चालू घडामोडी - १४ जून २०१८

Date : 14 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास होईल पाच वर्षांची कैद :
  • मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकाºयांना दमबाजीने मारहाण करून जखमी करणाºया व्यक्तीला आता पाच वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकेल. सरकारी कर्मचा-यास त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हेतूपुरस्सर मारहाण करून जखमी केल्यास कलम ३३२ नुसार कारवाई केली जाते.

  • या गुन्ह्यासाठी आधी तीन वर्षांच्या कैदेची तरतूद होती. ती आता वाढवून पाच वर्षे करण्यात आली आहे. तर सरकारी कर्मचाºयावर हल्ला करणे किंवा धाकदपटशा करणे यासाठी कलम ३५३ अन्वये आधी दोन वर्षांच्या कैदेची तरतूद होती. ती देखील आता वाढवून पाच वर्षे करण्यात आली आहे. राज्य सरकारने या बाबतची अधिसूचना जारी केली आहे.

  • शासकीय कर्मचारी, अधिकाºयांना दमबाजी, मारहाणीच्या होणाºया घटनांना आळा घालण्यासाठी शिक्षेचा कालावधी वाढवून देण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी केली होती. त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेत तसे विधेयक विधिमंडळात मांडले आणि ते मंजूर करण्यात आले होते. नंतर ते राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता तशी अधिसूचना काढण्यात आली आहे.

सतराव्या वर्षी तीने केले द्विशतक, मोडला २१ वर्षे जुना विक्रम :
  • डब्लीन : न्युझीलंड महिला क्रिकेट संघाची १७ वर्षांची सलामीवीर अमेलिया केर हिने आज येथे आर्यलंड विरोधातील मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २३२ धावांची नाबाद खेळी करत २१ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. एकदिवसीय सामन्यातील हे तीचे पहिलेच शतक आहे. तिने आपल्या पहिल्याच शतकाला द्विशतकात परिवर्तित करण्याचा पराक्रम देखील केला.

  • या आधी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आॅस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने मुंबईत डेन्मार्क विरोधात २२९ धावा केल्या होत्या. हा विक्रम आज अमेलिया केरच्या खेळीने मोडला. न्युझीलंडचा महिला संघ सध्या आर्यलंड आणि इंग्लंडच्या दौºयावर आहे. मालिकेतील तिसºया सामन्यात सलामीवीर अमेरिया केर हिने १४५ चेंडूंच्या आपल्या खेळीत ३१ चौकार आणि दोन षटकार लगावत २३२ धावा केल्या.

  • अमेलिया हिने २०१६ मध्ये पाकिस्तान विरोधात पर्दापण केले होते. आतापर्यंत तिची सर्वोच्च धावसंख्या ८१ होती. तीने १९ एकदिवसीय सामन्यात ३१ विकेट्स देखील मिळवल्या आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत बेलिंडा क्लार्क आणि अमेलिया मेर यांनाच द्विशतक करता आले आहे.

आधारसाठी चेहरा ओळख पद्धत लांबणीवर :
  • युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआय या संस्थेने चेहऱ्यावरून ओळख तयार करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली आहे.

  • यूआयडीएआय या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले, की नवीन चेहरा आधारित ओळख प्रक्रिया सुरू करण्यास आधी १ जुलैची मुदत दिली होती, ती आता १ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. डोळ्याची बाहुली, हाताचे ठसे व चेहरा ओळख या तीन मार्गानी प्रत्येक व्यक्तीची ओळख घेतली जात आहे.

  • व्यक्तीची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवताना अडचणी येत असल्याने चेहरा ओळख पद्धत सुरू करण्याचे ठरवले होते. त्यावर काम सुरू आहे. पण जुलैऐवजी ऑगस्टपासून ही पद्धत सुरू केली जाईल. हे तंत्रज्ञानावर आधारित काम आहे, त्यामुळे ती कुठली गोष्ट सहज विकत घेतो तसे नाही, हे तंत्रज्ञान विकसित करावे लागते, त्यामुळे त्याला १ ऑगस्टपर्यंत वेळ लागेल.

