चालू घडामोडी - १५ ऑगस्ट २०१८

Date : 15 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेहरु, मनमोहन, वाजपेयी ते मोदी, लाल किल्ल्यावर कुणाचं किती मिनिटे भाषण :
  • नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 72 व्या स्वातंत्र्य दिनी देशाला उद्देशून भाषण केलं. मोदींनी आपल्या भाषणात चार वर्षांच्या कामाचा लेखाजोखा केला. भारत वेगाने प्रगती करत असून, विकासाचा वेग हा 2013 च्या तुलनेत प्रचंड वाढल्याचा दावा त्यांनी केला.

  • आपल्या भाषणात त्यांनी तिहेरी तलाक, करदात्यांची संख्या, चंद्रपूरच्या तरुणांचं कौतुक, बलात्काऱ्यांना तातडीने फाशीची तरतूद, महिलांचं योगदान अशा विविध विषयावर भाष्य केलं.

  • मोदींचं यंदाचं भाषण हे 1 ता 22 मिनिटे म्हणजे च 82 मिनिटे होतं. सकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी सुरु केलेलं भाषण 8 वाजून 55 मिनिटांनी संपलं. तरीही मोदींनी 96 मिनिटांचा स्वत:चा विक्रम कायम ठेवला.

  • 2016 मध्ये सर्वात मोठं भाषण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरुन आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण केलं होतं. 2016 मध्ये मोदींनी 96 मिनिटांचं भाषण केलं होतं, जे आतापर्यंत एखाद्या पंतप्रधानाचं सर्वात मोठं भाषण होतं.

  • 2017 मधील भाषण 55 मिनिटांचं तरीही सर्वात लहान - लाल किल्ल्यावरुन मोदींनी आतापर्यंत पाच भाषणं केली. 2017 मध्ये मोदींनी 55 मिनिटांचं भाषण केलं होतं. 2017 मधील 55 मिनिटांच्या भाषणात मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं.

  • पहिले पंतप्रधान नेहरुंचं 72 मिनिटांचं भाषण - यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 1947 रोजी 72 मिनिटे भाषण केलं होतं.

  • पंतप्रधान मोदींनी जुलै 2017 मध्ये देशवासियांकडून मागवलेल्या सुचनांनुसार संक्षिप्त भाषण करणार असल्याचं सांगितलं होतं. भाषण जरा जास्त मोठं होत असल्याचं काही पत्रांमध्ये म्हटल्याचं मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी (2017 मध्ये) सर्वात छोटं भाषण देण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी वचन पूर्ण करत 2014 मध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतरचं सर्वात छोटं भाषण केलं.

  • 2014 ते 2018 मोदींच्या भाषणाची वेळ - मोदींनी 2014 मध्ये 65 मिनिटे, 2015 मध्ये 86 मिनिटे, 2016 मध्ये 96 मिनिटे आणि 2017 मध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजे 55 मिनिटांमध्ये भाषण संपवलं. तर यंदा म्हणजे 2018 मध्ये त्यांनी 82 मिनिटे भाषण केलं.

  • मनमोहन सिंह 50 मिनिटे, वाजपेयी 30-35 मिनिटे - यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात 50 मिनिटांच्या आतच भाषण पूर्ण केलं. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 30 ते 35 मिनिटे देशाला संबोधलं होतं.

देशभरात ७२ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह :
  • ७२ वा स्वातंत्र्यदिन नवी दिल्ली : 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभरात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं. 2019 लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींचं हे लाल किल्ल्यावरील अखेर भाषण होतं.

  • मुंबईत राजभवनामध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात झेंडावंदन करण्यात येणार आहे.

  • मुंबईत मुलुंडमधील संभाजी मैदानावर मध्यरात्री ठीक 12 वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. गेल्या 17 वर्षांपासून म्हणजेच कारगील युद्धापासून या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ध्वजारोहणानंतर शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते.

  • शिवसेना नेते शिशिर शिंदे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होतो. यावर्षी अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

  • मुंबईत घाटकोपरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही ध्वजारोहण करण्यात आलं. मध्यरात्री 12 वाजता हा सोहळा पार पडला. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

  • भाजप आमदार राम कदम यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घाटकोपरमधल्या रहिवाश्यांनी यावेळी हजेरी मोठ्या संख्येने लावली होती.

  • स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अख्खा महाराष्ट्र तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईत उजळून निघाला. सरकारी कार्यालये आणि प्रसिद्ध वारसास्थळांवर तिरंगी दिव्यांची आरास केल्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित झालेला दिसला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,  मुंबई महापालिकेची इमारत, मंत्रालयाची इमारत आणि विधानभवन इमारतीलाही नयनरम्य रोषणाईने सजवण्यात आलं.

