चालू घडामोडी - १४ ऑगस्ट २०१७

Date : 14 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राजेश मुदम यांना दक्षिण आशियाई टेनिस स्पर्धेत सुवर्ण :
  • महापालिकेचे कर्मचारी राजेश मुदम यांनी श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत, ५० वर्षे वयावरील गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे.

  • तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या चमूवर मात करत, मुदम यांचा समावेश असलेल्या ४ भारतीय टेबल टेनिसपटूंच्या चमूने हे अजिंक्यपद मिळविले आहे.

  • कोलंबोजवळील सेंट लेवेनिया या उपनगरातील सेंट जोसेफ स्टेडियममध्ये, दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या.

  • या स्पर्धांमध्ये सांघिक विजेतेपद मिळवीत, सुवर्ण पदक पटकाविणारे राजेश मुदम हे १९७७ पासून स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळत आहेत.

पनामा पेपर प्रकरणात इन्कम टॅक्सच्या रडारवर : अमिताभ
  • बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बडया व्यक्तींची नावे पनामा पेपर प्रकरणात समोर आली आहेत, ब्रिटिश वर्जिन आइसलँडचा कॅरेबियाई द्वीप समूहातील टॅक्स हेवन देशांमध्ये समावेश होतो.

  • पनामा पेपर्स प्रकरणात आयकर विभाग अत्यंत आक्रमकतेने काम करत आहे, याप्रकरणी अधिक माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागाने आपले एक पथक ब्रिटिश वर्जिन आइसलँड येथे पाठवले आहे.

  • बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बडया व्यक्तींची नावे पनामा पेपर प्रकरणात समोर आली आहेत, ब्रिटिश वर्जिन आइसलँडचा कॅरेबियाई द्वीप समूहातील टॅक्स हेवन देशांमध्ये समावेश होतो.

  • टॅक्स हेवन म्हणजे जिथे कर भरावा लागत नाही असा देश. पनामा पेपर्स प्रकरणातून जी नावे समोर आली त्यातील ३३ प्रकरणात खटले दाखल केले आहेत.

सांस्कृतिक दूत रामकृष्ण हेजीब यांचे निधन : १२ ऑगस्ट रोजी
  • महाराष्ट्रीयनचे दिल्लीतील सांस्कृतिक दूत अशी ओळख असणारे रामकृष्ण मोरेश्वर हेजीब यांचे १२ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत निधन झाले ते ७४ वर्षांचे होते.

  • मराठी संस्कृतीचे दिल्लीत जतन करण्यासाठी महाराष्ट्रीयन शासनाच्या वतीने मराठी नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव आदींच्या आयोजनात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.

  • हेजीब हे महाराष्ट्रीयन परिचय केंद्राचे माजी संचालक आणि दिल्ली सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष होते.

  • निवृत्तीनंतरही त्यांनी सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन दिन महोत्सव, गणेशोत्सव, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, कोजागरी पौर्णिमा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात हिरीरीने पुढाकार घेतला होता.

कामगारांना पेन्शनसोबत मूलभूत सुविधाही मिळणार :
  • महाराष्ट्राबरोबरच देशातील सर्व स्तरातील कामगारांना वाढीव पेन्शनबरोबरच, सर्वांसाठी घरे, आरोग्यदायी विविध सुविधा, जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेबरोबरच इतर सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी केले.

  • महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन बंडारु दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले.

  • राज्यमंत्री म्हणाले की, मी तुमच्यासारखाच एक कामगार आहे. त्यामुळे मला तुमच्या सर्व प्रश्नांची जाणीव आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले. सर्व कामगारांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

मदरशांनी १५ ऑगस्टला 'तिरंगा' फडकवावा : योगी सरकारचा आदेश
  • मदरशा शिक्षा परिषदेने परिपत्रक जारी केले असून, त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षा परिषदेने त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले असून १५ ऑगस्टला भारत ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 

  • स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये होणा-या कार्यक्रमांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे आदेश आहेत, उत्तर प्रदेशात मदरसा परिषदेने ८ हजार मदरशांना मान्यता दिली आहे.

  • मदरशांना प्रथमच स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मदरशांना ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले होते. यातील ५६० मदरशांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. 

पुढच्या वर्षीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र
  • काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे, यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्येही होऊ शकते, असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

  • देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी मागणी अनेकदा केली जाते. सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यांच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा बोलून दाखवलं आहे.

  • कारण येत्या काळात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे यासोबत लोकसभा निवडणूक घेण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो.

  • मोदींनी अनेकदा निवडणुका एकत्र घेण्याची कल्पना बोलून दाखवली आहे, विरोधी पक्ष आणि भाजपनेही एकत्र निवडणुकांसाठी त्याग करण्याची गरज आहे, एकत्र निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र यावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

सध्या भारत-अमेरिकेमधील संबंध सर्वोच्च :
  • जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत यांच्यातील धोरणात्मक संबंधांना यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत, विशेष म्हणजे सध्या अमेरिका आणि भारतातील संबंध यापूर्वी कधीही नव्हते अशा सर्वोच्च शिखरावर आहेत.

  • यापुढेही दोन्ही देशांतील व्यक्ती-व्यक्तींतील संबंध, तसेच लोकशाही, स्वातंत्र्य आणि समान मूल्यांवर आधारित नातेबंध कायम राहतील व वृद्धिंगत होतील, असा विश्वास अमेरिकेचे मुंबईतील कौन्सुल जनरल एडगार्ड कॅगेन यांनी व्यक्त केला. दक्षिण मुंबईत आयोजित अमेरिकी राष्ट्रीयन दिन सोहळ्यात कॅगेन बोलत होते.

  • उभय देशांच्या राष्ट्रीयगीतांनी सुरुवात झालेल्या या सोहळ्यात अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सनी दिमाखदार संचलन केले.

  • तांत्रिक कारणांमुळे मुंबईतील अमेरिकी दुतावासाने अमेरिकेचा २४१ वा राष्ट्रीयन दिन ४ जुलै ऐवजी ११ ऑगस्ट रोजी साजरा केला, या वेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : पाकिस्तान.

  • ध्वज दिन : पेराग्वे.

जन्म, वाढदिवस

  • जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार : १४ ऑगस्ट १९२५

  • वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी : १४ ऑगस्ट १९११

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर : १४ ऑगस्ट १९८४

  • चेस्लॉ मिलॉझ, नोबेल पारितोषिक विजेता पोलिश लेखक : १४ ऑगस्ट २००४

ठळक घटना

  • इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू : १४ ऑगस्ट २००६

  • पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य : १४ ऑगस्ट १९४७

  • लेक वालेंसाने ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील संप पुकारला : १४ ऑगस्ट १९८०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.