चालू घडामोडी - १४ ऑक्टोबर २०१७

Date : 14 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वैज्ञानिकांनी सामान्यांच्या समस्यांवर तांत्रिक उत्तरे शोधावीत - हर्षवर्धन :
  • वैज्ञानिकांनी कोशातून बाहेर येऊन लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवणारे संशोधन करावे, असे आवाहन विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी तिसऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी येथे केले.

  • हा महोत्सव यंदा प्रथमच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला होता, या वेळी पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव राजीवन नायर, तामीळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री अन्बलगन, बांगलादेशचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री उस्मान, अफगाणिस्तानचे विज्ञान तंत्रज्ञानमंत्री अब्दुल रोशन, विज्ञान भारतीचे प्रमुख विजय भटकर, विज्ञान-तंत्रज्ञान  सचिव आशुतोष शर्मा, विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी उपस्थित होते.

  • विज्ञान तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन म्हणाले, की मी परदेशात अनेक वैज्ञानिक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो असून त्यावरून तरी आपले विज्ञान जगाच्या तुलनेत कमी दर्जाचे आहे असे मला वाटत नाही.

  • पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान खात्याची तरतूद मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे, वैज्ञानिकांनी समाजाशी संपर्क ठेवून लोकांच्या दैनंदिन समस्यांवर तांत्रिक उत्तरे शोधली पाहिजेत.

  • जागतिक पातळीवर संशोधनाच्या क्षेत्रात ज्या बाराशे संस्था काम करीत आहेत, त्यात भारताचा सातवा क्रमांक असून विज्ञान महोत्सव साजरे करण्यातही आपल्या देशाचा नववा क्रमांक आहे. 

‘आधार’ मुळे वाचले तब्बल ९ अब्ज डॉलर - नंदन नीलेकणी :
  • भारत सरकारच्या आधार कार्ड योजनेत आतापर्यंत १ अब्ज लोकांनी नोंदणी केली असून, कल्याणकारी योजनांतील बनावट लाभार्थी यादीतून गायब झाल्यामुळे सरकारचे तब्बल ९ अब्ज डॉलर वाचले असून आधारचे शिल्पकार नंदन नीलेकणी यांनी ही माहिती दिली.

  • मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने आधार योजना सुरू केली असून ही योजना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेही कायम ठेवली आहे.

  • स्वत:पंतप्रधान मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांचा योजनेला पाठिंबा आहे, असे नीलेकणी यांनी सांगितले.

  • ६२ वर्षीय नीलेकणी यांनी अलीकडेच आधार प्राधिकरणाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊन भारतातील दुसºया क्रमांकाची मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा अ-कार्यकारी चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

  • जागतिक बँकेने आयोजित केलेल्या ‘विकासासाठी डिजिटल अर्थव्यवस्था’ या विषयावरील गट चर्चेत नीलेकणी यांनी हे वक्तव्य केले असून त्यांनी सांगितले की, योग्य डिजिटल पायाभूत व्यवस्था उभी केल्यास विकसनशील देशांना विकासाच्या मार्गावर उडी घेणे सोपे आहे.

  • आधारमध्ये आतापर्यंत १ अब्जापेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली असून आधारमुळे कल्याणकारी योजनांत होणाºया घोटाळ्यांना लगाम बसला असून आधार जोडणीमुळे बनावट लाभार्थी आपोआप दूर झाले, याचा परिणाम म्हणून भारत सरकारचे ९ अब्ज डॉलर वाचले आहेत.

मनमोहन सिंग - पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते :
  • पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं असून 'माझ्यापेक्षा अधिक योग्यता आणि पात्रता असतानाही पंतप्रधानपदासाठी दुर्लक्षित केल्याची तक्रार करण्यासाठी प्रणव मुखर्जींकडे अनेक कारणे आहेत, पण त्यावेळी माझ्याकडे कोणताच पर्याय नसल्याची त्यांना कल्पना होती.

