चालू घडामोडी - १५ जुलै २०१८

Date : 15 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोडला प्रोटोकॉल :
  • वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील तसंच राज्यातील बडे अधिकारीदेखील सोबत आहेत. दरम्यान शनिवारी रात्री पंतप्रधानांनी प्रोटोकॉल तोडत शहराचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. 

  • शनिवारी (14 जुलै) सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझमगडचा दौरा केला आणि त्यानंतर आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये ते पोहोचले. यावेळी रात्री अचानक ते गेस्ट हाऊसमधून बाहेर पडले  व बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पस परिसराची भ्रमंती केली. विद्यापीठ परिसरात असलेल्या विश्वनाथ मंदिराला भेट देऊन त्यांनी पूजादेखील केली.  

  • बनारस हिंदू विद्यापीठातील विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर लंका, गुरुधाम, रविंद्रपुरी, भेलूपूर, मदनपुरा, गोदौलिया, चौक, मैदागीन, लहूराबीर, अंधरापूल, आंबेडकर चौक, सर्किट हाऊस, नदेसर, कँट रेल्वे स्टेशन आणि लहरतारा परिसरातही त्यांनी फेरफटका मारला. तब्बल तासभर मोदींनी या परिसराची पाहणी केली. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. वाराणसीतील डिरेका गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये बसण्यापेक्षा वाराणासीचा दौरा करण्यास पसंती दिली. 

जर्मनीची अँजेलिक कर्बर विम्बल्डनची नवी विजेती :
  • विम्बलडन जर्मनीची अँजेलिक कर्बर विम्बल्डनची नवी विजेती ठरली आहे. तिनं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात माजी विजेत्या सेरेना विल्यम्सचा 6-3, 6-3 असा दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला.

  • अँजेलिक कर्बरच्या कारकीर्दीतलं हे विम्बल्डनचं पहिलं आणि आजवरचं तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं.

  • सेरेना विल्यम्सला विम्बल्डन जिंकून कारकीर्दीतलं चोविसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याची संधी होती. तसं झालं असतं तर सेरेनानं मार्गारेट कोर्टच्या कारकीर्दीतल्या सर्वाधिक २४ विजेतीपदांच्या कामगिरीची बरोबरी साधली असती. पण अँजेलिक कर्बरनं सेरेनाचं आव्हान केवळ 65 मिनिटांत मोडीत काढलं आणि ती विम्बल्डनची नवी राणी बनली.

  • अँजेलिक कर्बरनं याआधी २०१६ साली ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपनचंही विजेतेपद पटकावलं होतं.

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर :
  • नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 3 जून रोजी झालेल्या नागरी सेवा (CSE) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

  • उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मुख्य (मेन्स) परीक्षेसाठी नव्याने विस्तृत अर्ज (डीएएफ) करावा, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. डीएएफ भरण्यापूर्वी उमेदवाराला यूपीएससीच्या वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.

  • जवळपास आठ लाख उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली होती. त्यापैकी दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षेचा कट ऑफ मे 2019 मध्ये अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पाहता येईल. मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकासोबतच ई-प्रवेश पत्र (हॉलतिकीट) यूपीएससीच्या वेबसाईटवर परीक्षा सुरु होण्यापूर्वी तीन आठवडे अगोदर अपलोड केलं जाईल, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

  • निकाल पाहण्यासाठी यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाईटवर जा वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवरच निकालाची लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर निकालाच्या पीडीएफची लिंक देण्यात आली आहे. पीडीएफच्या लिंकवर क्लिक केवन डेत धोनीच्या 10 हजार धावा पूर्णल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची यादी ओपन होईल. यामध्ये तुमचा क्रमांक शोधा

दक्षिण-मध्य रेल्वेच्या विनाआरक्षित तिकिटांसाठी मोबाईल अॅप :
  • नांदेड विनाआरक्षित प्रवास करायचा म्हटलं की रेल्वेस्टेशनवर तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पण आता दक्षिण-मध्य रेल्वेने लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. यूटीएस नावाचे हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.

  • जर प्रवाशाला विनाआरक्षित तिकीट काढून प्रवास करायचा असेल, तर असा प्रवाशी या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करु शकतो. आजवर केवळ आरक्षित तिकिटच ऑनलाईन बुक करण्याची सोय उपलब्ध होती.

  • रेल्वेस्थानकाच्या 15 मीटर अंतरापासून ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत दूर असताना या अॅपद्वारे विनाआरक्षित तिकीट बुक करता येणार आहे. या अॅप मुले लोकांना रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही, सुट्ट्या पैसे नसल्यास डोकेदुखी होणार नाही, शिवाय हे सर्व पेपरलेस असल्याने तिकीट हरवण्याचा धोका नाही.

