चालू घडामोडी - १५ जून २०१७

Date : 15 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आज बांगलादेशवर विजय मिळवल्यास फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान :
  • भारत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशविरुद्ध खेळेल त्या वेळी व्यावसायिक आणि ‘पॅशन’ यांच्यादरम्यानची रंगत अनुभवाला मिळू शकते.

  • कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे बांगलादेशला विजयाचा दावेदार न समजणे चुकीचे ठरेल.

  • भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. बांगलादेशने साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला होता, त्यामुळे या संघाला कमकुवत लेखणे चुकीचे ठरेल. या विजयासह बांगलादेशने उपांत्य फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.

लवकरच इस्त्रो रॉकेलला इंधन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत.

  • द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते.

  • सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो. 

मनोहर चिंतामण कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्कार :
  • महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे.

  • तसेच विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), यश रूईकर (पुरूषोत्तम करंडक विजेते), चंद्रशेखर देशपांडे (ऑर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर (अभिनेत्री व गायिका) आणि दत्तात्रय शिंदे (सेटिंग) यांना बालगंधर्व विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.

  • बालगंधर्व पुरस्काराची निवड करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यामध्ये या पुरस्कारांची निवड करण्यात आली. या निवड समितीत अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई, शुभांगी दामले, उस्ताद फैय्याज हुसेन खान यांचा समावेश होता.

आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संतोष जाधव :
  • करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बागल गटाचे संतोष जाधव-पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

  • दि. १४ जून रोजी या कारखान्याच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातंधिकारी मारूती बोरकर यांनी काम पाहिले.

  • तसेच या कारखान्याची निवडणूक बागल गट, पाटील गट, जगताप गट व शिंदे गट अशी चौरंगी झाली होती. यात राष्ट्रवादीच्या बागल गटाचे सर्व २१ संचालक विजयी झाले होते.

१५० निवडणुकांमध्ये पराभूत होऊनही ‘ते’ लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक :
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सहाजणांनी अर्ज भरला आहे. बुधवारी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज करण्याचा पहिला दिवस होता.

  • १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. बुधवारी (काल) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सहाजणांनी अर्ज दाखल केले.

  • यामध्ये ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. पद्मराजन यांचा समावेश आहे. पद्मराजन यांच्या नावाची नोंद याआधीच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आहे.

  • तमिळनाडूच्या सेलमचे रहिवासी असलेले के. पद्मराजन यांनी आतापर्यंत १५० हून अधिक वेळा निवडणूक लढवली आहे. त्यामुळेच त्यांना ‘इलेक्शन किंग’ म्हटले जाते. विशेष म्हणजे पद्मराजन यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवण्यात आले आहे.

  • ‘सर्वाधिक अयशस्वी उमेदवार’ म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये पद्मराजन यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

पुण्याच्या उपमहापौरपदी सिद्धार्थ धेंडे यांची निवड :
  • पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपकडून सिध्दार्थ धेडे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून लता राजगुरु हे होते.

  • मात्र निवडणुकीवेळी लता राजगुरू यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होत सिध्दार्थ धेंडे विजयी झाले.

  • उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे महिनाभरापूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे उपमहापौरपद हे रिक्त झाले होते. तर या पार्श्वभूमीवर महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली.

  • तसेच या निवडणुकीला महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त शितल उगले, पीठासीन आधिकारी लहुराज माळी आणि सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते.

ज्युनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन :
  • डेहराडून येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली.

  • तसेच, ज्युनिअर स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशनक कप पिकलबॉल स्पर्धेत मात्र राजस्थानने बाजी मारली.

  • निर्णायक सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  • डेहराडून येथील परेड मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ज्यूनिअर गटात महाराष्ट्राने जबरदस्त खेळ केला.

  • महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात कृष्णा मंत्रीने यश पाटीलचा 11-१, ११-४ असा धुव्वा उडवून सुवर्ण पदक पटकावले.

  • मुलींच्या गटात मात्र राजस्थानच्या गीतम शर्माने बाजी मारत यजमान उत्तराखंडच्या खुशी थोपाचे आव्हान ११-१, ११-० असे परतावले.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • १९३८ : अण्णा हजारे, मराठी समाजसेवक

  • १९६३ : नानासाहेब गोरे, ज्येष्ठ समाजवादी नेते

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १९३१ : अच्युत बळवंत कोल्हटकर, ‘संदेश’कार

  • १९७१ : वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ

ठळक घटना

  • १९९२ : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की अमेरिकेला हव्या असलेल्या संशयितांना इतर देशांतून पळवून आणणे कायदेशीर आहे

  • १७७५ : अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक : १५ 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.