९४२ पोलीस कर्मचारी आणि ३६ तुरुंगाधिकाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर :
  • यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त ९४२ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. यांपैकी २ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक (पीपीएमजी), १७७ कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदके, ८८ कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर ६७५ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

  • महाराष्ट्रातील ८ कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदक, ३ कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत. पदक विजेत्यांची यादी www.mha.nic.in आणि pib.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

  • तर स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील ३६ तुरुंगाधिकाऱ्यांना सुधारक सेवा पदके प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यात असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सुधारक सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवेसाठी ३१ सुधारक सेवा पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चौघांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत.

  • यामध्ये, कलप्पा मलकप्पा कुंभार (सुभेदार), येरवडा मध्यवर्ती कारागृह, कैलास शालिक बाऊस्कर (हवालदार), मुंबई जिल्हा महिला कारागृह, संजय राजारामजी तलवारे (शिपाई), नागपूर मध्यवर्ती कारागृहातून राजू विठ्ठल हाटे (शिपाई), नागपूर मध्यवर्ती कारागृह येथील तरुंगाधिकारी आणि पोलिस कर्चचाऱ्यांचा यात समावेश आहे.

वादग्रस्त मुद्दे आणि चर्चांमुळे भरकटू नका : राष्ट्रपती रामनाथ कोविंद :
  • देश अनेक प्रलंबित ध्येये गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे स्वत:ला मार्गावरून विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना केले.देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी कोविंद यांनी दूरदर्शनवरील भाषणाच्या माध्यमातून राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी जमावाकडून होणारी हिंसा, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा ऊहापोह करत नागरिकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले.

  • यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे कारण २ ऑक्टोबरला आपण महात्मा गांधीजींचा १५० वा जन्मदिन साजरा करणार आहोत. गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत रूप होते. आजच्या वातावरणात त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान अधिक गरजेचे आहे. हिंसेपेक्षा अहिंसेचा मार्ग अधिक श्रेयस आहे, असे कोविंद म्हणाले.

  • महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर कोविंद म्हणाले की, आवडीनुसार जीवन जगण्याचा आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास साधण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळण्याचा महिलांना अधिकार आहे.

  • देशाच्या इतिहासात एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे आहोत. भारत सध्या अनेक ध्येये साध्य करण्याच्या उंबरठय़ावर आहे. सर्वाना वीज पुरवणे, गावे हागणदारीमुक्त करणे, सर्वाना निवारा पुरवणे आणि गरिबीचे निर्मूलन करणे या बाबी शक्य आहेत. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर नागरिकांनी स्वत:ला वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ देता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला.

फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार संधी - विनोद तावडे
  • मुंबई : आजवर फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विदयार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नव्हता. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याार्थ्यांना दिलासा दिला असून या विद्याार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

  • तावडे म्हणाले, दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची राज्य शासनामार्फत जुलै महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येते. परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याअखेरपर्यंत येतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १५ आॅगस्टपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपविणे आवश्यक आहे.

  • मात्र यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळत नव्हती, त्यामुळे राज्य शासनामार्फत याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका सादर केली होती. याचिकेत फेरपरीक्षेत पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ३१ आॅगस्ट अशी मुदत मिळावी अशी विनंती होती.

  • सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केल्याने या विदयार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे .यावर्षी फेरपरीक्षेस विज्ञान शाखेतून १८,२७८ विदयार्थी बसले असून आता या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे.

दिनविशेष :
  • भारतीय स्वातंत्र्य दिन

महत्वाच्या घटना

  • १६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.

  • १८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.

  • १८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.

  • १९२९: संशोधक ग्राफ झेपेलिन हे बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.

  • १९४७: भारत देश स्वतंत्र झाला.

  • १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.

  • १९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

  • १९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.

  • १९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.

  • १९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.

  • १९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.

  • १९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.

  • १९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

  •  

  • जन्म

  • १७६९: फ्रान्सचा सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १८२१ – सेंट हेलेना)

  • १७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८३१)

  • १८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)

  • १८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)

  • १८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)

  • १८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)

  • १९०४: मोटार व्हीलचेअरचे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)

  • १९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)

  • १९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)

  • १९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)

  • १९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.

  • १९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)

  • १९४५: बांगला देशच्या ९व्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.

  • १९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.

  • १९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)

  • १९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.

  • १९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.

  • १९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.

  • १९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.

मृत्यू

  • १०५७: स्कॉटलंडचा राजा मॅक बेथ यांचे निधन.

  • १११८: कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट ऍलेक्सियस (पहिला) यांचे निधन.

  • १९३५: अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन.

  • १९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)

  • १९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)

  • २००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)

  • २००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी१९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.