  • आधार कार्डधारकाचा ओटीपी, बोटाचे ठसे, डोळ्याची बाहुली यांच्या जोडीला चेहरा ओळख हा एक पूरक मार्ग म्हणून वापरला जाणार आहे. बायोमेट्रिक ओळख पटवताना काही वेळा बोटावरील रेषा घासल्या गेल्याने ओळख पटत नाही त्या प्रसंगी चेहरा ओळख उपयोगात आणली जाईल.

फेसबुकची कबुली ; माऊस, की-बॉर्डच्या प्रत्येक हालचालीवर असते नजर :
  • ‘केंब्रिज अॅनालिटिका’ डेटा लिक प्रकरणानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना फेसबुकने अमेरिकेच्या सीनेटमध्ये उत्तरं दिली. यामध्ये, युजरची खासगी माहिती, त्याची आवड-निवड जाणून घेण्यासाठी त्याच्या कंम्प्युटरच्या की-बोर्ड आणि माऊसच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते अशी कबुली फेसबुकने दिली आहे.

  • म्हणजे, तुमचं फेसबुक कंम्प्युटरवर लॉग-इन असेल तर माऊसच्या प्रत्येक क्लिक आणि की-बोर्डच्या कोणत्या बटनाचा वापर तुम्ही करताय ही सर्व माहिती फेसबुकला समजत असते. याद्वारे युजर कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर जास्त वेळ घालवतो, कोणत्या कंटेंटवर किती वेळ थांबतो याची माहिती फेसबुक घेतं. त्याद्वारेच युजरला जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुककडून ही कबुली देण्यात आली आहे.

  • काही महिन्यांपूर्वी जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती. तेव्हापासून फेसबुकवरील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि प्रायव्हसी पॉलिसीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • अमेरिकेच्या सीनेटमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गला प्रश्न विचारण्यात आले. जवळपास २ हजार प्रश्न विचारण्यात आले होते. एकूण ४५४ पानांवर फेसबुककडून प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.

स्टेट बँकेत ३३ कोटी डिजिटल व्यवहार :
  • मुंबई : डिजिटल बँकिंग व्यवहारांचा आकडा चालू आर्थिक वर्षात ३३ कोटींच्या घरात जाईल. त्याद्वारे ७.५६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, अशी अपेक्षा देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने व्यक्त केली आहे.

  • ३१ मार्च २०१७ अखेर बँकेच्या डिजिटल बँकींग युझर्सची संख्या ३.०५ कोटी होती. त्यात आता आणखी वाढ झाली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकेचे ६ लाख कोटी रुपयांचे २७.०६ कोटी व्यवहार झाले.

  • बँकेने इंटरनेट बँकींग, पॉइंट आॅफ सेल, मोबाइल बँकींग आदींची व्याप्ती वाढवली. त्यामुळे सध्या २० टक्के व्यवहारच बँकेत होतात, असे बँकेने स्पष्ट केले.

'दलित' शब्द मीडियाने वगळावा, प्रेस कौन्सिल सूचना देणार :
  • नवी दिल्ली : दलित या शब्दाचा वापर मीडियाने टाळावा, अशी सूचना भारतीय प्रेस परिषद (पीसीआय) काढण्याच्या तयारीत आहे. तशा सूचना देण्यास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं.

  • दलित या शब्दाचा वापर टाळण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. दलित या शब्दाऐवजी 'अनुसूचित जातीमधील व्यक्ती' असा उल्लेख करण्याचा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना 15 मार्चला दिला होता.

  • एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना गेल्या आठवड्यात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मीडियातून दलित या शब्दाचा वापर वगळण्याचा विचार बोलून दाखवला होता.

  • कोर्टाच्या आदेशाचा विचार करत भारतीय प्रेस परिषदेनेही तशी सूचनावली जारी करावी, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालय सुचवणार आहे.

दिनविशेष :
  • जागतिक रक्त दाता दिन

महत्वाच्या घटना 

  • ११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

  • १७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

  • १७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.

  • १७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.

  • १९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

  • १९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.

  • १९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

  • १९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.

  • १९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

  • १९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

  • २००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

जन्म 

  • १४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.

  • १७३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)

  • १८६४: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)

  • १८६८: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून१९४३)

  • १९६९: प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म.

  • १९२२: हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२५: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)

  • १९१६: मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)

  • १९२०: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १८६४)

  • १९४६: ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट१८८८)

  • १९८९: मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन.

  • २००७: संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९१८)

  • २०१०: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.