  • दरम्यान, हे अॅप दक्षिण-मध्य रेल्वेने तयार केले असल्याने सध्या याचा वापर फक्त दक्षिण मध्य रेल्वेच्या स्थानकापुरताच करता येणार आहे. अन्य विभागातील रेल्वेस्थानकांसाठी सध्या तिकीट बुक करता येणार नाही.

वन डेत धोनीच्या १० हजार धावा पूर्ण :
  • लंडन : भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स वन डेत लियाम प्लंकेटच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत वन डे कारकीर्दीतल्या दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा धोनी भारताचा चौथा तर जगातला नववा फलंदाज ठरला.

  • वन डेत दहा हजाह धावा पूर्ण करत धोनीने त्याच्या यशस्वी कारकीर्दीतला एक मैलाचा दगड पार केला.भारताच्या वन डे क्रिकेटच्या इतिहासात धोनीच्याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने दसहजारी टप्पा ओलांडला होता. त्यात सचिननं 18 हजार चारशे सव्वीस, गांगुलीने 11 हजार 221 आणि द्रविडने 10 हजार 768 झळकावल्या आहेत. भारताच्या या रथीमहारथींच्या यादीत आता धोनीचा समावेश झाला आहे.

  • यष्टिरक्षक या नात्यानं दहा हजार धावा करणारा धोनी जगातला केवळ दुसरा यष्टिरक्षक ठरला. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने दहा हजार धावा करणारा पहिला यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला होता.

  • धोनीने आजवर 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 320 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. या कालावधीत धोनीने 51.57च्या सरासरीने 10,004 धावांचा रतीब घातला आहे. त्यात दहा शतकं आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे.

  • केवळ फलंदाज म्हणून नव्हे तर भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही धोनीकडे पाहिलं जातं. धोनीनं 60 कसोटी,199 वन डे आणि 72 ट्वेन्टी ट्वेन्टीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. या कालावधीत धोनीनं 2007 साली भारताला  ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक मिळवून दिला. त्यानंतर 2011च्या वन डे विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 1983 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला. तर 2013ला चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करत आयसीसीच्या तिन्ही महत्वाच्या स्पर्धा जिंकून देणारा तो जगातला पहिला कर्णधार बनला.

‘या’ गोष्टीच्या जनजागृतीसाठी १९ वर्षीय भारतीय तरुणाने सर केला माऊंट किलीमांजारो :
  • गिर्यारोहणामध्ये गेल्या काही वर्षांपासून तरुणाईचा जास्त कल दिसून येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख प्रस्थापित करु पाहणाऱ्या तरुणांचा ओढा या पर्वतरांगांच्या दिशेनेही दिसून येत आहे. अशातच तेलंगाणा येथील एका १९ वर्षीय तरुणाने माऊंट किलीमांजारो सर करत भारताचं नाव उज्वल केलं आहे.

  • सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असून, आफ्रिकेतील टांझानियामध्ये आहे. हा महाकाय पर्वत १९ वर्षीय अमगोथ तुकाराम याने सर करत एक नवा टप्पा सर केला आहे. हेल्मेट वापराविषयीची जनजागृती करण्यासाठी म्हणून त्याने ही मोहिम हाती घेतली आणि त्याची जबाबदारी पार पाडली.

  • ‘वाहन चालवतेवेळी सर्वांनीच हेल्मेटचा वापर करावा हा संदेश पोहोचवण्यासाठी मी ही मोहिम हाती घेतली होती. प्रत्यक्ष एक अपघात पाहिला असता मी पुरता हादरून गेलो होतो. त्यामुळे हेल्मेटविषयी जनजागृती करण्याचा विचार लगेचच माझ्या मनात आला होता. त्यामुळे एका अनोख्या आणि प्रभावी अशा मार्गाने हा अतिशय महत्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी माऊंट किलीमांजारो सर केला’, असं खुद्द अमगोथ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधत म्हणाला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.

  • १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

  • १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

  • १९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

जन्म

  • १९०३: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)

  • १९०५: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)

  • १९१७: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)

  • १९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)

  • १९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)

  • १९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाष जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)

  • १९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)

  • १९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे  निधन. (जन्म: २१ सप्टेंबर  १८८२)

  • १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)

  • १९७९: मेक्सिकोचे २९वे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.

  • १९९१: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.

  • १९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.

  • २००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.