  • यामुळेच आमच्या संबंधात काही फरक पडला नाही', असं मनमोहन सिंग बोलले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोलिशन इयर्स १९९६-२०१२’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.

  • महत्वाचं म्हणजे शुक्रवारी पार पडलेल्या या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते, मनमोहन सिंह यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

  • '२००४ रोजी जेव्हा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी माझी निवड केली, तेव्हा प्रणव मुखर्जी माझ्या प्रतिष्ठित सहका-यांपैकी एक होते.

  • पंतप्रधान होण्यासाठी ते अधिक पात्र होते, आणि याची तक्रार करण्याचं प्रत्येक कारण त्यांच्याकडे होते, पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता याचीही त्यांनी कल्पना होता', असा खुलासा मनमोहन सिंग यांनी केला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

सोनिया गांधी - राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे पक्षाध्यक्ष होतील :
  • राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील, असे सूतोवाच राहुल यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे.

  • दिल्लीत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत सोनिया गांधींना प्रश्न विचारला.

  • यावर उत्तर देताना लवकरच राहुल पक्षाध्यक्षपदी विराजमान होतील, असे त्यांनी सांगितले, या वेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे वादात अडकलेले पुत्र जय शहा यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया त्यांनी देण्याचे टाळले.

  • नुकत्याच, अमेरिकेतील दौऱ्यात राहुल गांधी यांनी आपण काँग्रेसची धुरा खांद्यावर घेण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते, त्याचवेळी पक्षाने राहुल यांची अध्यक्षपदी निवड निश्चित केल्याचे बोलले जात होते.

  • राहुल गांधी यांची पक्षाध्यपदी निवड झाल्याची अद्याप घोषणा झालेली नसली, तरी त्यांचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी पुढे येणे हे स्वाभाविक असून बऱ्याच काळापासून काँग्रेसचे अनेक नेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी पक्षाध्यक्ष होतील असे सांगत आहेत.

पहिल्या स्वदेशी विमानाला लालफितीचा ब्रेक अमोल यादवांच्या :
  • संपूर्ण भारतीय बनावटीचं विमान तयार करुन ते आकाशात उडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अमोल यादव या मराठी तरुणाच्या स्वप्नांना नोकरशाहीच्या लालफीतीच्या कारभारामुळे ब्रेक लागला आहे.

  • चारकोपमधल्या आपल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं सहा आसनी विमान केवळ डीजीसीए (डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन) ची नोंदणी होत नसल्यानं उड्रड़ाणापासून रखडलं आहे.

  • २०११ म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून अमोल यादव या विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत आहेत, विशेष म्हणजे अमोल यादव यांचं हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेलं होतं.

  • त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहचवला होता.

  • महाराष्ट्र सरकारनं या धडपडीचं कौतुक करत अमोल यांना १९ आसनी विमान बनवण्यासाठी जमीन आणि निधी देण्याचाही प्रस्ताव दिला असून अमोल यांनी १९ आसनी विमानाचा प्रोटोटाईप पूर्णही करत आणला आहे.

  • पण त्याआधी ६ आसनी विमानाचं यशस्वी उड्डाण करुन दाखवणं त्यांना आवश्यक जेणेकरुन महाराष्ट्र सरकारसोबतचा त्यांचा मदतीचा करार पूर्णत्वास जाईल.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • जागतिक प्रमाण दिन.

  • शिक्षक दिन - पोलंड.

जन्म /वाढदिवस

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म : १४ ऑक्टोबर १९२४

  • भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म : १४ ऑक्टोबर १९८१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन : १४ ऑक्टोबर १९९३

  • केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन : १४ ऑक्टोबर २०१३

  • भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन : १४ ऑक्टोबर २०१५

ठळक घटना

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला : १४ ऑक्टोबर १९५६

  • ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला : १४ ऑक्टोबर १९२०

  • ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले : १४ ऑक्टोबर १०२६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.