चालू घडामोडी - १५ जुलै २०१७

Date : 15 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आदर्श संसदपटूंचा देशात प्रथमच गौरव :
  • १९ जुलै रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी ४ अशा ८ आदर्श खासदारांना ‘लोकमत संसदीय पुरस्कारा’ने या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

  • माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व एच. डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे कार्यक्रमात प्रमुख अतिथी असतील.

  • भारतीय संसदेतर्फे उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ देण्याची प्रथा आहे. तथापि, प्रसार माध्यमाद्वारे दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी ४ संसद सदस्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग, ‘लोकमत’तर्फे साकार होत आहे.

राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन होणार :
  • मुलामुलींसह शिक्षण घेऊ इच्छिणारे प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाईल व त्यात सोयीनुसार अध्ययनाची सवलत असेल.

  • मुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आबालवृद्धांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.

  • या मंडळाच्या माध्यमातून औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती लागू केली जाणार आहे.

  • दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असेल. इयत्ता पाचवीच्या समकक्ष शिक्षणासाठी विद्यार्थ्याचे वय किमान दहा वर्षे असावे, पूर्वी औपचारिक शाळेत गेला असल्यास तेथील शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे, अशा शाळेत गेलाच नसेल तर स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे अशा अटी असतील.

अमेरिकेने मनोरंजन केंद्रे पुन्हा सुरू करावीत :
  • अमेरिकेने राजनैतिक वसाहतीतील आमची दोन मनोरंजन केंद्रे पुन्हा सुरू करावीत अन्यथा कठोर प्रतिसादास तयार राहावे, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

  • अमेरिकेतील रशियाच्या असलेल्या  काही जागांमध्ये ही दोन मनोरंजन केंद्रे सुरू होती, ती अमेरिकेने गेल्यावर्षी बंद केली आहेत,  ती  पुन्हा सुरू करावीत असे रशियाने म्हटले आहे.

  • रशियाने अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशातील संबंध काहीसे ताणले गेले असताना तत्कालीन ओबामा प्रशासनाने गेल्या वर्षी ३५ रशियन अधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

बालाजी मुळे यांना विशेष पुरस्कार :
  • समाजसेवेसाठी गिरीश प्रभुणे (पुणे), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शोभा कराळे यांच्यासह उजमा अख्तर मुछाले, रेवणसिध्द वाडकर, स्वाती कराळे यांची निवड झाली आहे.

  • काशीपीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केली.

  • लोकमतच्या मनुष्यबळ विकास विभागाचे सहायक उपाध्यक्ष बालाजी मुळे (औरंगाबाद) यांच्यासह सहा जणांची निवड झाली आहे.

राज्यात विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन होणार :
  • राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमधून डोळ्यांवर केले जाणारे उपचार, नेत्रविभागातून पदव्युत्तर व पदवीपूर्व नेत्रशास्त्रातील अभ्यासक्रमासंबंधीचे आयोजन, जागा वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनातर्फे अंधत्व निवारणाच्या अनुषंगाने राबविण्यात येणारे प्रकल्प, जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प व योजना यांची योग्य रितीने अंमलबजावणी व्हावी.

  • नेत्ररुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकत्रित मिळावेत, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयात एक संचालक व सात उपसंचालकांची पदे निर्माण करण्यात येत आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

  • सार्वजनिक आरोग्य विभागात संचालकांची दोन पदे निर्माण केली गेली, पण कामाचे वाटप करण्यास गेल्या आठ महिन्यांपासून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि प्रधान सचिवांना वेळ मिळालेला नाही.

भारतीय रेल्वेने लाँच केली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन :
  • जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलार पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, ही ट्रेन ७२ तास बॅटरीवर चालू शकते.

  • भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणा-या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केली असून १४ जुलै रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उदघाटन झाले.

  • दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. ट्रेनच्या एकूण सहा डब्ब्यांवर सौर ऊर्जेचे १६ पॅनल बसवण्यात आले आहेत.  

  • मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत या सोलार पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

  • मागच्यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढच्या पाचवर्षात रेल्वे 1 हजार मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करेल अशी घोषणा केली होती.

मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत :
  • मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली असून पुरुष एकेरीत मात्र एच.एस. प्रणयला पराभवाचे तोंड पहावे लागले.

  • मनू-सुमित या तिसऱ्या मानांकित जोडीने कोरियाचे चोई सोलग्यू-जी किम यांचा ४५ मिनिटांत २१-१७, १७-२१, २१-१३ ने पराभव केला.

  • प्रणय-जेरी चोपडा ही दुसरी मानांकित जोडी मिश्र प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली. या जोडीने नेदरलॅन्डचा रॉबिन टेबलिंग-चेली सीनेन यांच्यावर २१-११, २१-१७ ने विजय साजरा केला. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये विजेत्या राहिलेल्या या जोडीला आता कोरियाच्या खेळाडूंविरुद्ध झुंज द्यावी लागेल.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • सुलतानाचा वाढदिवस : ब्रुनेई.

जन्म, वाढदिवस

  • शिवाजीराव भोसले, ख्यातनाम वक्ते व शिक्षणत‌ज्ञ : १५ जुलै १९२७

  • जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ : १५ जुलै १८७२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, संगीत - रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण करणारे थोर कलावंत : १५ जुलै १९६७

ठळक घटना 

  • ‘कुटुंबनियोजन’ या विषयावर लेख लिहून त्याचा जोरदार प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांचा ‘समाजस्वास्थ’चा पहिला अंक प्रकाशित झाला : १५ जुलै १९२७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.