चालू घडामोडी - १४ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 14, 2018 | Category : Current Affairsराष्ट्रपतींकडून रंजन गोगई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती :
 • नवी दिल्ली - न्यायाधीश रंजन गोगई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोगई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश असणार आहेत. 3 ऑक्टोबरपासून रंजन गोगई आपला पदभार स्विकारतील. आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश रंजन गोगई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली. 

 • गोगई यांनी 13 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून 17 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होईल. सध्याचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा हे 2 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे मिश्रा यांनीच गोगई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.

 • मिश्रांच्या या शिफारसपत्राला हिरवा कंदील देत केंद्र सरकारने या नियुक्तीसाठी राष्ट्रपतींना विनंती केली. त्यानंतर, आज राष्ट्रपतींनी रंजन गोगई यांचे नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. 

पूर्व भारतातील रेल्वेंना लागेल सगळ्यात आधी जीपीएस :
 • नवी दिल्ली : रेल्वे नालासोपाराच्या बाहेर सिग्नलला उभी आहे आणि रेल्वे दाखवते आहे की ती मुंबई सेंट्रलला पोहोचली. अनेकवेळा अशी परिस्थिती तुम्हालाही तुमच्या शहराच्या स्टेशनवर अनुभवास आली असेल. ही तांत्रिक चूक नव्हे तर अनेक रेल्वे अधिकारी त्यांच्याकडील रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार असल्याचे दाखवण्यासाठी रेल्वेच्या लॉगर-डाटा मशीन किंवा त्यातील माहितीत (डाटा) हस्तक्षेप करतात.

 • हा प्रकार पकडल्यानंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सगळ्या रेल्वेगाड्यांच्या मूळ वेळांवर देखरेख ठेवण्यासाठी जीपीएस लावण्याचा आदेश दिला. याची सुरवात पूर्व भारत, बिहार-उत्तर प्रदेश-पश्चिम बंगाल-ओडिशाकडे जाणाऱ्या व येणाºया रेल्वेगाड्यांपासून होईल. या मार्गांवरील रेल्वे उशिरा धावत असल्याच्या सगळ्यात जास्त तक्रारी होत्या. शिवाय या मार्गांवर प्रवासीही प्रचंड आहेत.

 • गोयल म्हणाले, रेल्वेगाड्या आपल्या झोनमध्ये वेळापत्रकानुसार धावत आहेत हे दाखवण्यासाठी काहीच अधिकारी त्यांच्या येण्या-जाण्याच्या डाटामध्ये हस्तक्षेप करतात हे आमच्या निदर्शनास आले. याची चौकशी केली गेली व तीन जणांवर त्याचा ठपका ठेवला गेला. त्यांच्यावर कारवाई करून तिघांनाही निलंबित केले गेले.

 • आम्ही नियमितपणे वेळापत्रकाचे निरीक्षण करीत असून देशाच्या कोणत्या विभागात रेल्वेगाड्या उशिरा धावतात व त्यांची कारणे काय आहेत यासाठी आम्ही डाटा लॉगर लावले. त्यांचा अभ्यास केला जात आहे. लवकरच जीपीएस सगळ््या रेल्वेगाड्यांना लावले जातील. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कधीही त्याच्या मोबाईल फोनवर कोणत्याही रेल्वेचे नेमके ठिकाण (लोकेशन) पाहू शकेल. हे काम लवकरच सुरू केले जात आहे. सगळ््यात आधी कोलकाता लाईनवर धावणाºया रेल्वेगाड्यांना लावले जाईल, असे गोयल म्हणाले.

मोदींच्या आयुष्मान भारत योजनेवर ‘लॅन्सेट’ नियतकालिकाची स्तुतिसुमने :
 • भारतात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत असताना सामुदायिक आरोग्य विम्याला आयुष्मान भारत या सर्वात मोठय़ा योजनेच्या माध्यमातून राजकीय पातळीवर अग्रक्रम देणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत, अशा शब्दात ब्रिटनमधील लॅन्सेट या ख्यातनाम वैद्यकीय नियतकालिकाने स्तुती केली आहे.

 • दी लॅन्सेटचे संपादक रीचर्ड हॉर्टन यांनी म्हटले आहे की, आरोग्य हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकार आहे, पण भारतात त्याकडे पूर्वी लक्ष दिले गेले नाही पण मोदी यांनी त्याला अग्रक्रम दिला असून देशातील मध्यमवर्गाच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राजकीय माध्यमातून केला आहे.

 • राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, मोदीकेअरची बरोबरी त्यांच्या पक्षाला करता आली नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण भारतातील एक मोठे राजकीय घराणे म्हणून आम्ही आणखी काही देशाला देऊ इच्छितो असे चित्र ते निर्माण करीत असले तरी आदिवासी, कनिष्ठ जाती, ग्रामीण गरीब यांना दिलेली आश्वासने ही मोदीकेअरची बरोबरी करू शकत नाहीत.भारतातील निवडणुकीत आरोग्य हा महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये वाढदिवस साजरा करणार :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला ६८ वा वाढदिवस वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघात साजरा करण्याची शक्यता आहे. शालेय विद्यार्थ्यांसमवेत दिवसभर राहून ते त्यांच्याच जीवनावर आधारित चित्रपटही पाहणार आहेत, असे जिल्ह्य़ातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

 • मोदी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या दौऱ्यात ते प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची जाहीर सभाही होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 • मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘चलो जीते है’ हा ३२ मिनिटांचा चित्रपट तयार करण्यात आला आहे. आपल्या दौऱ्यात मोदी कोटय़वधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटनही करण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन कडेकोट सुरक्षा ठेवण्याची व्यवस्थाही केली जात आहे.

इंग्लंडमधील पराभवानंतरही भारताचं अव्वल स्थान कायम :
 • लंडन : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा 4-1ने पराभव झाला. मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतरही दिलासादायक बाब म्हणजे कसोटी क्रिकेटमधील भारताचं अव्वल स्थान कायम आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या स्थानवर आहे. तर इंग्लंडलाही मालिका विजयाचा काहीसा फायदा झाला आहे.

 • इंग्लंडचा संघ कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाचे कसोटी क्रमावारीत 125 अंक होते. मात्र मालिकेतील पराभवानंतर भारताच्या खात्यात 115 अंक राहिले आहेत.

 • दुसरीकडे इंग्लंड संघ भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी 97 अंकासह पाचव्या स्थानवर होता. मात्र भारतासारख्या बलाढ्या संघाविरुद्ध मालिका विजयानंतर इंग्लंडला 8 अंकांचा फायदा मिळाला आहे. इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला मागे टाकत 105 अंकासह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

 • इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या एक अंक मागे आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांचे 106 अंक आहेत. न्यूझीलंडचा संघ 102 अंकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

पतंजलीचं गायीचं दूध लॉन्च, दोन रुपयांनी स्वस्त मिळणार :
 • नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबांनी पतंजलीच्या उत्पादनामध्ये आणखी वाढ केली आहे. रामदेव बाबांनी आज (13 सप्टेंबर) गायीचं दूध आणि त्यापासून बनलेली उत्पादनं लॉन्च केली. गायीच्या दुधाचा दर 40 रुपये प्रति लिटर असेल. त्यामुळे बाजारात आधीपासूनच असेलल्या गायीच्या दुधापेक्षा हे दूध प्रति लिटर दोन रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

 • दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये डेअरी प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याआधी स्वत: रामदेव बाबांनी गायीचं दूध काढलं. पतंजलीने गायीच्या दुधासह दही, ताक आणि पनीरही लॉन्च केलं. पतंजली आधीपासूनच बाजारात गायीचं तूप विकत आहे.

 • पतंजलीने दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी 56,000 किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे. यामधून 2019-2020 मध्ये दरदिवशी 10 लाख लिटर गायीच्या दुधाचा पुरवठा होईल, अशी आशा कंपनीला आहे. आम्ही पहिल्याच दिवशी चार लाख लिटर गायीच्या दुधाचं उत्पादन केलं आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. पतंजली लवकरच फ्लेवर्ड मिल्कही लॉन्च करणार आहे.

 • "गायीच्या दुधासाठी सुमारे एक लाख शेतकरी/पशुपालक आमच्यासोबत आहेत. पुढील वर्षी नव्या उत्पादनांच्या लॉन्चिंगमुळे सुमारे पाच लाख लोकांना रोजगार मिळेल," असा दावा कंपनीने केला आहे.

दिनविशेष :
 • हिंदी दिन

महत्वाच्या घटना

 • १८९३: सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

 • १९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

 • १९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

 • १९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.

 • १९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

 • १९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.

 • १९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

 • २०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.

 • २००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

जन्म

 • १८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग  यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)

 • १७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)

 • १९०१: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.

 • १९१२: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९९७)

 • १९२१: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)

 • १९२३: केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.

मृत्यू

 • १९०१: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८४३)

 • १९८९: भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०६)

 • १९९८: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.

 • २०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)

टिप्पणी करा (Comment Below)