चालू घडामोडी - १४ सप्टेंबर २०१७

Date : 14 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं थोड्याच वेळात भूमिपूजन :
  • मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले असून आज साबरमतीमध्ये या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार आहेत, ५०८ किमीचा मार्ग असलेला हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून यासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार आहे.

  • ठाणे-वाशी भागातून ७ किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार असून याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.

  • १.०१ लाख कोटी रुपये खर्च असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपाननं ८८ हजार कोटीचं कर्ज दिलं असून हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. 

  • एचएसआरसीचे अधिकारी हा प्रस्तावित मार्ग असल्याचे सांगत असले, तरी याला मंजुरी मिळणे ही औपचारिकता असून या मार्गाचे हवाई आणि भूभौतिक सर्वेक्षण झाले आहे.

‘मॅन बुकर’पुरस्काराची लघुयादी जाहीर : अरुंधती रॉय यांचा समावेश नाही
  • ‘दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पहिल्याच पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना १९९७ साली ५० हजार पौंड्सचा  ‘मॅन बुकर’ साहित्यिक पुरस्कार मिळाला होता.

  • २०१७ सालासाठीच्या प्रतिष्ठित ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी (शॉर्ट लिस्ट) बुधवारी जाहीर करण्यात आली असून या यादीत ब्रिटन व अमेरिकेच्या लेखकांचा वरचष्मा आहे, मात्र दीर्घकाळापासून या यादीत राहत आलेल्या एकमेव भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा मात्र या वेळी त्यात समावेश झाला नाही.

  • ‘दि मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ या नव्या कादंबरीसाठी त्यांचे नाव या वर्षीच्या दीर्घ यादीत (लाँग लिस्ट) होते. ‘भारताच्या अंतर्भागातून आलेले समृद्ध आणि महत्त्वाचे पुस्तक’ असे त्याचे वर्णन परीक्षकांनी केले होते.

  • १७ ऑक्टोबरला येथील गिल्डहॉलमध्ये जाहीर होणार असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अंतिम सहा लेखकांमध्ये स्पर्धा होणार आहे.

अवघा महाराष्ट्र १५ सप्टेंबरला फुटबॉलमय होणार : विनोद तावडे
  • ‘महाराष्ट्र मिशन- एक दशलक्ष’ अभियानांतर्गत राज्यातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थी आणि युवक १५ सप्टेंबरला फुटबॉल खेळणार असून अशी घोषणा राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली.

  • ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या निमित्ताने देशातील एक कोटी १० लाख नागरिकांनी फुटबॉल खेळावा अशी कल्पना मांडली आहे.

  • मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र मिशन- एक दशलक्ष’ची घोषणा केली.

  • मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते या अभियानाला सकाळी प्रारंभ होईल,’’ अशी माहिती तावडे यांनी दिली.

  • ‘‘मुंबईतील डब्बेवाले, दिव्यांग, कर्करोगाने आजारी रुग्ण, आदी अनेक जण शिवाजी पार्क, ओव्हल मैदान, आझाद मैदान अशा विविध ठिकाणी फुटबॉल सामने खेळणार आहेत.

  • आम्ही राज्यातील जवळपास ३० हजार शाळांमध्ये ९० हजार ते एक लाख फुटबॉलचे वाटप केले आहे,’’ अशी माहिती तावडे यांनी दिली आहे.

ब्रिटनमधील मालमत्ता जप्त ४ हजार कोटींवर आणली टाच दाऊदला झटका :
  • कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला असून दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

  • दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या आसपास असून, त्यापैकी तब्बल ४ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ब्रिटनमध्ये टाच आणण्यात आली आहे.

  • ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरे आहेत, त्यांची किंमत काही हजार कोटी रुपयांच्या घरात असून गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंधांसंबंधीच्या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचा समावेश केला होता या संदर्भात भारतानेही ब्रिटनला पूर्वीच आपला अहवाल सुपुर्द केला आहे.

  • गेल्या महिन्यात ब्रिटनकडून मालमत्ता गोठविण्याच्या संदर्भात काही जणांची यादी जारी करण्यात आली असून त्यात दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील ३ मालमत्तांचाही उल्लेख होता.

  • फोर्ब्स मासिकाने जगातील मोस्ट वाँटेड डॉन असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर एवढी असल्याचे म्हटले होते. दाऊद हा जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत डॉन असल्याचे मानले जाते.

  • भारत, पाकिस्तान, ब्रिटन या देशांखेरीज दक्षिण आफ्रिकेत व अन्य काही छोट्या राष्ट्रांत त्याच्या मालमत्ता आहेत.

मार्टिना हिंगिसचे २५ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद :
  • हिंगिस व युंग-जॅन यांनी अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी हॅराडेका आणि कॅटेरिना सिनिआकोव्हा यांच्यावर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवला.

  • मार्टिना हिंगिसने तैवानच्या चॅन युंग-जॅनसह खेळताना अमेरिकन खुल्या टेसिन स्पध्रेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले असून स्वित्र्झलडच्या या ३७ वर्षीय खेळाडूचे कारकीर्दीतील २५ वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे.

  • हिंगिसने महिला दुहेरीतील १३, महिला एकेरीत पाच आणि मिश्र दुहेरीत ३ ग्रॅण्डस्लॅम नावावर केले आहेत.

  • हिंगिसचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद असून तिने विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पध्रेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद नावावर केले आहे, तसेच यंदा सहा डब्लूटीए दुहेरी विजेतेपदही तिच्या नावावर आहेत.

  • मार्टिना हिंगिसने १९९७ मध्ये अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पध्रेतील एकेरीचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिने १९९८ आाणि १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत याची पुनरावृत्ती केली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • हिंदी दिवस

जन्म /वाढदिवस

  • पार्श्वनाथ यशवंत आळतेकर, मराठी नट, दिग्दर्शक : १४ सप्टेंबर १८९८

  • यमुनाबाई हिर्लेकर, शिक्षणतज्ञ, विचारवंत : १४ सप्टेंबर १९०१

  • डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते : १४ सप्टेंबर १९३२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर : १४ सप्टेंबर २०११

ठळक घटना

  • सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती : १४ सप्टेंबर १९५९

  • रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले : १४ सप्टेंबर १९१७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.