चालू घडामोडी - १५ मार्च २०१८

Date : 15 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहावीपर्यंत मोफत शिक्षणाचा प्रस्ताव, शिक्षण अधिकार कायद्याचा विस्तार :
  • नवी दिल्ली : शिक्षण अधिकार कायदा-२००९ (आरटीई) चा विस्तार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने केला आहे. यात प्रथमच प्री-प्रायमरी शालेय शिक्षणाला समाविष्ट केले जाणार आहे. त्याचबरोबर विनामूल्य शिक्षणाची मर्यादा आठवीपासून वाढवून दहावीपर्यंत करण्याची तयारीही केली जात आहे. याचा लाभ ३५ लाख विद्यार्थ्यांना होईल.

  • केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शिक्षणाचा अधिकार कायद्यात अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशनला (ईसीसीई) समाविष्ट करण्याचा विचार आहे. सगळ््यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशा रितीने सरकार काम करीत आहे. हा प्रस्ताव केंद्रिय शिक्षण सल्लागार मंडळाच्या उपसमितीने तयार केला आहे. तज्ज्ञांकडून यावर मंथन सुरू आहे.

  • वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरटीईचे कलम ११ मध्ये दुरुस्ती केली जाईल. त्यात तीन वर्षांच्या वरील मुलांना एलिमेंटरी एज्युकेशन आणि अर्ली चाईल्ड केअर शिक्षण सहा वर्षांपर्यंत देण्याची तरतूद केली जाईल.

  • विधी आयोगानेही आपल्या अहवालात याची शिफारस केली आहे. त्यानुसार मुलांचे आरोग्य व मानसिक विकासाला नजरेसमोर ठेवून प्राथमिक स्तरावर पोषणाचीही जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

रेल्वेतील भरतीसाठी आले दीड कोटी अर्ज, जागा केवळ ८९ हजार :
  • नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतील ‘क’ आणि ‘क’ वर्गाच्या ८९ हजार पदांसाठी दीड कोटी उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले. अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात या उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाकडे प्राथमिक नोंदणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात पात्रता छाननी होऊन शुल्क भरल्यानंतर परीक्षेसाठी बसणाºया उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होईल. रेल्वेत एकाच वेळी केली जाणारी आजवरची ही सर्वात

  • मोठी नोकरभरती आहे. त्यात ‘क’ वर्गातील २६,५०२ व ‘ड’ वर्गातील ६२,९०७ पदे भरली जायची आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार उमेदवारांची निवड मुलाखती न घेता फक्त लेखी परीक्षेने केली जाईल. यासाठी आॅनलाइन लेखी परीक्षा एप्रिल किंवा मेमध्ये होण्याची शक्यता आहे.

अँजेला मर्केल पुन्हा जर्मनीच्या चान्सलर :
  • बर्लिन : जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची बुधवारी चान्सलरपदी सलग चौथ्यांना निवड केली. त्यामुळे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली.

  • सन २००५ पासून चान्सलर असलेल्या मर्केल निवडणुकीत एकमेव उमेदवार होत्या. ७०९ सदस्यांपैकी ३६४ जणांमी मर्केल यांच्या बाजूने तर ३१५ जणांनी विरोधात मतदान केले. स्वत: मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन, फक्त बव्हेरिया प्रांतापुरता मर्यादित असलेला ख्रिश्चन सोशल युनियन आणि डाव्या विचारसरणीचा सोशल डेमोक्रॅट््स या तीन पक्षांच्या आघाडीने मर्केल यांना पाठिंबा दिला. तरी आघाडीच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा मर्केल यांना ३३ मते कमी मिळाली. त्यामुळे आघाडी सरकार चालविण्यासाठी मर्केल यांना कसरत करावी लागणार आहे.

  • गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणालाच बहुमत न मिळाल्याने परस्परांच्या विरोधात असलेल्या या तीन पक्षांची मोट बांधली गेली. हे करत असताना मर्केल यांना वित्त, परराष्ट्र, गृह व अर्थव्यवस्था ही महत्वाची खाती मित्रपक्षांना द्यावी लागली.

स्टीफन हॉकिंग यांचे १० प्रेरणादायी विचार :
  1. गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल : स्टीफन हॉकिंग
  2. जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे – स्टीफन हॉकिंग
  3. नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.
  4. आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल! : स्टीफन हॉकिंग
  5. आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये : स्टीफन हॉकिंग
  6. दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. : स्टीफन हॉकिंग
  7. आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. : स्टीफन हॉकिंग
  8. कधीही करु शकत नाही असं काहीही नाही : स्टीफन हॉकिंग
  9. जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात : स्टीफन हॉकिंग
  10. ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही : स्टीफन हॉकिंग
भारत अंतिम फेरीत, बांगलादेशचा १७ धावांनी पराभव :
  • कोलंबो : कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मुशफिकुर रहिमने (७२*) पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकावले, परंतु संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

  • आर. प्रेमदासा स्टेडियमवर खराब फॉर्मच्या गर्तेत सापडलेल्या रोहित शर्माने आपल्या लौकिकानुसार ६१ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ८९ धावांचा तडाखा देत भारताच्या धावसंख्येला बळकटी दिली. अनुभवी सुरेश रैनानेही ३० चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांचा चोप दिला. या दोघांनी दुसऱ्या बळीसाठी १०२ धावांची भागीदारी केली. याजोरावर भारताने २० षटकात ३ बाद १७६ धावांची मजल मारली.

  • धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची अडखळती सुरुवात झाली. वॉशिंग्टन सुंदरने तमिम इक्बाल (२७), लिटॉन दास (७) आणि सौम्य सरकार (१) या प्रमुख फलंदाजांना बाद करुन बांगलादेशची सहाव्या षटकात ३ बाद ४० अशी अवस्था केली. यानंतर लगेच युझवेंद्र चहलने कर्णधार महमुद्दुल्लाहचा (११) महत्त्वपूर्ण बळी मिळवत बांगलादेशची कोंडी केली. परंतु, एका बाजूने टिकलेल्या रहिमने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत बांगलादेशच्या आशा कायम राखल्या. त्याने शब्बीर रहमानसह (२७) पाचव्या बळीसाठी ६५ धावांची भागीदारी करत

  • संघाला काहीवेळ विजयी मार्गावर ठेवले.

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना

  • १४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

  • १६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.

  • १८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

  • १८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.

  • १८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

  • १९०६: रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.

  • १९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.

  • १९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

  • १९५६: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.

  • १९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

  • १९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.

  • १९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

  • २००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.

जन्म

  • १७६७: अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)

  • १८६०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)

  • १८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)

  • १९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)

मृत्यू

  • १९३७: रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)

  • १९९२: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.

  • २०००: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.

  • २००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.

  • २००३: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.

  • २०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)

  • २०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.