयांपासून सुरू होईल. २५६ जीबी स्टोरेज क्षमतेचा फोन ७७ हजार रूपयाला मिळेल. तर आयफोन ८ प्लस ६४ जीबीसाठी ७३ हजार रूपयांपासून सुरूवात होईल. या वेळी आयफोन ८ सीरिज फोन फक्त दोन पर्यायात (६४ जीबी, २५६ जीबी) उपलब्ध झाला आहे.

  • दोन्ही बाजूने ग्लास व सिल्वर, ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सादर करण्यात आला असून माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या फोनचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

  • त्यामुळे युजरला प्रत्येक ठिकाणी चार्जर बाळगण्याची गरज भासणार नाही आयफोन ८ चा डिस्प्ले हा ४.७ इंच तर आयफोन ८ प्लसचा डिस्प्ले हा ५.५ इंच इतका असेल.

  • नवीन आयफोनची ग्लास आतापर्यंतची सर्वांत टिकाऊ ग्लास असेल, पाणी आणि धुळीपासून प्रतिरोध करणारा हा फोन आहे यामध्ये 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे.

प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार :
  • प्रकाश पदुकोण यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते, अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते.

  • नवी दिल्ली येथे लवकरच एका समारंभात हा पुरस्कार दिला जाईल, महासंघाचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांनी ही माहिती दिली असून बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारिणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

  • १९७८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर १९८३ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते.

  • भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे.

अभिजीत कटके पुण्याचा भारत केसरी कर्नाटकच्या शिवय्यावर मात :
  • पुण्याचा तरुण पैलवान अभिजीत कटके कर्नाटकातल्या जामखंडीत भारत केसरी किताबाचा मानकरी ठरला असून अभिजीत कटकेनं कर्नाटकच्या शिवय्यावर १०-२ अशी मात करून ‘भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला.

  • ५१ हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन अभिजीतल गौरवण्यात आलं असून विशेष म्हणजे या स्पर्धेतल्या पाचही कुस्त्यांमध्ये अभिजीतनं अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे.

  • २०१६ साली फ्रान्समध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

  • अभिजीत कटकेनं गेल्या वर्षी पदार्पणातच उपमहाराष्ट्र केसरी व उपहिंद केसरी किताबांचा मान मिळवला होता. 

सरकार लवकरच १०० रुपयांचं नाणं जारी करणार :
  • डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे. सोबतच पाच रुपयांचं नवं नाणंही जारी करण्यात येणार आहे.

  • दोनशे रुपयांची नोट चलनात आणल्यानंतर सरकारने आता मोठा निर्णय घेतला असून सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे, सोबतच पाच रुपयांचं नवं नाणंही जारी करण्यात येणार आहे. 

  • शंभर रुपयांचं नाणं ४४ मिमी आणि ३३ ग्रॅम वजनाचं असून नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल, अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.

  • त्याखाली अंकामध्ये १०० लिहिलेलं असेल नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असून फोटोच्या खाली १९१७ ते २०१७ असं लिहिलेलं असेल, चार धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.

  • पाच रुपयांचं नवं नाणं २३ मिमी आणि ६ ग्रॅम वजनाचं असून नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल, अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • डॉ. प्रभा अत्रे, किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार ‘गानप्रभा’ : १३ सप्टेंबर १९३२

  • महिमा चौधरी, हिंदी चित्रपट अभिनेत्री : १३ सप्टेंबर १९७३

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते : १३ सप्टेंबर १९७१

  • जतींद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारक : १३ सप्टेंबर १९२९

  • मामा परमानंद, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक : १३ सप्टेंबर १८९३

ठळक घटना

  • ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर : १३ सप्टेंबर २००३

  • लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू : १३ सप्टेंबर १९२९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.